#आपला_राम
आपला राम ― हा अंत्यत प्रेमळ आहे.! तो माता पित्याची आज्ञा मानणारा आहे, आपल्या सावत्र भावावर सख्ख्या भावापेक्षाही जास्त प्रेम करणारा, शबरीचे उष्टे बोर खाणारा, प्रिय पत्नीच्या विरहात धाय मोकलून रडणारा एक स्नेही पुरुष आहे, तिच्या मुक्ततेसाठी बलाढ्य रावणाशी लढणारा आहे.👇
आपला राम साधू सतांचा आदर करणारा आहे.
आपल्या गुरुचे वचन सतत अंमलात आणणारा आहे. केवळ पित्याच्या शब्दाखातर भव्यदिव्य ऐश्वर्यसंपन्न अयोध्येच राजपद सोडून एका साध्या सज्जन माणसाप्रमाणे वावरणारा एक मोहमुक्त युवराज आहे.! सावत्र आई सावत्र भाऊ यांच्याशी कधीही तुसडेपणाने न वागणारा आहे.👇
वनवास फक्त रामाला झाला होता, नुकताच लग्न झालेला राम, पुढं सगळं वैवाहिक सुखाच आयुष्य असताना, कैकयीच्या पुत्रहट्टापायी राजगादीसाठी वाद नको म्हणून वनवास पत्करणारा हा आपला आहे. राम इतका शूर आणि प्रजाप्रिय होता की त्याने जबरदस्तीने अभिषेक केला असता तरी प्रजेने मान्य केला असता. 👇
वनवास म्हणजे फार्म हाऊसवर राहणे व तिथली मधूर फळे खाणे नाही. वनवास हा म्हणजे सामान्य व भौतिक जगापासून अलिप्त राहून वनात राहून जीवनक्रम चालवणे.! त्या वनवासात बायकोच अपहरण होत तेव्हा रामायणात वर्णन अस आहे की राम इतका रडला की दगडलाही पाझर फुटेल, इतका तो मायाळू अन संवेदनशील आहे.👇
आपला राम हा न्यायाने वागणारा असून, मुजोर वालीचे बंड मोडीत काढून, सदाचारी सुग्रीवाला राजा करणारा आहे.! रामाला तिथं संधी होती सुग्रीवाला मांडलीक करून राज्य चालवण्याची पण त्यापेक्षा पित्याच वचन हे शिरसावंद्य होत.
असा हा राम कधीही सत्याची आणि न्यायची धर्माची कास सोडत नाही.!
रामाच्या लेखी धर्म म्हणजे आताच्या प्रमाणे कर्मकांड नव्हतं.! धर्माचा अर्थ मुळीच हा सदाचार आहे, सद्गुण आहे, सद्विचार आहे, परोपकार आहे. धर्माला भगव्या कापडात गुंडाळुन परस्पराशी द्वेष निर्माण करणारा धर्म रामाला कधीही अभिप्रेत नव्हता.! रामाचा धर्म आणि आताच्या धर्मात मोठी तफावत आहे.👇
रामा जरी पराक्रमी वीर असला तरी क्षुल्लक कारणाने विनाकारण हिंसाचार कधीही रुचलेला नाही. आणि जरी कारण मोठं असलं तरी तो नेहमी वाद मिटवण्याची भूमिका घेतो, कारण त्याला ठाऊक आहे, युद्धाने जी अपरिमित जीवितहानी व राज्यहानी होईल ती कुणाच्या हिताची नाही, व ती धर्माला सुखावणारी नाही. 👇
रामाला कधीही मनोमन वाटलं नाही, रावणाशी युद्ध करावं, त्याची भूमिका हे नेहमी सामोपचाराची होती, त्यासाठी हनुमंतास आणि अंगदाला दूत म्हणून आपला शांतिचा संदेश घेऊन पाठवलं, पण गर्वाच्या दर्पावर फुत्कार टाकणाऱ्या रावणाला हा हितकर सल्ला रुचला नाही. युद्धाची खुमखुमी रावणालाच होती. 👇
रावण हा अनेक प्रकारे बलाढ्य होता, शस्र की शास्र असो रावणाचा या क्षेत्रात अतुलनीय दबदबा होता.! त्याची सेनाही मोठी होती अनेक रणधुरंदर योद्धे त्याच्या गोटात होते. विशेष त्याचा मुलगा इंद्रजित हा रावणसेनेचा प्रमुख वीर होता, तरीही रावण हरला आणि वनातील लोकांना घेऊन लढणारा राम जिंकला.👇
रामाचे विजयाचे श्रेय हे त्याच्या स्फूर्तीदायी चरीत्रात आहे. रामाचा पक्ष न्यायचा होता, अन्याय रावणाने केला होता, ही भावना रामसेनेत उद्धृत करण्याचे काम रामाने केलं, आपल्या सेनेला धीर देणारा, त्याना लढण्याची उर्मी देणारा, त्यांच्या मनात धर्म जागवणारा हा कुशल सेनापती तथा राजा आहे. 👇
भलेही रामची सेना छोटी असेल, वनवासी लोकांची असेल पण त्यांच्याकडे राम नावाच आत्मबल होत ते महान होत. रामाच्या लेखी कुठेही अहंकार नव्हता, त्याला त्याच्या शक्ती ठाऊक होत्या, उणिवा माहीत होत्या. उलटपक्षी रावण हा रामसेनेला नेहमी तुच्छ आणि कमी लेखायचा अन हेच त्याच्या पराभवचे कारण बनले.👇
रावणाचा वध करून रामाने एक समाजात एक आदर्श प्रस्थापित केला की, तुम्ही न्यायाने आणि धर्माने वागत असाल तर जगातील कोणताही महान शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. असा राम हजार वर्षापासून जगाचा प्रातः स्मरणीय प्रभु आहे. वनवासातून परत आलेला राम हा श्रीराम होऊन लोकांच्या ठायी रुजला.👇
माझ्या मते रामायण इथेच संपलं असावं, कारण रामायणानंतर ज्या भानगडी झाल्या अतीशय विपरीत आणि रामाच्या आदर्श प्रतिमेला छेद देणाऱ्या आहेत.! नंतरच्या उत्तरकांडातील राम हा कुणाच्या तरी सांगण्यावरून पत्नीच चारित्र्यावर शंका घेणारा असून तो राम मूळ रामायणाच्या चौकटीत अजिबात बसत नाही.
वर जे वाल्मिकी रामायणाच्या आधारे सांगितल्या प्रमाणे उत्तरकांडातील राम स्वतःच्या तत्वांच्या आणि विचारकरांच्या अतिशय विरुद्ध वागणारा आहे. रामायण ह्या महाकाव्यावर अभ्यास करणाऱ्या अनेक विद्वानाच मत आहे की उत्तरकांड नंतरहुन जोडण्यात आलं असावं. आणि ते खरच आहे, कारण हा आपला राम नाही.👇
उत्तरकांडातील राम हा विकृत समाजव्यवस्थेच्या आहारी गेलेला दाखवला आहे. राज्यातील कुणीतरी फडतूस माणूस उठतो आणि म्हणतो काय खर असावं की सीत ही पवित्र आहे, आणि राम लगेच त्याची फालतु बडबड ऐकून पत्नीला जळत्या सरणावर बसवतो, किती विपर्यस्त वाटत हे काही तर्काचा आधार तरी वाटतो का यात ?👇
मूळ तथा वाल्मिकी रामायणाच्या आधारे, सांगायच झालं तर, सीता रावणाच्या ताब्यात होती तेव्हाही राम हा प्रेमाने व्याकुळ होऊन तिच्या विरहात रडत होता. तेव्हा त्याच्या मनाला हा विचार शिवला नाही की सीता ही रावणाने बाटवली तर नाही न. ? मुळीच नाही, रामाच सीतेवरच प्रेम हे इतकं नाजूक नव्हतं.
रामाचा सीतेवरच प्रेम हे अंत्यत बळकट होत. त्यांचा एकमेकांवर असलेला विश्वास हा अतूट होता. तो विश्वास कुणाच्या तरी सांगण्यावरून डळमळीत होणारा नव्हता. आणि राम असा पारावरच्या गप्पा ऐकून वागणारा नव्हता, हे सर्वांना माहीत होतं, यामुळेच उत्तरकांड हे रामायणाशी एकरूप नाही.👇
रामाच्या चरीत्रावर शंका घेणाऱ्यानी वाल्मिकी रामायण वाचलेले असत की नाही, हे मला माहीत नाही. त्यानी रामायणाची चिकित्सा केली का माहीत नाही. पण आपल्या सामान्य बुद्धितून बरळून एका असामान्य व्यक्तिमत्त्वावर शंका घेणे म्हणजे अंत्यत हास्यास्पद आणि तर्कहीन आहे.
रामनवमीच्या शुभेच्छा..!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आज अनेक स्रियां बोलताना दिसतात की, कुणाच्या तरी सांगण्यावरून बायकोला सोडणारा राम असेल तर असा राम नवरा म्हणून नको ग बाई. यात त्यांचं काय चुकलं, त्याना जो राम दाखवला आहे त्यानुसार तेच बोलणार पण यामागची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे. वाचा 👇
संस्कृतमधील ग्रंथ आपण पाहिले तर कळून येईल की. तो ग्रंथ पुर्ण झाल्यावर, त्यामधून आपल्याला काय शिकायला मिळत याबद्दल सांगितलं जातं त्याला फलश्रुती म्हणतात.
वाल्मिकी रामायणात सुद्धा युद्ध कांडानंतर फलश्रुती सांगितली आहे. रामायण तिथेच संपलं आहे. उत्तरकांड हे नंतरुन जोडलेल आहे. 👇
मूळ वाल्मिकी रामायण मधला राम हा शबरीचे बोर खाणारा असून, निषाद राजाशी मैत्री करणारा आहे. पत्नीसाठी रानावनात भटकून, तिचा तपास काढून, महाबलाढ्य शत्रूशी युद्ध करून तिला मुक्त करणारा एक लढवय्या शस्त्रशास्रनिपुण धर्मशील ( धर्मशील चा अर्थ म्हणजे सदाचारी, सद्गुणी, परोपकारी ) आहे.
पुरोगामी विचाराच्या मित्र मैत्रिणीनी वाचावे असे विवेकवादी, सुधारणावादी, तर्कवादी पुस्तके
१) गुलामगिरी - माहात्मा फुले
२) राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ
३) शेतकऱ्याचा असूड - माहात्मा फुले
४)जातीव्यवस्थेचे निर्मूलन- डॉ बाबासाहेब आंबेडकर
५) दास - शुद्रांची गुलामगिरी - शरद पाटील.
👇
६) आर्य आणि अनार्य - शरद पाटील
७) बुद्ध : भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत - शरद पाटील
८) गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो - डॉ आ.ह साळुंखे
९) विद्रोही तुकाराम - डॉ आ. ह.साळुंखे
१०) सर्वोत्तम भूमिपुत्र - गौतम बुद्ध - डॉ आ.ह साळुंखे
👇
११) आस्तिक शिरोमणी चार्वाक - डॉ आ.ह साळुंखे
१२) शिवराय : संस्कार आणि शिक्षण
१३) छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक
१४) हिंदू संस्कृती आणि स्त्री
१५) एरिक फ्रॉम याचे स्वातंत्र्याचे भय - मराठी अनुवाद - डॉ आ.ह साळुंखे
१६) महात्मा फुले आणि धर्म - डॉ आ.ह साळुंखे
👇
#सत्तासंघर्ष ― व्हीपचा गाढव गोंधळ
सरन्यायाधीश यांच म्हणणं अंत्यत तार्किक आहे
त्याच आशायने सांगायच झालं तर ― शिंदे गटाला पक्षावर विश्वास होता. पण मुख्यमंत्र्यांवर नव्हता. पण हा विश्वास 3 वर्ष सरकार चाललं तोपर्यंत होता. आणि मग अचानक एका रात्रीत अस काय घडलं की विश्वास संपला ? 👇
शिंदे गट अतिशय दांभिक आणि दुटप्पी भूमिका मांडत आहे. एकीकडे माननीय कोर्टात म्हणायच की. आम्ही पार्टीमधून फुटलो नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आणि दुसरीकडे निवडणूक आयोगात शिंदे गट जातो तेव्हा तिथे ते गट म्हणूनच जातात. कारण ते जर शिवसेना असतील तर आयोगात जायची गरज काय ? 👇
जेव्हा उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यावेळी सुद्धा सुनील प्रभु यांचाच व्हीप होता. तो 2 तारखेला बजावला की सभापतीच्या नेमणूकीसाठी सर्वानी राजन साळवी यांनाच मतदान करावे असा व्हीप बजावला. आणि तीन अंडरलाईन असलेला व्हीप आहे. हा व्हीप मोडला तर पक्षविरोधी भूमिका समजून अपात्र केलं जात
ठाकरे गटाचा युक्तिवाद - भाग दुसरा
कपिल सिब्बल -
१) शिवसेनेचा व्हीप कुणाकडे आहे ? इथे शिवसेनेचा व्हीप हा सुनील प्रभू यांच्याकडे आहे. आणि तो व्हीप पक्षातील सर्व आमदारांना बंधनकारक राहील, तो व्हीप सर्वाना पाळावा लागेल.
एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी राज्यपाल कसे बोलावतील ? कोण आहेत एकनाथ शिंदे? मी घटनात्मक शब्दात बोलत आहे. एकनाथ शिंदे हे गटनेते असल्याचा युक्तिवाद केला जात आहे. ते कोणत्या कायद्याखाली?
अर्थात -त्याना गटनेता कुणी बनवलं ( ठाकरेंनी ) आहे हा प्रश्न इथे उपस्थित होतोय 👇
( शिंदे गट ) तुम्ही स्वतःला पक्षाचे अधिकार देऊ शकत नाही. आसाम मध्ये बसून तुम्ही इतर पार्टीकडून मनोरंजन करून घेत आहात आणि जाहीरपणे सांगत का हा दुसरा पक्ष मला पाठींबा देत आहे. आणि तुम्ही स्वतःला राजकिय पक्ष असल्याचं सांगून पक्षाची घटना बदलवत आहात. 👇
ठाकरे गटाचा युक्तिवाद ―
कपिल सिब्बल ―
१) एक लहान पक्ष आहे ज्यामध्ये 5 सदस्य आहेत. त्यापैकी 2 सदस्य मी सरकारला पाठिंबा देणार नाही असे सांगत राज्यपालांकडे गेले तर राज्यपाल फ्लोर टेस्ट घेणार का? बहुसंख्य सदस्य विसरा, अशाने अल्पसंख्याक सदस्यही सरकार पाडू शकतात. #महाराष्ट्र 👇
विधानसभे मधील (सदनातील ) आमदारांच्या संख्याबळाने सरकार पडत नाही, किंवा पडणार नाही, तर ते सरकार मधील पक्षाच्या युती अथवा आघाडीने पाठींबा काढून घेतल्यावर सरकार पडू शकत, किंवा पडेल. 👇
आपण 'आया राम गया राम' या केसवर चाललो आहोत काय ? कारण आता तुम्ही ( शिंदे गट ) म्हणता राजकीय संबंधाने काही फरक पडत नाही, आणि तुम्ही महत्त्वाची ती गोष्ट म्हणजे संख्या. पण इथे लोकशाही म्हणजे संख्या नाही.👇
Breaking― भाजपला मोठा दणका
मुंबई हायकोर्टाने आज उध्दव ठाकरे व त्यांच्या कुटूंबाच्या संपत्तीची ED व CBI ने चौकशी करावी अशी याचिका फेटाळून लावली व याचिका कर्त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला
कोर्ट- ही याचिका कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करते. #ठाकरे#महाराष्ट्र#HC (१/४)
सदरील याचिका "गौरी भिडे" यांनी दाखल केली होती. पण माननीय उच्च न्यायालयाने यावर स्पष्टपणे सांगितलं आहे की सदरील याचिकेत कोणताही पुरावा समाविष्ट नाही. त्यामुळे कोर्ट प्रथमदर्शनी कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. (२/३)
कोणत्याही परिस्थितीत BMC मधील जो काही गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यासाठी उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा इथे थेट संबंध नाही. किंवा तसा पुरावाही नाही. ही याचीका कोणताही पुरावा नसताना दाखल केली आहे. त्यामुळेच ती फेटाळून लावण्यात आली आहे. (३/३)