#सत्तासंघर्ष ― व्हीपचा गाढव गोंधळ
सरन्यायाधीश यांच म्हणणं अंत्यत तार्किक आहे
त्याच आशायने सांगायच झालं तर ― शिंदे गटाला पक्षावर विश्वास होता. पण मुख्यमंत्र्यांवर नव्हता. पण हा विश्वास 3 वर्ष सरकार चाललं तोपर्यंत होता. आणि मग अचानक एका रात्रीत अस काय घडलं की विश्वास संपला ? 👇
शिंदे गट अतिशय दांभिक आणि दुटप्पी भूमिका मांडत आहे. एकीकडे माननीय कोर्टात म्हणायच की. आम्ही पार्टीमधून फुटलो नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आणि दुसरीकडे निवडणूक आयोगात शिंदे गट जातो तेव्हा तिथे ते गट म्हणूनच जातात. कारण ते जर शिवसेना असतील तर आयोगात जायची गरज काय ? 👇
जेव्हा उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यावेळी सुद्धा सुनील प्रभु यांचाच व्हीप होता. तो 2 तारखेला बजावला की सभापतीच्या नेमणूकीसाठी सर्वानी राजन साळवी यांनाच मतदान करावे असा व्हीप बजावला. आणि तीन अंडरलाईन असलेला व्हीप आहे. हा व्हीप मोडला तर पक्षविरोधी भूमिका समजून अपात्र केलं जात
जेव्हा नवीन सभापतीची निवड म्हणून नार्वेकर यांची निवड झाली, तिचे मतदान नरहरी झिरवळ यांनी घेतले. तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी झिरवळ याना अवगत करून दिले की शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हीपचा आदेशाचं उल्लंघन करून पक्षाच्याविरोधात मतदान केलं आहे आहे. ही बाब सदनाच्या पटलावर घ्यावी.👇
तेव्हा झिरवळ यांनी सांगितलं की, ही मतदान प्रक्रिया माझ्यासमोर झाली व मला अस दिसलं की शिवसेनेच्या आमदारांनी व्हीपच उल्लंघन करून आपल्या पक्षाच्या विरोधात मतदान केलं आहे. अस सिद्ध झालं आणि आणि याचे पुरावे म्हणून विडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे.आणि त्या आमदारांची नावे लिहून घेतली. 👇
नार्वेकर जेव्हा अध्यक्षपदी बसले तेव्हा, भरत गोगावले यांच पत्र त्यांच्याकडे आलं. आणि त्यात अस सांगितलय की, शिवसेनेचे 16 विधिमंडळ आमदारानी व्हीपच उल्लंघन केलं आहे. आणि त्यानी विरोधात मतदान केलं आहे.
पण इथे प्रश्न उपस्थित होतो की भरत गोगावले याना प्रतोद नेमणारे एकनाथ शिंदे कोण ? 👇
एकनाथ शिंदे पक्षप्रमुख नाहीत, त्यावेळी नव्हते. त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर ते प्रतोद कसे नेमु शकतात. एकनाथ शिंदेना शिवसेना विधिमंडळाचे गटनेते 2019 ला MVA च्या आधी उध्दव ठाकरे यांनी नियुक्त केलं होतं. त्याच गटनेते शिंदेनी MVA च्या सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले.
2019 ला एकनाथ शिंदेंनी विधिमंडळ गटनेते या नात्याने अदित्य ठाकरे सोबत राजभवनावर जाऊन, MVA च्या सत्तास्थापनेसाठी वेळ वाढून द्या अशी विनवणी केली होती. आज तेच शिंदे अर्ध्या रात्री आसामला जाऊन तिथे बसून भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करतात. ते कशाच्या आधारे ?
गटनेतेपद हे पक्षप्रमुख देतात, 2019 ला अजित पवारांनी पहाटे शपथविधी केला तेव्हा NCP चे सर्वेसर्वा शरद पवारांनी त्यांचं गटनेतेपद काढून जयंत पाटील यांना गटनेते बनवलं होत. विधिमंडळ पक्ष हा त्याच्या राजकीय पक्षापासून वेगळा नाही. ते सर्व आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले असतात.
विधिमंडळात गटनेता पक्षप्रमुखाच्या सूचनेनुसारच काम करतो, कारण त्याची नेमणूक करणारे हे पक्षप्रमुखच असतात. त्यामुळे पक्षप्रमुख याना बाजूला करून मनमानी पद्धतीने गटनेत्यांनी मध्यरात्री चोरून कुणकु परस्पर आमदार घेऊन राज्याबाहेर पसार झाले. व तिथून पक्षप्रमुखाप्रमाणे फर्मान काढू लागले.👇
सध्या घडीला कोर्टातील सुनावणी ऐन निकालाच्या टप्प्यावर आहे. कायद्याचे जाणकाराच्या अभ्यास व अंदाजानुसार हे अपात्र आमदाराच प्रकरण हे कोर्ट विधानसभा अध्यक्षाकडे पाठवू शकत. यात कोर्ट अपात्र ठरवण्याच्या सबंधी निर्णय घेऊ शकत नाही. तस केल्यास हा विधिमंडळ क्षेत्रात बेकायदा प्रवेश असेल 👇
हे अपात्र प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकराकडे गेले आणि व्हीप जर सुनील प्रभू यांच्याकडे असला तर 16 चे 16 आमदार एक फटक्यात अपात्र होतील. पण त्यासाठी कोर्टाने अध्यक्षाना कालमर्यादा घालून देणे आवश्यक आहे. नाहीतर याचा निर्णय ते कधीही घेऊ शकतात.! ( उशिरा ) 👇
महाराष्ट्र सत्तासंघर्ष अतिशय घटनात्मक पेचात जाऊन अडकला आहे. तरीही ठाकरे गटाचा युक्तिवाद स्फटिकाप्रमाणे पारदर्शक आणि घटनेला श्रध्दाठिकाणी मांडून आहे. त्यांचे मुद्दे घटनापीठासमोर खरे उतरले तर हे शिंदेच सरकार जाऊन ठाकरे गटाला पुन्हा सोन्याचे दिवस येतील हा आशावाद करण्यास गैर नाही.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ठाकरे गटाचा युक्तिवाद - भाग दुसरा
कपिल सिब्बल -
१) शिवसेनेचा व्हीप कुणाकडे आहे ? इथे शिवसेनेचा व्हीप हा सुनील प्रभू यांच्याकडे आहे. आणि तो व्हीप पक्षातील सर्व आमदारांना बंधनकारक राहील, तो व्हीप सर्वाना पाळावा लागेल.
एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी राज्यपाल कसे बोलावतील ? कोण आहेत एकनाथ शिंदे? मी घटनात्मक शब्दात बोलत आहे. एकनाथ शिंदे हे गटनेते असल्याचा युक्तिवाद केला जात आहे. ते कोणत्या कायद्याखाली?
अर्थात -त्याना गटनेता कुणी बनवलं ( ठाकरेंनी ) आहे हा प्रश्न इथे उपस्थित होतोय 👇
( शिंदे गट ) तुम्ही स्वतःला पक्षाचे अधिकार देऊ शकत नाही. आसाम मध्ये बसून तुम्ही इतर पार्टीकडून मनोरंजन करून घेत आहात आणि जाहीरपणे सांगत का हा दुसरा पक्ष मला पाठींबा देत आहे. आणि तुम्ही स्वतःला राजकिय पक्ष असल्याचं सांगून पक्षाची घटना बदलवत आहात. 👇
ठाकरे गटाचा युक्तिवाद ―
कपिल सिब्बल ―
१) एक लहान पक्ष आहे ज्यामध्ये 5 सदस्य आहेत. त्यापैकी 2 सदस्य मी सरकारला पाठिंबा देणार नाही असे सांगत राज्यपालांकडे गेले तर राज्यपाल फ्लोर टेस्ट घेणार का? बहुसंख्य सदस्य विसरा, अशाने अल्पसंख्याक सदस्यही सरकार पाडू शकतात. #महाराष्ट्र 👇
विधानसभे मधील (सदनातील ) आमदारांच्या संख्याबळाने सरकार पडत नाही, किंवा पडणार नाही, तर ते सरकार मधील पक्षाच्या युती अथवा आघाडीने पाठींबा काढून घेतल्यावर सरकार पडू शकत, किंवा पडेल. 👇
आपण 'आया राम गया राम' या केसवर चाललो आहोत काय ? कारण आता तुम्ही ( शिंदे गट ) म्हणता राजकीय संबंधाने काही फरक पडत नाही, आणि तुम्ही महत्त्वाची ती गोष्ट म्हणजे संख्या. पण इथे लोकशाही म्हणजे संख्या नाही.👇
Breaking― भाजपला मोठा दणका
मुंबई हायकोर्टाने आज उध्दव ठाकरे व त्यांच्या कुटूंबाच्या संपत्तीची ED व CBI ने चौकशी करावी अशी याचिका फेटाळून लावली व याचिका कर्त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला
कोर्ट- ही याचिका कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करते. #ठाकरे#महाराष्ट्र#HC (१/४)
सदरील याचिका "गौरी भिडे" यांनी दाखल केली होती. पण माननीय उच्च न्यायालयाने यावर स्पष्टपणे सांगितलं आहे की सदरील याचिकेत कोणताही पुरावा समाविष्ट नाही. त्यामुळे कोर्ट प्रथमदर्शनी कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. (२/३)
कोणत्याही परिस्थितीत BMC मधील जो काही गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यासाठी उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा इथे थेट संबंध नाही. किंवा तसा पुरावाही नाही. ही याचीका कोणताही पुरावा नसताना दाखल केली आहे. त्यामुळेच ती फेटाळून लावण्यात आली आहे. (३/३)
आज 'एकनाथ षष्ठी' आजच्या दिवशी महाराष्ट्राचे थोर लोकप्रिय संत श्री एकनाथ महाराजांचे निर्वाण झाले. या षष्ठीच्या दिवसाचे महत्व एकनाथ महाराजांच्या आणि त्यांना मानणाऱ्या वर्गात अद्भुत असे आहे. ते असे की संत एकनाथ महाराज पैठण क्षेत्री जन्मले वाढले, वावरले. 👇
ईश्वरभक्तीचा आणि धर्माचा अभ्यास करण्याच्या आवडीने ते आपल्या आजोबांना न सांगता घरातून निघून गेले. आणि पोहचले थेट देवगिरी किल्ल्यावर तिथे त्याना किल्ल्याचे किल्लेदार जनार्दनपंत देशपांडे भेटले. हेच ते एकनाथ महाराजांचे गुरुवर्य जनार्दनस्वामी, स्वामीनी त्याना ज्ञानेश्वरी शिकवली.👇
व बाकी बऱ्याच अध्यात्मिक व धार्मिक बाबी अवगत करून दिल्या. पुढे ते पैठणला आले, तिथून त्यानी ठिकठिकाणी तीर्थयात्रा केली. ते हिंदु धर्माचे पीठ असलेल्या काशीला काही काळ राहिले तिथे त्यांनी मराठी भाषेत भागवत लिहल, यासाठी त्याना काशीच्या पंडिताकडून फार रोष सहन करावा लागला.👇
#Thread
छ. शिवाजी महाराजांचां वस्तुनिष्ठ व खरा इतिहास वाचण्यासाठी काही शिवचरीत्र व पुस्तके.
१) छत्रपती शिवाजी - सेतुमाधव पगडी
२) कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे - शिवचरित्र
३) छत्रपती शिवाजी महाराज - पुर्वाध आणि उत्तरार्ध- वा.सी बेंद्रे
४) श्री शिवछत्रपती - त्र्यं. श. शेजवलकर.👇
५) छ. शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ- जयसिंगराव पवार
६) शिवाजी अँड हिज टाईम्स - जदूनाथ सरकार
६) Rise of Maratha power- न्या रानडे
७) शिवाजी द ग्रेट - डॉ बाळकृष्ण
८) छ. शिवाजी नी त्यांची प्रभावळ- सेतुमाधव पगडी
९) मराठ्यांचे आरमार - भा.कृ. आपटे
१०) शककर्ते छ. शिवाजी महाराज- रियासतकार
११) शिवकाल - डॉ वि.ग खोबरेकर
१२) छ. शिवाजी महाराजांचीं पत्रे- प्र.न.देशपांडे
१३) शिवाजी कोण होता- गोविंद पानसरे
१४) दगलबाज शिवाजी- के.सी ठाकरे
१५) शिवछत्रपती एक मागोवा-जयसिंगराव पवार
१६) छ. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक- डॉ आह साळुंखे
१७) मोघल मराठा संघर्ष - सेतुमाधव पगडी
#सत्तासंघर्ष -3
एकनाथ शिंदे व त्यांचे वकील सांगत आहेत की आम्हाला MVA नको होती. त्यांच्यासाठी काही प्रश्न
१) MVA नको होती तर अडीच वर्षे मंत्रीपद कस काय घेतलं ?
२) सत्तास्थापनेच्या बैठकीत (नेहरू सेंटर) नार्वेकर, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या सोबत कशाला गेला होता ? ( ५/१)
३) विधिमंडळ नेत्याच्या जबाबदारीने सत्तास्थापने साठी अदित्य ठाकरे यांच्या सोबत सकाळीच 7-30 वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट का घेतली ?
४) राज्यपालांना का कळवले सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे परंतु एकूण बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत द्यावी ( ५/२)
५) राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेचे विधिमंडळ नेते म्हणून आपणांस निमंत्रित केले आणि सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. ते आवाहन का स्वीकारले !
तेव्हा MVA नको होती का ? तेव्हा कळलं कस नाही की काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, आपण युतीमधून लढलो आहोत, आघाडी नको. ( ५/३)