#पुस्तकआणिबरचकाही
विष्णुशास्त्री चिपळूणकर : (२० मे १८५०–१७ मार्च १८८२). ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार.त्यांचे वडील कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला पुढे ते या मासिकाचे संपादक👇
झाले. निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी जवळजवळ एकटाकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधानी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि 👇
त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. ह्याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे 👇
समीक्षात्मक निबंध लिहिले, ते पुढे संस्कृत कविपंचक ह्या नावाने प्रसिद्ध झाले. ह्या निबंधानी काव्यसमीक्षेच्या पाश्चात्त्य दृष्टीला महत्त्व दिले व प्राचीन कवींचा काल, कविता आणि कला ह्यांच्या मीमांसेत ऐतिहासिक दृष्टी वापरली. शालापत्रक, निबंधमाला, केसरी आदी नियतकालिकांतून 👇
विष्णुशास्त्र्यांनी जे लेखन केले ते भाषा-साहित्यविषयक, सामाजिक, राजकीय असे विविध प्रकारचे आहे. त्यांच्या भाषा-साहित्यविषयक लेखांत मराठी भाषेची तत्कालीन स्थिती, भाषापद्धती, परभाषेतील शब्दांची योजना, इंग्रजी भाषा, कविता, विद्वत्व आणि कवित्व, ग्रंथांवरील टीका वगैरे विषयांवरील 👇
लेखन अंतर्भूत आहे. लोकभ्रम, अनुकरण, गर्व ह्यांसारखे विषय त्यांच्या सामाजिक लेखनात आलेले आहेत. ‘आमच्या देशाची स्थिती’ आणि ‘मुद्रणस्वातंत्र्य हे दोन लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय होत. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)
#पुस्तकआणिबरचकाही
रिचर्ड फ्रान्सिस बर्टन(१९ मार्च १८२१-२० ऑक्टोबर १८९०) प्रसिद्ध इंग्लिश समन्वेषक, चतुरस्त्र विद्यावंत, बहुभाषाविद, अरेबियन नाइट्सचा श्रेष्ठ इंग्रजी भाषांतरकार तसेच बहुप्रसू लेखक. "माणसाला जे योग्य वाटते ते मनसोक्त करणे म्हणजे पुरुषार्थ" असे सांगणारा बर्टन. 👇
एकोणिसाव्या शतकात एवढं अद्भुत विलक्षण आणि नाट्यपूर्ण जीवन जगलेला दुसरा कुणी झालाच नाही. बाळ सामंत यांनी अनेक वर्ष प्रचंड अभ्यास तसेच देशा परदेशात ठिक ठिकाणी भेटी देऊन रिचर्ड बर्टन चे चरित्र या "शापित यक्ष" या पुस्तकात अतिशय ओघवत उत्तमरित्या रंजक शैलीत सादर केले आहे. 👇
ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी पत्करून हिंदुस्थानात आले. येथील त्याच्या वास्तव्यात त्याने अरबी, फार्सी, हिंदी (हिंदुस्थानी), मराठी वगैरे भाषा आणि अनेक बोली आत्मसात केल्या. (आयुष्याच्या अखेरीस त्यांना २५ भाषा व १५ बोली अवगत होत्या, असे म्हटले जाते). कराचीत असताना त्यांनी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सई परांजपे ( १९ मार्च १९३८ ) मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.सई परांजपे हे नाव त्यांच्या 👇
बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरुवातच मुळात बाल वयातील लेखीका म्हणून झाली. 👇
पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिऱ्या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत.कथा, चष्मेबद्दूर अशा हलक्या 👇
#पुस्तकआणिबरचकाही
मालती बेडेकर (१८ मार्च १९०५ - ७ मे २००१) विख्यात मराठी कांदबरीलेखिका. अलंकार मंजूषा (१९३१) आणि काशीनाथ नरसिंह केळकर यांच्याबरोबर लिहिलेला हिंदू व्यवहार धर्मशास्त्र (१९३२) ह्या ग्रंथांचा समावेश त्यांच्या आरंभीच्या लेखनात होतो. तथापि कळ्यांचे निःश्वास (१९३३) 👇
हा त्यांचा पहिला कथासंग्रह विभावरी शिरुरकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध होताच मराठी साहित्यविश्वात मोठीच खळबळ उडाली. पुरुषी अहंकाराचे स्त्रियांवर होणारे आघात, वाढत्या कौमार्यकाळामुळे त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा ह्यांचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन त्यांनी ह्या संग्रहातील जिवंत 👇
कथातून घडविले होते. सहनशीलतेचा अंत झालेल्या स्त्रीमनाच्या विद्रोहाचा हा एक स्फोट होते. त्यामुळे विभावरी शिरुरकर हे नाव धारण करणारी व्यक्ती कोण असावी, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण त्यात त्यांना यश आले नाही. पुढे अनेक वर्षानी साखरपुडा या मराठी चित्रपटासाठी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
रा. ना. दांडेकर ( १७ मार्च १९०९ - ११ डिसेंबर २००१ ) मराठी, संस्कृत व इंग्लिश या भाषांमधून विपुल लेखन करून आपल्या विद्वत्तेची वारंवार प्रचिती आणून दिली आहे. या सर्वांत महत्त्वाचा ठरू शकेल, असा ग्रंथ म्हणजे त्यांनी केलेली वैदिक ग्रंथांची, लेखांची सूची (वैदिक 👇
बिब्लिओग्रफी - पाच भागांमध्ये) फ्रेंच विद्वान लुई रनू यांनी १९४५ पर्यंतच्या वैदिक अध्ययनाची एक सूची छापली होती. त्यानंतरच्या काळात संस्कृत, भारतविद्या यांच्यावर विपुल लेखन झाले.१९४५ पासून १९९० पर्यंतच्या पंचेचाळीस वर्षांच्या कालावधीत निरनिराळ्या कालखंडांसाठी बिब्लिओग्रफी-सूची 👇
छापली आहे. सुरुवातीला कोणत्या नियतकालिकातून लेख, परीक्षणे घेतली आहेत, त्यांची सूची आहे. नंतर विषयवार विभागणी करून (सुमारे १९० वर्ग) पुस्तके व लेख यांची अकारविल्हे यादी दिली आहे. अभ्यासकाला ही सूची त्याच्या मार्गदर्शकाइतकीच मार्गदर्शक ठरते. त्यांची ग्रंथसंपदा मोजकी असली, तरी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
कुमुदिनी रांगणेकर ( २५ मार्च १९०६ - १६ मार्च १९९९ ) कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.
‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. 👇
त्यांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले.
‘अनियमित जग’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी 👇
‘प्रीतीचा शोध’, ‘फुललेली कळी’, ‘शकुनी मोहर’, ‘हरपलेलं गवसलं’, ‘क्षणाचं वैधव्य’ या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबर्या आहेत.
‘चार उणे एक बरोबर दोन’, ‘स्वप्नातली कळी’, ‘मखमली वल्ली’ , ‘मर्मबंध’, ‘सोन्याची शिडी’, ‘गंधाविना चंदन’, ‘स्वप्नाळू प्रीतशकुनी मोहर’, ‘एकेरी गाठ’ , 👇
#पुस्तकआणिबरचकाही
कुमुदिनी रांगणेकर ( २५ मार्च १९०६ - १६ मार्च १९९९ ) कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार. ‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. 👇
त्यांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.‘अनियमित जग’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी. ‘प्रीतीचा शोध’, ‘फुललेली कळी’, ‘शकुनी मोहर’, ‘हरपलेलं गवसलं’, 👇
‘क्षणाचं वैधव्य’ या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबर्या आहेत. ‘चार उणे एक बरोबर दोन’, ‘स्वप्नातली कळी’, ‘मखमली वल्ली’ , ‘मर्मबंध’, ‘सोन्याची शिडी’, ‘गंधाविना चंदन’, ‘स्वप्नाळू प्रीतशकुनी मोहर’, ‘एकेरी गाठ’ , ‘कल्पना’ , ‘बेसूर संगीत’, ‘विरलेले वस्त्र’ , ‘परतदान’, ‘माळावरील 👇