( जातीअंताच्या चळवळीचा समग्र प्रवास महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर )
असंख्य भारतीय समाज सुधारकांना आजही प्रेरणा देणारे, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय सामाजिक क्रांतीचे उद्गाते क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले, आजही-- (1/18)
कित्येक सामाजिक क्रांतीकारकांमध्ये तसेच समाजसुधारकांमध्ये महात्मा फुलेंचे नाव हे सूर्याच्या किरणांप्रमाणे तितक्याच प्रखरतेने व तेजाने आजही चमकत आहे,
याला कारणही तसेच आहे. जेंव्हा 19 व्या शतकामध्ये "मानवमुक्तीची चळवळ" जोर धरू लागली तेव्हा तत्कालीन समाज सुधारकांनी जातीयता (2/18)
नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांच्या या कृतीचा भारतीय जनमानसात सखोल असा कोणताच परिणाम झाला नाही.
कारण अस्पृश्यतेचे मूळ असणारा चातुर्वरण्यांचा सिद्धांत व त्यातून निर्माण झालेली सामाजिक विषमता व त्या आधारित जातीभेद नष्ट करणे, हे त्या समाजसुधारकांचे मुख्य (3/18)
ध्येय नव्हते. केवळ दयेवर सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हे त्यांचे कार्य होते.
मुख्यतः अस्पृश्यतेचे "मूळ" माहीत असूनही तत्कालीन समाजसुधारकांनी उचललेले हे पाऊल पाहून जास्त काही आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही. कारण "चातुर्वरण्यांच्या" विरुद्ध जो कोणी बोलेल त्याला धर्मद्रोही (4/18 )
समजून समाजातून बहिष्कृत केले जात, त्याला नाना प्रकारच्या शिक्षा त्यावेळी दिल्या जात असत. समाजातून हद्दपार होण्यापेक्षा समाजात राहूनच अस्पृश्यता निवारण्याचे काम आपल्या जमेल त्या पद्धतीने करणे हा विचार तत्कालीन समाजसुधारकांना वाटला व त्या दृष्टीने त्यांनी आपले काम चालू ठेवले (5/18)
पण या सर्वांना अपवाद ठरले ते व्यक्तिमत्व म्हणजे, भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले.
क्रांतीसुर्य जोतिरावांच्या सामाजिक क्रांतीची धार किती प्रखर होती हे तुम्हांला पुढील विवेचनावरून समजून येईल. धर्माच्या नावाने आपले निश्चित ध्येय साध्य करून (6/18)
समाजामध्ये विषमता निर्माण करणाऱ्या कथित धर्मपंडितांना व विषमतावाद्यांना जोतीरावांनी निर्भीडपणे खडे बोल सुनावले. त्यात महात्मा फुले म्हणतात,
"जे कोणी आपले कुटुंब भाऊबंद सगेसोयरे इष्टमित्र आणि साथीदारांना आपल्यासह श्रेष्ठ मानून इतर कोणाही स्त्री-पुरुषास किंवा एकंदर मानव (7/18)
--प्राण्यास पिढीजातपणे अथवा कपटाने अपवित्र किंवा नीच मानत नाहीत त्यास सत्य वर्तनी म्हणावे."
जोतीरावांनी हे जाणले होते की, केवळ अस्पृश्यांनाच नव्हे तर समाजातील "शेतकरी वर्गालाही" शोषणाला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती ओळखून महात्मा फुलेंनी मानव मुक्तीच्या (8/18)
व शोषणाविरुद्धच्या लढ्याला सुरुवात केली. प्रसंगी वडिलांच्या विरोधामुळे जोतिरावांना आपले राहते घरही सपत्नीक सोडावे लागले.
आजही जेंव्हा आपण महात्मा फुलेंच्या कार्याकडे पाहतो व ऐकतो तेंव्हा मात्र आपल्याला "मुलींची पहिली शाळा सुरू करणारे" व "अस्पृश्यता निवारणासाठी (9/18)
झटणारे व्यक्ती" एवढीच त्यांची ओळख करून दिली जाते. मात्र फुलेंनी शेतकऱ्यांच्या हितार्थ केलेल्या कामांना मात्र विसरले जाते.
तात्पर्य-- आजही महात्मा फुलेंच्या विविध क्षेत्रातील कार्याबद्दल माहिती दिली जात नाही, किंवा ती जाणीवपूर्वक दिली गेली नाही. स्थानिक (10/18)
"Scottish Mission High School" मधून इंग्रजी शिक्षण घेतलेल्या व समाजकार्याने प्रेरित झालेल्या महात्मा फुलेंनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी समाजकार्याला प्रत्यक्षात सुरुवात केली. व मुलींची पहिली शाळा 1848 रोजी पुण्यातील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात सुरू केली. महात्मा (11/18)
फुलेंनी चालविलेल्या समाजसुधारणा चळवळीच्या गतीचा वेग इतका होता की, त्यांनी एकापाठोपाठ समाजातील अंधरूढी, अमानवीय परंपरा यावर सतत हल्ले चढवत समाजातील विधवा पुनर्विवाहाला चालना दिली.
व प्रत्यक्षात विवाह देखील घडवून आणले. पुढे जोतीरावांनी परंपरागत सुरू असलेली केशवपन पद्धतीला (12/18)
टोकाचा विरोध दर्शविला. सावित्रीमाई व आपले सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या समावेत त्यांनी नाभिकांचा विराट संप देखील घडवून आणला. नंतर त्यांनी विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी १८६३ साली स्वत:च्या घरात "बालहत्या प्रतीबंधक गृह" काढले. या ठिकाणी (13/18)
लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे महात्मा फुले समाजाला जो उपदेश करीत, तो ते स्वतः आचरणात आणीत. महात्मा फुलेंनी स्त्री पुरुष समानतेचा समाजाला संदेश दिला.
व प्रत्यक्षात महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंना देखील आयुष्यभर समानतेनेच वागविले. महात्मा फुले व सावित्रीमाईंचे वैवाहिक (14/18)
जीवनातील नाते स्पष्ट करताना इतिहास संशोधक प्रा. हरी नरके म्हणतात,
"महात्मा फुले व सावित्रीमाईंचे नाते हे खूप मैत्रीचे व स्नेहाचे होते. जोतिराव हे सावित्रीमाईंना अगदी आदराने वागवीत असत. जेवढे अधिकार जोतिरावांना होते तितकेच अधिकार सावित्रीमाईंना देखील होते." याचे (15/18)
प्रतिबिंब तुम्हांला सावित्रीमाईंनी केलेल्या कार्यात देखील दिसून येईल. कित्येक महत्त्वपूर्ण कामांचे नेतृत्व सावित्रीमाईंनी केले.
यामध्ये लक्षात ठेवण्याची विशेष बाब म्हणजे, महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतरदेखील समाजसुधारणा चळवळीची ज्योत सावित्रीमाईंनी अखंडपणे तेवत ठेवली. (16/18)
समाजकार्याच्या या घटनेकडे जर बारकाईने पाहायचे झाले तर ज्योतिरावांच्या मृत्यूनंतरच दुसऱ्याच वर्षी नियतीने साधलेला हा योग म्हणजे काही साधासुधा योग नव्हता कारण,
महात्मा फुलेंच्या समाजकार्याचा वारसा पुढे अखंडपणे चालवणाऱ्या बाळाचा जन्म अस्पृश्य गणल्या गेलेल्या (17/18)
सुभेदारांच्या घरात 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशात झाला होता.
व आता कुठे ज्योतिरावांच्या व्यापक विचारसरणीला पुढे चालविणारा खरा वारस मिळाला होता.. (18/18)
( 3 पॅंथरनामा, नामांतर आंदोलन आंबेडकरोत्तर दलित चळवळ )
गावकुसाबाहेरील निश्चल वस्तीत
तू येऊन गरजलास
सारी वस्ती खडबडली
धूळ झटकीत सावध झाली
तुझ्या हाती होता धगधगता हिलाल
हादरून गेले होते सगळे काळोखाचे दलाल..
--साहित्यकार अर्जुन डांगळे. (1)
"दलित" तसेच "अस्पृश्य" म्हणून ज्यांना संबोधित केले गेले, व बाकी सर्व मानवांना मिळणारे समान अधिकार देखील ज्यांना नाकारले गेले.
अशा वर्गसमूहाला माणसात आणण्याचा पहिला प्रयत्न केला ते व्यक्ती म्हणजे महात्मा फुले. त्याच बरोबर छत्रपती शाहू महाराज, सयाजीराजे गायकवाड, गोपाळबाबा (2)
वलंगकर, शिवराम कांबळे यांनी देखील अमानुष व्यवस्था बदलण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. तसेच या चळवळीला व्यापक रूप देऊन ज्यांनी मानवमुक्तीच्या लढ्याला गतिमान केले ते व्यक्तिमत्त्व म्हणजे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी आपल्या गुरूंच्या सत्कार्याची माहिती, (3)
(संविधान आणि त्याची नैतिक मूल्य जपणे आजच्या काळाची गरज.)
वर्षानुवर्षे गुलामगिरी त जीवण कंठणाऱ्या समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या घटनात्मक राजकीय आणि सामाजिक विचारात टाकलेली भर ही (1)
देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाने आपले परमकर्तव्य मानले पाहिजे, असा संदेश देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या व निर्माण केलेल्या नव्या समाजव्यवस्थेचे रक्षण व पालन करण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले (2)
घटना समितीतील अखेरचे भाषण हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
राष्ट्राच्या भवितव्यासंबंधी आपले मत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणतात,
"भारत २६ जानेवारी १९५० ला स्वतंत्र होईल. या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील की पुन्हा गमावून बसेल, हा माझ्या मनात पहिला प्रश्न (3)
#सावित्रीमाईंनी ज्यांच्या नेतृत्वात "केशवपन" परंपरेला विरोध करत सर्व न्हाव्यांचा संप घडवून आणला असे, भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे एक समाज सुधारकाबरोबर उत्तम पत्रकार देखील होते..(1/15)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापलेल्या "सत्यशोधक समाज" मुंबई शाखेचे अध्यक्ष असणारे नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म इ.स १८४८ रोजी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला.
अतिशय गरीब परिस्थितीतून लोखंडेंनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. व ते रेल्वे (2/15)
खात्यात कारकून म्हणून तर 'पोस्ट खात्यात' काही काळ नोकरीस राहिले, पुढे लोखंडेंनी मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळवली.
तिथे त्यांनी दिवसातून १३-१४ तास दहशतीच्या वातावरणात काम करीत असलेले गिरणी कामगार बघितले. (3/15)
"स्त्रियांनी शिकावे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य होते. व विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, अश्या भारतीय स्त्रीवादाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचे एकूणच सर्व कार्य समाजाला आजही प्रेरणा देणारे आहे. (1/27)
#समानता व बंधुभावाचे मूल्य समाजात रुजवणारे तसेच 'श्यामची आई' ही अजरामर साहित्यकृती निर्माण करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक आणि संवेदनशील शिक्षक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी मानवतेविषयी महान असा संदेश देताना म्हणतात, (2/16)
"आपल्याला वैचारिक दर्जा वाढवायचा असेल तर मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न करा.
व्देषाची लाट आली तर, प्रेमाचा सिंधू घेऊन चला.
संकुचितपणा येत असेल तर विशालता घेऊन चला.
क्षुद्रता पेरू पाहात असाल तर उदारता घेऊन चला.
मनात अंधारुन येत असेल तर प्रकाशाचे झोत आणा." (3/16)
असे प्रतिपादन करणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शेतीविषयक विचारांना गती देणारे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार अधिक समृद्ध करत (2/12)
"शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला."
तसेच "शेतकऱ्यांनी शिक्षण घेतल्याखेरीज त्यांच्यामध्ये नवविचार, नवतंत्रज्ञानाची बीजे रुजवता येणार नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षणाची कास (3/12)