ठाकरे गटाचा युक्तिवाद ―
कपिल सिब्बल ―
१) एक लहान पक्ष आहे ज्यामध्ये 5 सदस्य आहेत. त्यापैकी 2 सदस्य मी सरकारला पाठिंबा देणार नाही असे सांगत राज्यपालांकडे गेले तर राज्यपाल फ्लोर टेस्ट घेणार का? बहुसंख्य सदस्य विसरा, अशाने अल्पसंख्याक सदस्यही सरकार पाडू शकतात. #महाराष्ट्र 👇
विधानसभे मधील (सदनातील ) आमदारांच्या संख्याबळाने सरकार पडत नाही, किंवा पडणार नाही, तर ते सरकार मधील पक्षाच्या युती अथवा आघाडीने पाठींबा काढून घेतल्यावर सरकार पडू शकत, किंवा पडेल. 👇
आपण 'आया राम गया राम' या केसवर चाललो आहोत काय ? कारण आता तुम्ही ( शिंदे गट ) म्हणता राजकीय संबंधाने काही फरक पडत नाही, आणि तुम्ही महत्त्वाची ती गोष्ट म्हणजे संख्या. पण इथे लोकशाही म्हणजे संख्या नाही.👇
घटनेच्या 168 अ कलमानुसार राज्यपाल हे विधानसभेचे सदस्य नसतात; पण ते विधिमंडळाचा अविभाज्य भाग आहेत. आणि या केस मध्ये राज्यपाल राजकीय पक्षाशिवाय इतर कोणालाही ओळखू शकत नाही.
थोडक्यात सिब्बल इथं आमदारांची संख्या नव्हे तर पक्ष महत्वाचा आहे सत्तास्थापन करायला असे थेटपणे सुचवत आहेत.👇
सिब्बल: सर्व वकिलांनी व्हीप या संकल्पनेवर भाष्य केलेले नाही. मला आश्चर्य वाटले जेव्हा मिस्टर कौल यांनी कोर्टाला श्री संजय यांचे पत्र दिले ज्यामध्ये म्हटले होते की प्रत्यक्षात व्हिपची नियुक्ती करणारा हा सभागृहाचा नेता आहे. 👇
इथे; आसाममध्ये भाजपच्या मांडीवर बसलेले तुमच्यापैकी ( शिंदे गटाचे ) ३४ लोक गोगावले यांना घेऊन व्हीप नेमतील. आणि मग कोर्टात येऊन म्हणतील बघा आम्ही व्हिप आधीच नेमला आहे! हे कोणत्या सत्तेखाली? कशाच्या आधारे ? कोणत्या कायद्याने ? 👇
खालील थ्रेड ठाकरे गटाच्या युक्तिवादाचा दुसरा भाग आहे 👇
#सत्तासंघर्ष ― व्हीपचा गाढव गोंधळ
सरन्यायाधीश यांच म्हणणं अंत्यत तार्किक आहे
त्याच आशायने सांगायच झालं तर ― शिंदे गटाला पक्षावर विश्वास होता. पण मुख्यमंत्र्यांवर नव्हता. पण हा विश्वास 3 वर्ष सरकार चाललं तोपर्यंत होता. आणि मग अचानक एका रात्रीत अस काय घडलं की विश्वास संपला ? 👇
शिंदे गट अतिशय दांभिक आणि दुटप्पी भूमिका मांडत आहे. एकीकडे माननीय कोर्टात म्हणायच की. आम्ही पार्टीमधून फुटलो नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आणि दुसरीकडे निवडणूक आयोगात शिंदे गट जातो तेव्हा तिथे ते गट म्हणूनच जातात. कारण ते जर शिवसेना असतील तर आयोगात जायची गरज काय ? 👇
जेव्हा उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यावेळी सुद्धा सुनील प्रभु यांचाच व्हीप होता. तो 2 तारखेला बजावला की सभापतीच्या नेमणूकीसाठी सर्वानी राजन साळवी यांनाच मतदान करावे असा व्हीप बजावला. आणि तीन अंडरलाईन असलेला व्हीप आहे. हा व्हीप मोडला तर पक्षविरोधी भूमिका समजून अपात्र केलं जात
ठाकरे गटाचा युक्तिवाद - भाग दुसरा
कपिल सिब्बल -
१) शिवसेनेचा व्हीप कुणाकडे आहे ? इथे शिवसेनेचा व्हीप हा सुनील प्रभू यांच्याकडे आहे. आणि तो व्हीप पक्षातील सर्व आमदारांना बंधनकारक राहील, तो व्हीप सर्वाना पाळावा लागेल.
एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी राज्यपाल कसे बोलावतील ? कोण आहेत एकनाथ शिंदे? मी घटनात्मक शब्दात बोलत आहे. एकनाथ शिंदे हे गटनेते असल्याचा युक्तिवाद केला जात आहे. ते कोणत्या कायद्याखाली?
अर्थात -त्याना गटनेता कुणी बनवलं ( ठाकरेंनी ) आहे हा प्रश्न इथे उपस्थित होतोय 👇
( शिंदे गट ) तुम्ही स्वतःला पक्षाचे अधिकार देऊ शकत नाही. आसाम मध्ये बसून तुम्ही इतर पार्टीकडून मनोरंजन करून घेत आहात आणि जाहीरपणे सांगत का हा दुसरा पक्ष मला पाठींबा देत आहे. आणि तुम्ही स्वतःला राजकिय पक्ष असल्याचं सांगून पक्षाची घटना बदलवत आहात. 👇
Breaking― भाजपला मोठा दणका
मुंबई हायकोर्टाने आज उध्दव ठाकरे व त्यांच्या कुटूंबाच्या संपत्तीची ED व CBI ने चौकशी करावी अशी याचिका फेटाळून लावली व याचिका कर्त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला
कोर्ट- ही याचिका कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करते. #ठाकरे#महाराष्ट्र#HC (१/४)
सदरील याचिका "गौरी भिडे" यांनी दाखल केली होती. पण माननीय उच्च न्यायालयाने यावर स्पष्टपणे सांगितलं आहे की सदरील याचिकेत कोणताही पुरावा समाविष्ट नाही. त्यामुळे कोर्ट प्रथमदर्शनी कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. (२/३)
कोणत्याही परिस्थितीत BMC मधील जो काही गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यासाठी उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा इथे थेट संबंध नाही. किंवा तसा पुरावाही नाही. ही याचीका कोणताही पुरावा नसताना दाखल केली आहे. त्यामुळेच ती फेटाळून लावण्यात आली आहे. (३/३)
आज 'एकनाथ षष्ठी' आजच्या दिवशी महाराष्ट्राचे थोर लोकप्रिय संत श्री एकनाथ महाराजांचे निर्वाण झाले. या षष्ठीच्या दिवसाचे महत्व एकनाथ महाराजांच्या आणि त्यांना मानणाऱ्या वर्गात अद्भुत असे आहे. ते असे की संत एकनाथ महाराज पैठण क्षेत्री जन्मले वाढले, वावरले. 👇
ईश्वरभक्तीचा आणि धर्माचा अभ्यास करण्याच्या आवडीने ते आपल्या आजोबांना न सांगता घरातून निघून गेले. आणि पोहचले थेट देवगिरी किल्ल्यावर तिथे त्याना किल्ल्याचे किल्लेदार जनार्दनपंत देशपांडे भेटले. हेच ते एकनाथ महाराजांचे गुरुवर्य जनार्दनस्वामी, स्वामीनी त्याना ज्ञानेश्वरी शिकवली.👇
व बाकी बऱ्याच अध्यात्मिक व धार्मिक बाबी अवगत करून दिल्या. पुढे ते पैठणला आले, तिथून त्यानी ठिकठिकाणी तीर्थयात्रा केली. ते हिंदु धर्माचे पीठ असलेल्या काशीला काही काळ राहिले तिथे त्यांनी मराठी भाषेत भागवत लिहल, यासाठी त्याना काशीच्या पंडिताकडून फार रोष सहन करावा लागला.👇
#Thread
छ. शिवाजी महाराजांचां वस्तुनिष्ठ व खरा इतिहास वाचण्यासाठी काही शिवचरीत्र व पुस्तके.
१) छत्रपती शिवाजी - सेतुमाधव पगडी
२) कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे - शिवचरित्र
३) छत्रपती शिवाजी महाराज - पुर्वाध आणि उत्तरार्ध- वा.सी बेंद्रे
४) श्री शिवछत्रपती - त्र्यं. श. शेजवलकर.👇
५) छ. शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ- जयसिंगराव पवार
६) शिवाजी अँड हिज टाईम्स - जदूनाथ सरकार
६) Rise of Maratha power- न्या रानडे
७) शिवाजी द ग्रेट - डॉ बाळकृष्ण
८) छ. शिवाजी नी त्यांची प्रभावळ- सेतुमाधव पगडी
९) मराठ्यांचे आरमार - भा.कृ. आपटे
१०) शककर्ते छ. शिवाजी महाराज- रियासतकार
११) शिवकाल - डॉ वि.ग खोबरेकर
१२) छ. शिवाजी महाराजांचीं पत्रे- प्र.न.देशपांडे
१३) शिवाजी कोण होता- गोविंद पानसरे
१४) दगलबाज शिवाजी- के.सी ठाकरे
१५) शिवछत्रपती एक मागोवा-जयसिंगराव पवार
१६) छ. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक- डॉ आह साळुंखे
१७) मोघल मराठा संघर्ष - सेतुमाधव पगडी
#सत्तासंघर्ष -3
एकनाथ शिंदे व त्यांचे वकील सांगत आहेत की आम्हाला MVA नको होती. त्यांच्यासाठी काही प्रश्न
१) MVA नको होती तर अडीच वर्षे मंत्रीपद कस काय घेतलं ?
२) सत्तास्थापनेच्या बैठकीत (नेहरू सेंटर) नार्वेकर, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या सोबत कशाला गेला होता ? ( ५/१)
३) विधिमंडळ नेत्याच्या जबाबदारीने सत्तास्थापने साठी अदित्य ठाकरे यांच्या सोबत सकाळीच 7-30 वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट का घेतली ?
४) राज्यपालांना का कळवले सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे परंतु एकूण बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत द्यावी ( ५/२)
५) राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेचे विधिमंडळ नेते म्हणून आपणांस निमंत्रित केले आणि सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. ते आवाहन का स्वीकारले !
तेव्हा MVA नको होती का ? तेव्हा कळलं कस नाही की काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, आपण युतीमधून लढलो आहोत, आघाडी नको. ( ५/३)