शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला, आई म्हणाली तू हायेस तर डाग आहे...
“संतोषच्या शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला मी. झुंबर आणि कानातली फुलं दिली. त्यानं मला म्हटलं की, अक्का मला शाळाच शिकायची नाही. म्हटलं, का रं बाळा? तर तो म्हटला, तू अंगावरला डाग मोडायलीस. अरं म्हटलं,
अरं म्हटलं, तू हायेस तर डाग आहे. मला बाकी काही नको.”
एवढं बोलल्यानंतर सरुबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. सरुबाई या त्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात, ज्या शेतशिवारात, घरादारात अखंड राबत आमच्यासारख्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:च्या आवडीनिवडींना तिलांजली देतात.
का तर आपण जे भोगलं, ते पोरांच्या नशीबी येऊ नये म्हणून. याचं त्यांना कुणीही, कुठेही क्रेडिट देत नाही. पण, त्यांचा संघर्ष कायम सुरू असतो.
एमपीएससीनं नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात सरुबाई आणि अजिनाथ खाडे या ऊसतोड मजुरांचा मुलगा संतोष खाडे राज्यातून सर्वसाधारण यादीत 16 व्या,
तर एनटीडी संवर्गातून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालाय. याचं श्रेय संतोष आई-वडिलांना देतो आणि ते द्यायलाही हवं.संतोषचे आई-वडील गेल्या 30 वर्षांपासून ऊसतोडीला जातात. यंदा मात्र मुलाच्या यशामुळे त्यांच्या हातातील ऊसतोडीचा कोयता कायमचा सुटणार आहे.
या दोघांनी ज्या हिंमतीनं, कष्टानं संतोषला शिकवलं, ते ऐकून मला माझे आई-वडील आठवले आणि डोळ्यात पाणी आलं. संतोषचे वडील अपंग आहेत. त्यांना एका पायानं व्यवस्थित चालता येत नाही. अशास्थितीत ऊसतोडीला गेल्यानंतर संतोषची आई सरुबाई याच ऊसाची मोळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असे.
गेल्या 30 वर्षांच्या या अंग मेहनतीमुळे त्यांचा कमरेचा आणि मानेचा दोन्ही मणके वाकडे झालेत. पण मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागत असल्यामुळे त्या कधीही दवाखान्यात गेल्या नाहीत. त्यांच्यात भाषेत सांगायचं झालं तर फुटू (एक्स रे वगैरे) काढला नाही.
काही दिवसांपूर्वी बीडच्याच महेश नागरगोजे यांची बातमी केली होती. महेश ११ महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हापासून त्यांच्या आईनं अक्षरश: विहिरीवर कामाला जाऊन, मजुरी करुन महेश यांना शिकवलं. शाळेत भात शिजवण्याचं काम त्या गेल्या १५ हून अधिक वर्षांपासून करत आहेत.
याच महेश यांना प्रतिष्ठित डॉ.मेरी क्यूरी फेलोशिप मिळाली आहे. तीही तब्बल १ कोटी ७० लाखांची.महेशनं त्यांच्या या यशाचं श्रेय आई गयाबाई नागरगोजे यांना दिलंय.
संतोष आणि महेश या दोघांच्या यशाचा इम्पॅक्ट फार मोठा असणार आहे. हे दोघेही त्या बीड जिल्ह्यातून ज्याला दुष्काळी, ऊसतोड मजुरांचा,
शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून, भाग म्हणून कायम हिणवलं जातंय, तीच तीच प्रतिमा बिंबवली जातेय. या दोघांनी त्यांच्या या यशातून या प्रतिमेला वेशीवर टांगायचं काम केलं आहे. आणि मला ते जास्त महत्त्वाचं वाटतंय.संतोषमुळे तर त्याच्या भागातील ऊसतोड मजुरांच्या मुलांमध्ये
आत्मविश्वास निर्माण झालाय. एक शिक्षक तर सांगत होते की, त्यांचा मुलगा त्यांना म्हणतो की, ‘’बाबा तुम्ही ऊसतोडीला जा, मग मीही कलेक्टर होईन.”
महेश नागरगोजे यांचा व्हीडिओही काही ठिकाणी शाळांमध्ये, तर काही ठिकाणी घरांमध्ये लोक आपापल्या मुलांना दाखवत आहेत.
इतका जबरदस्त इम्पॅक्ट या दोघांच्या यशाचा आहे, बीड पॅटर्नचा आहे. असे संतोष, महेश नियमितपणे घडत राहोत, इतरांना जगण्याची नवीन उमेद देत राहोत.
- भानुदास पाटील
पुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र !!.🧐
हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच.
असे लेखन फक्त आणि फक्त पुणेकरणाच येते.
प्रिय राजूस,( प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो )
चिरंजीव आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे,
ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर....!!!
हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल...!!
हल्ली आपण खोकत असता, खोकला थंड पेयाचा दिसत नाही, आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन
फाप्या मारता असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे!!
हल्ली खाण्याच्या पण कुरबुरी असतात,जेवण जात नाही, त्यावरून आपल्याला इराणी रोग जडलाय कि काय अशी दाट शंका येऊ लागली आहे.
गणपती उत्सवात आपण ढोल बडवताना आढळलात, पण ढोल बडवून पोटाची खळगी भरत नाहीत तेच केल्यास जीवनाची हलगी वाजेल...!!
एका मित्राने स्वयंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली. माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली. तसं मला अधिकच रडू येऊ लागले. तशी ती बाबांच्या खोलीत गेली. त्यांना बोलवायला.*_
कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले. मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही. गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणामुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही. तेव्हा मी नोकरी करेन.
त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे. तसं करेल सुद्धा.ते म्हणाले,
जुनी शहाणी माणसं !!....
१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे. धेनु (गाय)मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.
२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, 'श्रीमंती देवापुढे कधीच नसते
दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.'
३.वाळवण घालताना आज्जी सूर्यमंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची.
४.रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची,
स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.'
५.मुंग्यांना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, सुखात राहा, माझ्या लेकरांना चावू नका.
६तुळशीला दिवा लावायची, चिलटे, किडे नष्ट होऊन घरात येत नाहीत.
रात्रीच पारिजात का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे.
या कथेनुसार, राजकुमारी पारिजातक सूर्याच्या... होय भगवान सुर्य देवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पुर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले.
अट अशी होती की, काहीही झाले तरी तिने त्याच्याकडे कधीही पहायचे नाही. अट विचित्रच होती खरी...पण प्रेमात रममाण झालेल्या परीजातने याचा कधी विचारच केला नाही.
त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला.
उन्हाळा येताच सुर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली.... इतकी, की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहातच राहिली. वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधीत झाला
बरेचदा तुमच्या आजूबाजूला अशी माणसं असतात ज्यांना कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये चांगलं, सकारात्मक असं काहीही दिसत नसतं, किंवा आपण असं म्हणूया कि त्यांनी आपली नजर फक्त आणि फक्त सगळ्या गोष्टींमध्ये चूक काढण्यासाठीच तयार केलेली असते.
बरं त्यांना काय चुकीचे आहे हे विचारल्यानंतर logically तस फारसं काही सांगता येतं नाही किंवा त्या चुकीच्या गोष्टी ऐवजी नक्की काय करायला हवं ह्याचही उत्तर त्यांच्याकडे नसते आणि जरी असलं तरी त्या उत्तर हे त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच नकारात्मक असतं.
ही अशी माणसं एनर्जी ड्रेनर असतात.
अशी माणसं आपल्या आसपास असतील तर त्याचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्यावर होतो आपण करत असलेल्या कामावर होतो.
अश्यावेळी एकच करायाचं, आपल्या कोणत्याही गोष्टीबाबत ह्यांच्याशी बोलायच नाही. ह्यांच्यापर्यंत आपली कोणतीही गोष्ट, आपले कोणतेही प्लॅन जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची.
*बोधकथा : पैसा* 🏮
सत्तर हजार कोटींचा मालक सायरस मिस्त्री रिकाम्या हाती गेला... भाऊ तू सत्तर रुपयांचा मालक असलास तरी रिकामाच जाणार आहेस.
फक्त सायरस आणि तुझ्यात एवढाच फरक असेल की सायरस गेला तरी त्याची बायका पोरं रस्त्यावर येणार नाहीत. दहा पिढ्या बसून खातील.
इथे तू गेल्यावर तुझ्या घरच्यांचा बँड वाजलेला असेल. मानसिक धक्क्या पलीकडचा आर्थिक झटका सोसवताना त्यांची अनेक वर्ष निघून जातील. सगळं पुन्हा शून्यातून उभं करावं लागेल.
आनंदाने जगावं वगैरे लॉजिक सांगू नकोस. पैसे कमावणं थांबव कोण किती आनंदात जगतं हे लगेच कळेल.
काळ बदलला आहे. लोकांना तू कमी आणि पैसा अधिक प्रिय आहे.
मृत्यू गरीब श्रीमंत बघत नाही हे ठीक आहे पण श्रीमंतांचं मरण आपल्यासारखं नसतं हे लक्षात घे.
फिलॉसॉफी जेवू घालत नाही. कलियुग आहे. मृत्यूनंतर जगायचं असेल तर अवलंबून असणाऱ्यांची आधी सोय कर मग वाट्टेल त्या गोष्टी ऐकवत बस.