स्त्रियांनी बाहेर पुरुषांप्रमाणे काम करू नये या मताचा मी अजिबात नाही उलट स्त्रियांनी आजच्या जमान्यामध्ये स्वावलंबीच असावे हे माझे आग्रही मत असते. परंतु हे मत बनण्यामागे समाज कारणीभूत आहे. समाजाने सगळ्यांच्याच अपेक्षा बदलवून ठेवलेले आहेत.
काही दशकांपूर्वी जवळपास सर्व घरांमध्ये पुरुष काम करायचे व स्त्रिया घर सांभाळायच्या. त्यावेळेला मोठे घर किंवा फॉरेन ट्रिप या अपेक्षा देखील नव्हत्या. आता सामाजिक बदलानुसार स्त्रिया नोकरी करायला लागल्या व त्यानंतर नवरा व बायको दोन्ही कमवायला लागले त्यामुळे आपसूक सुरुवातीला काही
कुटुंबांमध्ये भरपूर पैसा येऊ लागला. ज्या ठिकाणी एकाच माणसाचे उत्पन्न येत होते तेथे दोन माणसांचे उत्पन्न येऊ लागले. हळूहळू काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली. नवरा बायको दोन्ही काम करत आहेत अशा कुटुंबांची संख्या वाढली. त्यामुळे सामाजिक परिस्थिती ही पूर्ण बदलली.
काही दशकांपूर्वी ज्या सर्वसाधारण अपेक्षा मुलीचे असायच्या त्या पुन्हा समाजाने आज बदलायला भाग पाडले आहे. पूर्वी आपला नवरा सदाचारी निर्व्यसनी आपल्याला व्यवस्थित वागणूक दिली करायला घर, कपडे वा प्रेम करेल या होत्या. कारण तेव्हाचे सामाजिक स्टेटस हेच होते.
परंतु आता सामाजिक स्टेटस या गोष्टीची व्याख्या बदलल्यामुळे मुलीच्या अपेक्षाही बदलल्या. लग्नानंतर आपल्याला कोणते आयुष्य अपेक्षित आहे या गोष्टींमध्ये मूलभूत फरक झाला.
आता यामध्ये अजून एक गंमत ती म्हणजे प्रत्येक मुलगी काही आज नोकरी करत नाही. परंतु आजूबाजूला बघताना समाजातील स्टेटस
तिच्या मनात असते. व आपल्या भविष्यामध्ये देखील आपले स्टेटस व आपल्या मुलांची सुरक्षितता व आपले स्टेटस याप्रमाणे तिच्या अपेक्षा तयार होतात. हा एक महत्त्वाचा गोंधळ असल्याचा मुद्दा आहे. कारण येथे या मुलींना क्लॅरिटी नसते की ज्या ठिकाणी नवरा बायको दोघे काम करत आहेत
त्या ठिकाणीच दोन बीएचके तीन बीएचके किंवा कार बंगले फॉरेन ट्रिप अशा गोष्टींची अपेक्षा वास्तवात येऊ शकते.
परंतु आजूबाजूच्या निम्म्या मुली लग्नानंतर असे आयुष्य जगत आहेत त्यामुळे त्यांनी देखील आपल्या मनात हेच स्वप्न बाळगले असते ही लग्नानंतर आपल्याला देखील हेच आयुष्य मिळावे.
परंतु त्यासाठी त्यांना देखील नोकरी करणे आवश्यक आहे किंवा आपली जी स्वप्न आहेत त्यासाठी स्वतः निम्मा हातभार लावणे आवश्यक आहे ही गोष्ट सोयीस्करपणे त्या टाळतात. त्यामुळे आजकाल मुलींच्या अपेक्षा अवस्था वाढलेल्या आहेत ही चर्चा समोर येते ती यामुळेच.
थोडक्यात सांगायचे झाले तर मुळात निसर्गाने स्त्री व पुरुष यांना वेगळे बनवलेले. त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत. दोघांनी स्वतःचे परीघ मर्यादा लक्षात घेऊन दुसऱ्यांचा आदर आणि स्वातंत्र्य शाबूत ठेवणे हे अपेक्षित असते.
परंतु माणसांमध्ये या गोष्टी घडलेल्या नाहीत. आपल्या विकसित बुद्धीमुळे आपण निसर्गाला प्रत्येक लेव्हलवर विरोधच करत आलेलो आहोत व त्यातील हा सामाजिक विरोध अत्यंत महत्त्वाचा आहे व तो आपण लक्षात देखील घेत नाही.
मुली च नेहमी अपेक्षा का सांगणार मुलांबद्दल..आज मी पण लिस्ट मांडणारच.🤓😒🙄 1. मुलीचे नाव भारतीय संस्कृतीला शोभेल असे असावे. 2. सोनेरी कुरळे लांबसडक केस (नैसर्गिक जन्मतः असलेले) 3. डोळे निळे असावेत. (जन्मतः) 4. तिच्या आई-वडिलांची काळजी तिने घ्यावी माझ्या आई-वडिलांची काळजी मी घेईन.
5. ती तिच्या घरी राहील मी माझ्या घरी राहीन. 6. आठवड्यात विकेंड सोडून दोन तीन वेळा ब्रेकफास्ट व डिनरला भेटण्यास हरकत नाही. 7. बाबू बिबू असे बाराखडी वाले शब्द न वापरता नावाने हाक मारणारी असावी. 8. रंग अत्यंत गोरा व त्वचा अत्यंत नितळ व सुंदर असावी. 9. दिसायला कमीत कमी जेनिफर connely
किंवा Alexandra Daddario सारखी असावी.
ज्यांना माहित नसेल त्यांच्या रेफरन्स साठी फोटो देत आहे. 10. माझे घर हे तिचेच आहे त्यामुळे ती दोन आठवड्यातून एक दोन वेळा किंवा मला बरे वाटत नसेल अशा वेळेला माझी काळजी घ्यायची इच्छा असेल तर राहायला येऊ शकते. 11. मी देखील तिला बरे नसताना तिच्या
नर आणि मादी या निसर्गाने तयार केलेल्या मुख्य जाती आहेत. त्यांच्यामध्ये काही नैसर्गिक गुण किंवा basic instincts निसर्गानेच टाकून ठेवलेले आहेत.
जवळपास प्रत्येक प्राणी व पक्षी यांच्यामध्ये नर आपली टेरिटेरी, ग्रुप जपतो किंवा राहण्याची जागा तयार करतो, घरटे बांधतो, आपल्या सुंदर केसांचा पिसारा फुलवून दाखवतो किंवा नृत्य करतो किंवा विविध आवाज व आकर्षक रंग दाखवतो.
मुळातच मादी हे पुनरुत्पादन या गोष्टीसाठी निसर्गाने तयार केलेली असल्याने तिच्यामध्ये एक गुण असतो तो म्हणजे विशिष्ट क्वालिटी किंवा गुणधर्म असलेलाच नर तिला भावतो. त्यामागे देखील नैसर्गिक कारण हे नाहीये की तो सुंदर आहे किंवा फिजिकली आहे. त्यामध्ये निसर्गाचे कारण आहे की होणारी अपत्ये
इथे बऱ्याच मुली स्त्रिया या @sonalikulkarni काही वक्तव्यावरून तिच्यावर बराच काही भडिमार करत आहेत. 1. त्यापैकी किती मुली ज्यांचे लग्न झालेले नसेल, त्या नोकरी न करणारा व घरी बसून असलेल्या मुलाशी लग्न करायला तयार होतील?
किंवा यापैकी लग्न झालेल्या किती मुलींनी असे इमॅजिन केले असेल लग्नाच्या आधी की आपला होणारा नवरा घर सांभाळेल व घरातच बसलेला असेल. 2. किती मुली लग्नाच्या आधी स्वतःचा फ्लॅट घेऊन (गुंतवणूक म्हणून नाही) त्या फ्लॅटमध्ये लग्न झाल्यावर आपण राहू याबद्दल खरंच विचार करतात?
मला तरी माझ्या आयुष्यात अशी एकही मुलगी दिसलेली नाही जी असे म्हणेल की माझ्या नवऱ्याने काहीही कमवायची गरज नाही मी त्याला सांभाळेल आमचा संसार देखील सांभाळून त्याने फक्त घरकाम बघाव.
अर्थात मला याचे दुसरी बाजू देखील समजते. आपल्याकडे किंवा एकूणच बऱ्याचशा देशांमध्ये व संस्कृतीमध्ये
आळशी हा शब्द चुकला असेल.
परंतु मला सांग अशा किती मुली आहेत ज्या इमॅजिनेशन मध्ये देखील विचार करू शकत असतील की आपला होणारा नवरा काहीच कमवत नाही घरी बसलेला आहे व आपण सर्व घर चालवत आहोत.
समाजाने पाडून दिलेली पद्धत म्हण किंवा काहीही कारण असू देत.घरदार, भरपूर पगार, settle असलेला मुलगाच
मुलींना लागतो.
किती मुली अशा विचार करतात की आपण स्वतःचे घर घेऊया व लग्न झाल्यावर आपला नवरा आणि आपण तिथे एकत्र राहू?
हातावर मोजण्या इतक्या देखील नसतील.
जास्तीत जास्त मुली या कमवत असल्या तरी देखील स्वतःच्या पैशाने घर शक्यतो घेत नाहीत.
याला अपवाद नाहीत असे नाही परंतु मुळात विचारसरणीच अशी नाहीये.
उलट जे कष्टकरी वर्गातील लोक आहेत त्यांच्यात स्त्रिया कमावतात इतरांकडे जाऊन धुणी भांडी करतात परंतु नवरे बसून फक्त दारू पितात.
परंतु मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय यामध्ये फक्त स्त्री कमवत आहे असे क्वचित दिसेल आणि ते
आपल्याला स्वतःची इच्छा/मर्जी असे काही आहे का? के आपल्याला वाटते की आपण काहीतरी स्वतःच्या मर्जीने करीत आहोत परंतु ती मर्जी देखील कोणीतरी आधीच ठरवलेली असते??
कॉम्प्युटर किंवा मोबाईल आणि आपण यात बरेच साम्य आहे.
आपल्या शरीर म्हणजेच एका प्रकारे कम्प्युटरचे हार्डवेअर.
आपला मेंदू व त्याचे विविध भाग म्हणजे एका प्रकारे कम्प्युटरचा प्रोसेसर व मेमरी.
योगशास्त्रानुसार आपले चार देह आहेत.
स्थूल
सूक्ष्म
कारण
आणि महाकारण
यामध्ये स्थूल देह व कम्प्युटरचे हार्डवेअर या गोष्टी अगदी सहजपणे समजून येऊ शकतात.
सूक्ष्म देह म्हणजे आपल्या मनाच्या जाणीवेवर चाललेल्या गोष्टी. मग ते स्वप्न असो किंवा कोणत्याही भावना.
कॉम्प्युटर मध्ये आपण याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणू शकतो.
कॉम्प्युटरचे कितीही भाग एकत्र आणले त्यात प्रोसेसर असला मेमरी असली व त्याला पॉवर सप्लाय दिलेला असला तरी देखील त्यावर काम करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा त्यावर कोणतीतरी ऑपरेटिंग सिस्टीम असेल. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कोणतेही सॉफ्टवेअर तेथे लोड होऊ शकत नाही.