#पुस्तकआणिबरचकाही
कुमुदिनी रांगणेकर ( २५ मार्च १९०६ - १६ मार्च १९९९ ) कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार. ‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. 👇
त्यांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.‘अनियमित जग’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी. ‘प्रीतीचा शोध’, ‘फुललेली कळी’, ‘शकुनी मोहर’, ‘हरपलेलं गवसलं’, 👇
‘क्षणाचं वैधव्य’ या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबर्या आहेत. ‘चार उणे एक बरोबर दोन’, ‘स्वप्नातली कळी’, ‘मखमली वल्ली’ , ‘मर्मबंध’, ‘सोन्याची शिडी’, ‘गंधाविना चंदन’, ‘स्वप्नाळू प्रीतशकुनी मोहर’, ‘एकेरी गाठ’ , ‘कल्पना’ , ‘बेसूर संगीत’, ‘विरलेले वस्त्र’ , ‘परतदान’, ‘माळावरील 👇
शीर्षके अर्थपूर्ण व आकर्षक असत.रांगणेकरबाईंची मख्मली वल्ली ही बालकुमारांसाठीची साहस कादंबरी Baroness Orczy हिने लिहिलेल्या Beau Bracade या कादंबरीचा अनुवाद आहे. 'लांडा कारभार' हा पी.जी. वुडहाऊसच्या कादंबरीचा अनुवाद आहे. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)
#पुस्तकआणिबरचकाही
मालती बेडेकर (१८ मार्च १९०५ - ७ मे २००१) विख्यात मराठी कांदबरीलेखिका. अलंकार मंजूषा (१९३१) आणि काशीनाथ नरसिंह केळकर यांच्याबरोबर लिहिलेला हिंदू व्यवहार धर्मशास्त्र (१९३२) ह्या ग्रंथांचा समावेश त्यांच्या आरंभीच्या लेखनात होतो. तथापि कळ्यांचे निःश्वास (१९३३) 👇
हा त्यांचा पहिला कथासंग्रह विभावरी शिरुरकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध होताच मराठी साहित्यविश्वात मोठीच खळबळ उडाली. पुरुषी अहंकाराचे स्त्रियांवर होणारे आघात, वाढत्या कौमार्यकाळामुळे त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा ह्यांचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन त्यांनी ह्या संग्रहातील जिवंत 👇
कथातून घडविले होते. सहनशीलतेचा अंत झालेल्या स्त्रीमनाच्या विद्रोहाचा हा एक स्फोट होते. त्यामुळे विभावरी शिरुरकर हे नाव धारण करणारी व्यक्ती कोण असावी, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण त्यात त्यांना यश आले नाही. पुढे अनेक वर्षानी साखरपुडा या मराठी चित्रपटासाठी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
विष्णुशास्त्री चिपळूणकर : (२० मे १८५०–१७ मार्च १८८२). ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार.त्यांचे वडील कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला पुढे ते या मासिकाचे संपादक👇
झाले. निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी जवळजवळ एकटाकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधानी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि 👇
त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. ह्याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे 👇
#पुस्तकआणिबरचकाही
रा. ना. दांडेकर ( १७ मार्च १९०९ - ११ डिसेंबर २००१ ) मराठी, संस्कृत व इंग्लिश या भाषांमधून विपुल लेखन करून आपल्या विद्वत्तेची वारंवार प्रचिती आणून दिली आहे. या सर्वांत महत्त्वाचा ठरू शकेल, असा ग्रंथ म्हणजे त्यांनी केलेली वैदिक ग्रंथांची, लेखांची सूची (वैदिक 👇
बिब्लिओग्रफी - पाच भागांमध्ये) फ्रेंच विद्वान लुई रनू यांनी १९४५ पर्यंतच्या वैदिक अध्ययनाची एक सूची छापली होती. त्यानंतरच्या काळात संस्कृत, भारतविद्या यांच्यावर विपुल लेखन झाले.१९४५ पासून १९९० पर्यंतच्या पंचेचाळीस वर्षांच्या कालावधीत निरनिराळ्या कालखंडांसाठी बिब्लिओग्रफी-सूची 👇
छापली आहे. सुरुवातीला कोणत्या नियतकालिकातून लेख, परीक्षणे घेतली आहेत, त्यांची सूची आहे. नंतर विषयवार विभागणी करून (सुमारे १९० वर्ग) पुस्तके व लेख यांची अकारविल्हे यादी दिली आहे. अभ्यासकाला ही सूची त्याच्या मार्गदर्शकाइतकीच मार्गदर्शक ठरते. त्यांची ग्रंथसंपदा मोजकी असली, तरी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
कुमुदिनी रांगणेकर ( २५ मार्च १९०६ - १६ मार्च १९९९ ) कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.
‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. 👇
त्यांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले.
‘अनियमित जग’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी 👇
‘प्रीतीचा शोध’, ‘फुललेली कळी’, ‘शकुनी मोहर’, ‘हरपलेलं गवसलं’, ‘क्षणाचं वैधव्य’ या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबर्या आहेत.
‘चार उणे एक बरोबर दोन’, ‘स्वप्नातली कळी’, ‘मखमली वल्ली’ , ‘मर्मबंध’, ‘सोन्याची शिडी’, ‘गंधाविना चंदन’, ‘स्वप्नाळू प्रीतशकुनी मोहर’, ‘एकेरी गाठ’ , 👇
योगायोग या पहिल्याच प्रकरणात लाॅटरी घोटाळा इतका अवाढव्य असू शकतो.. हे वाचतांना थक्क होतो. गोव्यातील एक आमदार उघड आव्हान देतो, माझ्या बंगल्यावर रेव्ह पार्टी करतोय, हिम्मत असेल तर धाड टाकून दाखवा..एक आमदार जो पोलिसांना वाॅन्टेड असतांना सत्तधिशांच्या आशिर्वादाने राजरोस वावरतो...👇
एका डायरीच्य शेवटी लिहिलेल्या इ मेल चा शोध घेतांना दिल्लीत रोखलेले बाॅम्बस्फोट. तसेच दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाचा राजकीय स्वार्थासाठी कसा वापर झाला हे व राजकारणातील गुन्हेगारी वृत्ती कोणतीही भिडभाड न बाळगता व्यक्त झाली आहे. त्यांच्या वरिष्ठांबद्दल किंवा सहकाऱ्यांशी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सुधीर मोघे ( ८ फेब्रुवारी १९३९ - १५ मार्च २०१४ ) कवितेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कवितेलाच आपला प्राण मानणाऱ्या सुधीर मोघे यांचे शब्दमाध्यमावरचे प्रेम नितांत होते,
‘शब्दांना नसते दु:ख शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते’ 👇
या शब्दांतून सहज त्याचा प्रत्यय येतो.
कवी-गीतकार म्हणून सुधीर मोघे जेवढे आणि जसे श्रेष्ठ होते, तेवढे आणि तसेच ते संगीतकार म्हणूनही मोठे होते, त्यांनी संगीत दिलेल्या ‘कशासाठी प्रेमासाठी’ या मराठी चित्रपटाची गाणी जशी गाजली तशीच ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटाचीही गाजली. 👇
‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ या दूरदर्शनवरील मालिकांना त्यांनी दिलेले संगीत प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांनी ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारतें’ या हिंदी मालिकांनाही संगीत दिले. त्यांनी व्यावसायिक माहितीपटांची केलेली निर्मितीही त्यांच्यातील सर्जनशीलतेची ग्वाही देते. 👇