#पुस्तकआणिबरचकाही
विंदा करंदीकर (२३ ऑगस्ट १९१८ - १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. गोविंद विनायक करंदीकर हे विंदा करंदीकर या नावाने प्रसिद्ध झाले. विंदांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, 👇
गांभीर्य आणि मिस्किलपणा, आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून 👇
घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न 👇
मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी 👇
चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते.( मृदगंध, मलपृष्ठावरून )👇
विंदामध्ये जसा कवी आहे तसाच तत्त्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समीक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगांनी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे. साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च असा ज्ञानपीठ(२००३) पुरस्कार मिळाला. 👇
त्याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, कबीर सन्मान, असे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.
#पुस्तकआणिबरचकाही
कुमुदिनी रांगणेकर ( २५ मार्च १९०६ - १६ मार्च १९९९ ) कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार. ‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. 👇
त्यांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.‘अनियमित जग’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी. ‘प्रीतीचा शोध’, ‘फुललेली कळी’, ‘शकुनी मोहर’, ‘हरपलेलं गवसलं’, 👇
‘क्षणाचं वैधव्य’ या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबर्या आहेत. ‘चार उणे एक बरोबर दोन’, ‘स्वप्नातली कळी’, ‘मखमली वल्ली’ , ‘मर्मबंध’, ‘सोन्याची शिडी’, ‘गंधाविना चंदन’, ‘स्वप्नाळू प्रीतशकुनी मोहर’, ‘एकेरी गाठ’ , ‘कल्पना’ , ‘बेसूर संगीत’, ‘विरलेले वस्त्र’ , ‘परतदान’, ‘माळावरील 👇
योगायोग या पहिल्याच प्रकरणात लाॅटरी घोटाळा इतका अवाढव्य असू शकतो.. हे वाचतांना थक्क होतो. गोव्यातील एक आमदार उघड आव्हान देतो, माझ्या बंगल्यावर रेव्ह पार्टी करतोय, हिम्मत असेल तर धाड टाकून दाखवा..एक आमदार जो पोलिसांना वाॅन्टेड असतांना सत्तधिशांच्या आशिर्वादाने राजरोस वावरतो...👇
एका डायरीच्य शेवटी लिहिलेल्या इ मेल चा शोध घेतांना दिल्लीत रोखलेले बाॅम्बस्फोट. तसेच दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाचा राजकीय स्वार्थासाठी कसा वापर झाला हे व राजकारणातील गुन्हेगारी वृत्ती कोणतीही भिडभाड न बाळगता व्यक्त झाली आहे. त्यांच्या वरिष्ठांबद्दल किंवा सहकाऱ्यांशी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सुधीर मोघे ( ८ फेब्रुवारी १९३९ - १५ मार्च २०१४ ) कवितेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कवितेलाच आपला प्राण मानणाऱ्या सुधीर मोघे यांचे शब्दमाध्यमावरचे प्रेम नितांत होते,
‘शब्दांना नसते दु:ख शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते’ 👇
या शब्दांतून सहज त्याचा प्रत्यय येतो.
कवी-गीतकार म्हणून सुधीर मोघे जेवढे आणि जसे श्रेष्ठ होते, तेवढे आणि तसेच ते संगीतकार म्हणूनही मोठे होते, त्यांनी संगीत दिलेल्या ‘कशासाठी प्रेमासाठी’ या मराठी चित्रपटाची गाणी जशी गाजली तशीच ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटाचीही गाजली. 👇
‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ या दूरदर्शनवरील मालिकांना त्यांनी दिलेले संगीत प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांनी ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारतें’ या हिंदी मालिकांनाही संगीत दिले. त्यांनी व्यावसायिक माहितीपटांची केलेली निर्मितीही त्यांच्यातील सर्जनशीलतेची ग्वाही देते. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
अरुण कांबळे ( १४ मार्च १९५३ - २० डिसेंबर २००९ ) दलित साहित्य अखिल भारतीय स्तरावर तसेच जागतिक स्तरावर नेण्याचे काम करणे हीच जीवननिष्ठा, असे मानणारे ते धडाडीचे लेखक आणि कवी आहेत. मुंबई आणि हैद्राबाद या दोन्ही उच्च न्यायालयांनी संशोधन ग्रंथ म्हणून मान्यता 👇
दिलेल्या ‘रामायणातील संस्कृती संघर्ष’ (१९८२) या ग्रंथांच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. या ग्रंथाचे भाषांतर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत करण्यात आले. ‘जनता पत्रातील लेख’, ‘धर्मांतराची भीमगर्जना’, ‘चीवर’, ‘युगप्रवर्तक डॉ.आंबेडकर’, ' चळवळीचे दिवस' 👇
‘वाद-संवाद’ या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला. ‘अरुण कृष्णाजी कांबळे’, तसेच ‘मुद्रा’ हे त्यांचे कविता संग्रहही लक्ष्यवेधी ठरले. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू तसेच जर्मन व फ्रेंच या भाषांमध्ये भाषांतरित झाल्या. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सुरेश भट ( १५ एप्रिल १९३२ - १४ मार्च २००३ ) मराठी गझल विश्वातील अजरामर नाव. या नावाशिवाय मराठी गझल हा विषय पूर्ण होऊ शकत नाही.बालपणी पोलिओने पाय अधू झाल्याने काहीसे दुर्लक्षित जगणे वाट्याला आले. आईला असलेली कवितेची आवड अनुवांशिकतेने त्यांच्यात आली आणि त्यांनी👇
लिहायला सुरुवात केली.काही वेळा नापास होत कसेतरी शिक्षण पूर्ण करुन ते नौकरीला लागले. ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते आणि १९६१ मध्ये ‘रुपगंधा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सुरेश भट यांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझल यांचा आयुष्यभर👇
अभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला. हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. त्यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून महाराष्ट्रात ते नावाजले जाऊ लागले. त्यानंतर ‘एल्गार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ इ. संग्रह प्रकाशित झाल्यावर तर भटांचा👇
#पुस्तकआणिबरचकाही
वासुदेव विष्णु मिराशी (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ. प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा 👇
मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी होय, असा सिद्धांत मांडला.हा सिद्धांत त्यांनी मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक या नावाने प्रकाशित केला .अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे 👇
मधील भित्तिचित्रे वाकाटकांच्या कारकिर्दीत काढली गेली हे त्यांनी स्पष्ट केले. शिलालेख व ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणकशास्त्रातही त्यांनी अजोड कामगिरी केली. कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् या ग्रंथमालेचे हे पहिले भारतीय संपादक होत.मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन👇