#पुस्तकआणिबरचकाही
रिचर्ड फ्रान्सिस बर्टन(१९ मार्च १८२१-२० ऑक्टोबर १८९०) प्रसिद्ध इंग्लिश समन्वेषक, चतुरस्त्र विद्यावंत, बहुभाषाविद, अरेबियन नाइट्सचा श्रेष्ठ इंग्रजी भाषांतरकार तसेच बहुप्रसू लेखक. "माणसाला जे योग्य वाटते ते मनसोक्त करणे म्हणजे पुरुषार्थ" असे सांगणारा बर्टन. 👇
एकोणिसाव्या शतकात एवढं अद्भुत विलक्षण आणि नाट्यपूर्ण जीवन जगलेला दुसरा कुणी झालाच नाही. बाळ सामंत यांनी अनेक वर्ष प्रचंड अभ्यास तसेच देशा परदेशात ठिक ठिकाणी भेटी देऊन रिचर्ड बर्टन चे चरित्र या "शापित यक्ष" या पुस्तकात अतिशय ओघवत उत्तमरित्या रंजक शैलीत सादर केले आहे. 👇
ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी पत्करून हिंदुस्थानात आले. येथील त्याच्या वास्तव्यात त्याने अरबी, फार्सी, हिंदी (हिंदुस्थानी), मराठी वगैरे भाषा आणि अनेक बोली आत्मसात केल्या. (आयुष्याच्या अखेरीस त्यांना २५ भाषा व १५ बोली अवगत होत्या, असे म्हटले जाते). कराचीत असताना त्यांनी 👇
समलिंगी कुंटनखान्यावर लिहिले त्यामुळे सैनिकी कारकीर्द संपुष्टात आली. हिंदुस्थानावर त्यांनी चार ग्रंथ लिहिले. त्यांपैकी सिंध अँड द रेसिस दॅट इन्हॅबिट द व्हॅली ऑफ द इंडस हा ग्रंथ विशेष गाजला. मुस्लिम यात्रेकरूच्या वेषात बर्टनने मक्का व मदिना या दोन पवित्र स्थळांची यात्रा करून👇
प्रवासातील आपले अनुभव पर्सनल नॅरेटिव्ह ऑफ पिल्ग्रिमेज टू एल् मदिना अँड मक्का या प्रवासवर्णनात ग्रथित केले आहेत. बर्टनच्या आयुष्यातील बराचसा काळ सफरी व लेखन-वाचनांतच गेला. त्यांचे विविध विषयांवरील पन्नासांहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध झाले असून त्याने अनेक ग्रंथांची भाषांतरे केली 👇
अनेक ग्रंथांची भाषांतरे केली आहेत. त्यांपैकी लुझीअड्स या पोर्तुगीज महाकाव्याचा तसेच अरेबियन नाइट्सचे १६ खंड व कामसूत्र ऑफ वात्स्यायन हे अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत. आयुष्याच्या अखेरीस त्यास सर हा किताब मिळाला . त्याच्या पत्नीने त्याचे चरित्र लिहिले आहे तथापि व्हिक्टोरियन 👇
काळातील सामाजिक व नैतिक संकेतानुसार आपल्या पतीवर दूर्वर्तनाचा अक्षय येईल या भीतीने बर्टनचा द परफ्युम्ड गार्डन हा ग्रंथ, काही दैनंदिन्या, टिपनवह्या तिने नष्ट केल्या. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)
#पुस्तकआणिबरचकाही
वसंत शंकर कानेटकर (२० मार्च १९२२ – ३० जानेवारी २००१) लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत.प्राध्यापक असतानाच त्यांनी लघुकथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून आपली लेखन कारकीर्द सुरू केली. मनोहर आणि सत्यकथा यांसारख्या नियतकालिकांमधून लिहिलेल्या 👇
लघुकथा प्रसिद्ध झाल्या. १९५० ते १९५७ याकाळात त्यांच्या घर, पंख आणि पोरका या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. १९५७ मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. कालबाह्य रूढी-परंपरा आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलेल्या एका मनस्वी, कलासक्त, संपन्न व्यक्तिमत्त्वाची 👇
ही शोकांतिका. प्रेमा, तुझा रंग कसा?, ही एक हलकी-फुलकी विनोदी, खेळकर सुखात्मिका होती. कानेटकरांनी रायगडाला जेव्हां जाग येते या ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील पिता-पुत्राच्या संबंधांचे अंतरंग मांडले.हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले.👇
#पुस्तकआणिबरचकाही
एडगर राइज बरोज ( १ सप्टेंबर १८७५ - १९ मार्च १९५९ ) टारझन हे नाव न ऐकलेलं क्वचितच कोणीतरी असेल. एका इंग्लिश उमरावाचा मुलगा आई वडिलांचे छत्र हरवून आफ्रिकेच्या निबिड अरण्य एप्सच्या टोळी सोबत वाढतो. डोळ्याचं पातं लावताना लावतो तोच वेलींच्या आधारे एका झाडावरून 👇
दुसऱ्या झाडावर तिथून तिसऱ्या झाडावर असा लिहिलया प्रवास करू शकतो. अंगावर फक्त एक व्याघ्राजीन, कमरेला लटकणारा धारदार सुरा, मानेवर रुळणारे केस आणि पिळदार शरीरयष्टी. एडगर राइज बरोज ने टारझन या पात्राची पहिली कथा लिहिली १९१२ मधे. बघता बघता टारझन इतका लोकप्रिय झाला की बरोजने 👇
टारझनवर २६ कादंबऱ्या लिहिल्या. हॉलीवुड निर्मात्यांच या हिरो वर गेल्या शंभर वर्षांपासून सिनेमे बनवनं सुरुच आहे. टारझन वर कॉमिक्स व ॲनिमेशन फिल्म सुद्धा बनल्या. मंगळ सफारी करणारा जॉन कार्टर हा दुसरा मानसपुत्र विज्ञान कथा चाहत्यांमध्ये लोकप्रिय होता. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सई परांजपे ( १९ मार्च १९३८ ) मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.सई परांजपे हे नाव त्यांच्या 👇
बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरुवातच मुळात बाल वयातील लेखीका म्हणून झाली. 👇
पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिऱ्या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत.कथा, चष्मेबद्दूर अशा हलक्या 👇
#पुस्तकआणिबरचकाही
मालती बेडेकर (१८ मार्च १९०५ - ७ मे २००१) विख्यात मराठी कांदबरीलेखिका. अलंकार मंजूषा (१९३१) आणि काशीनाथ नरसिंह केळकर यांच्याबरोबर लिहिलेला हिंदू व्यवहार धर्मशास्त्र (१९३२) ह्या ग्रंथांचा समावेश त्यांच्या आरंभीच्या लेखनात होतो. तथापि कळ्यांचे निःश्वास (१९३३) 👇
हा त्यांचा पहिला कथासंग्रह विभावरी शिरुरकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध होताच मराठी साहित्यविश्वात मोठीच खळबळ उडाली. पुरुषी अहंकाराचे स्त्रियांवर होणारे आघात, वाढत्या कौमार्यकाळामुळे त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा ह्यांचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन त्यांनी ह्या संग्रहातील जिवंत 👇
कथातून घडविले होते. सहनशीलतेचा अंत झालेल्या स्त्रीमनाच्या विद्रोहाचा हा एक स्फोट होते. त्यामुळे विभावरी शिरुरकर हे नाव धारण करणारी व्यक्ती कोण असावी, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण त्यात त्यांना यश आले नाही. पुढे अनेक वर्षानी साखरपुडा या मराठी चित्रपटासाठी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
विष्णुशास्त्री चिपळूणकर : (२० मे १८५०–१७ मार्च १८८२). ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार.त्यांचे वडील कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला पुढे ते या मासिकाचे संपादक👇
झाले. निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी जवळजवळ एकटाकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधानी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि 👇
त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. ह्याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे 👇
#पुस्तकआणिबरचकाही
रा. ना. दांडेकर ( १७ मार्च १९०९ - ११ डिसेंबर २००१ ) मराठी, संस्कृत व इंग्लिश या भाषांमधून विपुल लेखन करून आपल्या विद्वत्तेची वारंवार प्रचिती आणून दिली आहे. या सर्वांत महत्त्वाचा ठरू शकेल, असा ग्रंथ म्हणजे त्यांनी केलेली वैदिक ग्रंथांची, लेखांची सूची (वैदिक 👇
बिब्लिओग्रफी - पाच भागांमध्ये) फ्रेंच विद्वान लुई रनू यांनी १९४५ पर्यंतच्या वैदिक अध्ययनाची एक सूची छापली होती. त्यानंतरच्या काळात संस्कृत, भारतविद्या यांच्यावर विपुल लेखन झाले.१९४५ पासून १९९० पर्यंतच्या पंचेचाळीस वर्षांच्या कालावधीत निरनिराळ्या कालखंडांसाठी बिब्लिओग्रफी-सूची 👇
छापली आहे. सुरुवातीला कोणत्या नियतकालिकातून लेख, परीक्षणे घेतली आहेत, त्यांची सूची आहे. नंतर विषयवार विभागणी करून (सुमारे १९० वर्ग) पुस्तके व लेख यांची अकारविल्हे यादी दिली आहे. अभ्यासकाला ही सूची त्याच्या मार्गदर्शकाइतकीच मार्गदर्शक ठरते. त्यांची ग्रंथसंपदा मोजकी असली, तरी 👇