#कार्यकर्ता
ते नेत्याच्या मुलाला/मुलीला तडफदार,धाडसी,कणखर,गरिबांचे कैवारी, एका हाकेला धावणारे नेतृत्व अस म्हणणं गरजेचचं आहे काय??
त्यांच्या मागे फिरणार्या गर्दीत एखांद उद्याच नेतृत्व नाही होऊ शकत का? आमदाराच्या बर्थडे ला केक घेऊन पळत जाणारी त्याच्या पोराच्या बर्थडेला पण पळत जातात
आणि सामाजिक माध्यमांवर त्यांनी दिलेल्या फक्त शुभेच्छा वाचायच्या!
एकापेक्षा एक असतात. अरे तो गडी बाहेरच्या देशात शिकुन आत्ताशी कुठ आपल्या मातीत आलाय त्याला एखाद्या चौकाच नाव तरी पाठ होऊद्या आधी 😂
अशी चाटायची प्रथा चालवणार्या कार्यकर्त्यांची कुठेच कमी नाहीय. या सगळ्यांमुळेच
नेत्याची ही पोरं कर्तृत्व नसताना सामान्य जनतेच्या बोकांडी बसवायचा प्रयत्न केला जातो. या पोरासोरांना आधी मतदारसंघाची रचना माहिती नाही, लोकसंख्या माहिती नाही, लोकांच्या गरजा पण माहिती नाहीत एव्हढचं काय तर सामान्य जनतेशी चर्चा करून माहिती नाही 😄
काय तर फक्त दोन चार कामं पदरात पाडुन
घेण्यासाठी एव्हढी चाटायची??
हे भावी नेतृत्व आपल्याच कार्यकर्त्याची चार चौघात अब्रु काढतात. तेव्हा तो कार्यकर्ता पण मिश्किल हसतो आणि वेळ मारून नेतो. त्याच्या बापाबर मैदानावर ज्याने काम केलय, पार गल्लीबोळ पालथे घातलेत, गुडघ्यात पाणी होईस्तोर पळलाय आज त्याचीच चार चौघात चेष्टा केली
जाते आणि तरी हा कार्यकर्ता पाठीत कणा नसल्यासारखा मान खाली घालुन तिथच उभारलेला असतोय.
नेत्यानं फोन केला की बायका पोरं, घरदार सगळं टाकुन हा गडी हजरी लावतो. राजकारणासाठी घरचा व्यवसाय, नोकरी याकडे गांभीर्याने न पाहता 'लष्कराच्या भाकर्या भाजण्याचा' प्रकार करण्यास प्राधान्य देतो.
मी
अस म्हणत नाही की सरसकट सगळ्या कार्यकर्त्यांचाच ही नेतेमंडळी वापर करते. काही कार्यकर्ते धुर्तपणे आपल्या पोळ्या भाजुन घेतात पण काहींना ते बोट वाकड करून तुप काढायला जमत नाही. अश्या कार्यकर्त्यांचा फक्त आणि फक्त कामगार मुंगीसारखा वापर करुन मलिदा खायच्या ऐनवेळी त्यांना बाजुला सारलं
जातं.
या नेत्यांच्या मागेमागे फिरत स्वताच उमेदीचं वय वाया घालवणार्या तरूणांना दुसर्या पक्षातले लोकं जेव्हा खोट्या केसेस खाली पोलिस कारवाईच्या ससेमिर्या मागे लावतात तेव्हा यांना मदत करायला किती नेते पुढे येतात??
हा पण पाहण्यासारखा विषय आहे. आपल्या स्वताची आणि आपल्यावर जीव ओवाळून
टाकणारी आपली लोकं यांचा सांभाळ करून उरलेल्या फावल्या वेळेत तुम्ही खुशाल या नेतेमंडळींचे झेंडे घेऊन फिरा.परवा एक जवळचाच मित्र हार्ट ॲटॅकने वारला, तो जिवंत असताना सामाजिक माध्यमांवर दिवसरात्र एका नेत्याच्या पोस्ट शेअर करायचा.त्यांचे कौतुक करणारे पोस्ट टाकायचा, स्वताकडे आणि
स्वताच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मागेमागे फिरायचा. तो नेता आला की कार्यक्रम ठेवायचा. कायम सत्कार, हार-श्रीफळ, शाल, बुके यावर २००-५०० रू. खर्च करायचा. आता त्याला वारून ८ दिवस झालेत पण आणखी त्या नेत्याने मित्राच्या घराकडे चक्कर पण मारली नाहीय ना त्याच्या घरच्यांची
आस्थेने चौकशी केली आहे.
एव्हढच सांगु वाटत की 'राजकारणातली मुल्य हरवत चालली आहेत' त्यामुळे आपण त्यात किती गुंतवुन घ्याव या गोष्टीचाही विचार करावा.🙏❤️ #वसुसेन#राजकारण#कार्यकर्ता#नेता
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बाबांनो ते आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून या रे!
दरवेळीस सरकार शेवटची तारीख शेवटची वाॅर्निंग म्हणतय खर पण यावेळी सरकारने मनावर घेतलेलं दिसतय. 🧐 ३१ मार्च २०२३ ही आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख असल्याने पटापट सगळ्यांनी लिंक करा नाहीतर १ एप्रिलपासुन तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय
होईल.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की
Central Board Of Direct Taxes( CBDT) ने ३१ मार्च २०२२ पर्यंत पॅन आधार लिंक करण्याची मुदत दिली होती. ती मुदत ३० जुन २०२२ पर्यंत वाढवली पण ५०० रूपये दंड आकारून!
आणि ३० जुन २०२२ च्या पुढे ५०० रूपये दंडाची रक्कम १००० रूपये करण्यात आलीय याचाच अर्थ
ज्या लोकांनी आणखी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेल नाहीय त्यांना आधी १००० रूपये दंडात्मक रक्कम भरावी लागेल. ती पण ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत आहे. जर तरीपण तुम्ही आधार पॅन लिंक केल नाहीच तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि तुम्हाला जर पॅन कार्ड चालु करायचे असेल तर त्यासाठी
अख्ख्या भारताच्या जीडीपीमध्ये ज्या राज्याचा वाटा जवळपास १५% आहे त्या राज्याची जी हालअपेष्ठा चालवलीय ते पाहुन दुःख होतय 🤕🙏
शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यावर फक्त आणि फक्त मागील सरकारला कमीपणा दाखवण्यासाठी मविआने मंजुर केलेले आणि नियोजित असणारे प्रकल्प #threadकर#वसुसेन
रद्द करून नवीन प्रकल्प आणले ज्याचा 'नियोजित खर्चा'वर ६० हजार कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. Economic survey नुसार २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रावरील कर्ज ५.७२ लाख कोटी होते ते चालु आर्थिक वर्ष संपेपर्यंत ६.४९ लाख करोडपर्यंत जाईल.
सध्या महाराष्ट्रात देशातील सगळ्यात जास्त स्टार्ट अप्स
असुन आकडेवारी पाहता एकुण १६०१४ स्टार्ट अप्स आणि त्यात एकुण १.७ लाख कर्मचारी काम करतात.
काॅम्प्युटर साॅफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात महाराष्ट्रात मागील ९ महिन्यात ६३,८१९ कोटींची परकीय गुंतवणूक झालीय पण मागील वर्षीपेक्षा ही गुंतवणूक तब्बल १६% नी कमी आहे.
महाराष्ट्राच्या उभारणीत
तिकड पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान पळुन गेलाय तर इकडे 'खालिस्तान चळवळी' चा चेहरा बनण्याचा प्रयत्न करणारा अम्रितपाल पळुन गेलाय..
दोघं पण पंजाब मधुन पळुन गेले आहेत 😄
एक पंजाब पाकिस्तानातला तर एक पंजाब भारतातला! #ImranKhan#AmritpalSingh #threadकर#वसुसेन
इम्रान खानने पाकिस्तान चालवणार्यांचा अर्थात पाकिस्तानी सैन्याचा अपमान केल्यामुळे जवळपास १०००० हजार पोलिस त्याला अटक करण्यासाठी बाहेर पडले होते. पण या सगळ्यांच्या हातावर तुरी द्यायला तो यशस्वी झाला. शेवटी इस्लामाबाद कोर्टात जाऊन त्याने सांगितले की सैन्य माझ्यासोबत खुप वाईट
वर्तणुक करत आहे. तेव्हा कोर्टाने सांगितले की इम्रान खानच्या म्हणण्यात तथ्य असुन त्याला जरा मोकळा श्वास घेऊद्या 😄
एव्हढ मात्र खरय की जर तो सैन्याच्या तावडीत सापडलाच तर इम्रान खान संपूर्ण जगाला कधीच दिसणार नाही एव्हढं ते सैन्य बेक्कार आहे!
आधीच घाईकुतीला आलेल पाकिस्तान आता या
आता हसाव का रडाव तेच समजं ना 😂😭
आपला देश भोंदू बाबांच्या तावडीत सापडलेला आहे यात काही शंकाच नाही पण आता अमेरिकेला पण चुना लावला गेलाय😂
हा चुना लावणारा दुसरा तिसरा कोणी नसुन 'स्वामी नित्यानंद बाबा' आहे.खालील थ्रेडमधी
१)नित्यानंद बाबाचा इतिहास
२)नेमकं प्रकरण #वसुसेन#threadकर
स्वामी नित्यानंदचा जन्म तमिळनाडू मध्ये झाला.तो स्वतःला 'स्वयंघोषित गुरू' मानतो, त्याच्या 'नित्यानंद ध्यानपीठम' नावाचे धार्मिक संस्था कार्यरत आहेत.वयाच्या १२ व्या वर्षी या बाबाला साक्षात्कार झाला अस याच म्हणणं असुन संपूर्ण भारतात त्याच्या ४७ संस्था चालु होत्या.
२०१० साली जेव्हा
नित्यानंद बाबाचे एका तमिळ अभिनेत्रीसोबत Sexual act चे विडियो वायरल झाले तेव्हा याने सगळ्यांना स्पष्टिकरण देताना सांगितले की तो फक्त शवासन करत होता आणि तो नपुंसक आहे.जेव्हा त्याची टेस्ट करण्यात आली तेव्हा तो 'नपुंसक' नसल्याचा रिपोर्ट CID ने कोर्टकडे जमा केला.
२०१८ साली नित्यानंदला
भाजपने काॅंग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांना खासदारकी वरून निलंबित करण्याची मागणी केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ही मागणी करण्यात आली असुन मध्यंतरी राहुल गांधी जेव्हा United Kingdom ला गेले होते तेव्हा त्यांनी देशाचा आणि लोकशाहीचा अपमान केलाय #Rahul#वसुसेन
अस भाजपचं म्हणण आहे. तर इकडे राहुल यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत व केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागणार नाहीय अस स्पष्ट केलय.
भाजपाने ओम बिर्ला यांच्याकडे नवीन कमिटी स्थापन करण्याची मागणी केली असुन याद्वारे राहुल यांना निलंबित करता येईल का हे तपासा अशी मागणी केलीय. #RahulGandhi
दि. २८ फेब्रुवारी रोजी जेव्हा राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात गेले होते तेव्हा त्यांनी खालील विधाने केली. 👇
१)सगळ्यांना माहितीय की भारतीय लोकशाही धोक्यात आहे.
२)ज्या विविध संस्था आहेत जसेकी न्यायपालिका, वृत्तसंस्था, संसद या सर्वांना सरकारने दबावात आणलय. मोकळीक नाही ठेवलीय.
दोन दिवस झाले बर्याच पत्रकारांनी आणि लोकांनी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांना 'शांततेचा नोबेल' पुरस्कार मिळेल किंवा ते प्रबळ दावेदार आहेत अश्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या. पण तथ्य असे आहे की ही बातमी फक्त एक अफवा आहे.
नोबेल शांतता कमिटीचे डेप्युटी लिडर #NobelPeacePrize
'Asle Toje' जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी बरीच वक्तव्य केली. पण त्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करून मोदीजींना शांततेचा नोबेल मिळेल अश्या बातम्या चालवण्यात आल्या आहेत. काल खुद्द Asle Toje साहेबांना जगासमोर वक्तव्य करावे लागले की मी अस काही सुद्धा बोललो नसुन पत्रकारांनी
माझे म्हणणे उलटसुलट करून दाखवल आहे 😄
थोडं नोबेल पुरस्काराबद्दल👇
या पुरस्काराची सुरूवात १९०१ साली झाली. स्विडनचे सुप्रसिद्ध उद्योजक इंजिनीयर अल्र्फेड नोबेल यांच्या नावाने विविध क्षेत्रात लक्षणीय योगदान देणार्यांना हा पुरस्कार दिला जातो.यात Physics, chemistry, medicine literature