(संविधान आणि त्याची नैतिक मूल्य जपणे आजच्या काळाची गरज.)
वर्षानुवर्षे गुलामगिरी त जीवण कंठणाऱ्या समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या घटनात्मक राजकीय आणि सामाजिक विचारात टाकलेली भर ही (1)
देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाने आपले परमकर्तव्य मानले पाहिजे, असा संदेश देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या व निर्माण केलेल्या नव्या समाजव्यवस्थेचे रक्षण व पालन करण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले (2)
घटना समितीतील अखेरचे भाषण हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
राष्ट्राच्या भवितव्यासंबंधी आपले मत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणतात,
"भारत २६ जानेवारी १९५० ला स्वतंत्र होईल. या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील की पुन्हा गमावून बसेल, हा माझ्या मनात पहिला प्रश्न (3)
उभा राहतो. देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंताक्रांत करणारा हा प्रश्न आहे.
माझ्या मनाला जास्त जिची टोचणी लागली आहे ती गोष्ट ही की, भारताने आपले जे स्वातंत्र्य पूर्वी एकदा गमावले ते हिंदुस्थानच्या काही रहिवाशांच्या कपटी कारस्थानामुळेच. हे सत्य हृदयाला असह्य वाटू लागते. (4)
ब्रिटीश लोक शीख राजांचा निःपात करण्यात गुंतले होते, तेव्हा शीखांचा प्रमुख सेनापती गुलाबचंद हा स्तब्ध बसला. ब्रिटीशांच्या तावडीतून राजपुत राजांना सोडविण्याचा त्याने काडीमात्र प्रयत्न केला नाही. १८५७ मध्ये भारतातील बऱ्याच भागांनी ब्रिटीश सत्तेविरूद्ध बंडाचा झेंडा उभारला असता शीख(5)
लोक स्वस्थ उभे राहून तमाश्या बघ्या लोकांप्रमाणे बंडाचा सर्व देखावा पहात होते. भारताच्या इतिहासात ज्या घडामोडी झाल्या त्यांची पुनरावृत्ती होईल की काय, या प्रश्नाने माझे मन धास्तावून गेले आहे. जातीभेद आणि धर्मभेद हे आपले जुनेपुराणे शत्रू आहेत. नवीन नवीन व निरनिराळी ध्येये (6)
पुढे ठेवुन जे राजकीयपक्ष उत्पन्न झालेले आहेत व होणार आहेत त्यांची आपल्या जुन्या शत्रूंमध्ये भर पडणार आहे. पण एवढे मात्र खास की, जर निरनिराळे पक्ष आपल्या देशापेक्षा आपल्या मतप्रणालींना जास्त महत्व देतील तर आपले स्वातंत्र्य पुन्हा दुसऱ्यांदा संकटात सापडेल.
आणि कदाचित कायमचेच (7)
नष्ट होईल. असले संकट आपणावर येऊ नये यासाठी आपण सर्वांनी जय्यत तयारी ठेवली पाहिजे. आपल्या अंगातल्या रक्ताचा शेवटचा बिंदू राहीपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण प्राणपणाने करू, असा आपण दृढनिश्चय केला पाहिजे. २६ जानेवारी १९५० रोजी भारत लोकसत्तात्मक होणार याचा अर्थ असा की, (8)
लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालविलेले राज्य भारताला त्या मिळेल. भारताच्या लोकशाहीप्रणित घटनेचे काय होणार? भारत ती घटना शाबूत ठेवील की पुन्हा नष्ट करील?
ज्या देशात लोकशाहीचा फारसा उपयोग करण्यात आलेला नाही त्या देशात लोकशाही एक नवीन चीज मानली जाते. अशा देशांपैकी भारत हा (9)
एक देश आहे. अशा प्रकारच्या देशातील लोकशाही आपला कारभार चालवित असताना, आपल्या जागेवर अधिष्टीत होण्यास हुकूमशाहीला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. भारतात नवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यांग शाबूत राखून ठेवू शकेल, परंतु ती व्यवहारात हुकूमशाहीला आपली जागा बळकाविण्यास (10)
वाव देईल, असा प्रकार घडवून येणे सर्वथैव शक्य आहे. लोकशाहीचे अस्तीत्व आपणाला टिकवायचे असेल तर माझ्या मते आपण पहिली जी गोष्ट केली पाहिजे ती ही की आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. याचा अर्थ असा की क्रांतीचे घातपाती (11)
मार्ग वर्ज्य केले पाहिजेत.
म्हणजे असे की, कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज्य केले पाहिजेत. दिवसापासून लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपणाला दुसरी जी गोष्ट करावयाची आहे ती ही की, लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे उत्सुक आहेत त्यांच्या साठी जॉन ट्युअर्ट (12)
याने जो भयसूचक संदेश दिलेला आहे तो पाळणे, ही होय. "आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत." ज्यांनी आयुष्यभर आपल्या मातृभूमीची सेवा केलेली आहे, अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही (13)
परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालासुद्धा मर्यादा आहेत. या बाबतीत आयलंडचा देशभक्त डॅनियल ओकेनेल याने मार्मिकपणे म्हटले आहे की,
"स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. शीलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन (14)
कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही.' या भयसूचक संदेशाची जरूरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की, भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ति माहात्म्यपूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालीत (15)
नाही. एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमाहात्म्य-पूजा दाखविली तर ती त्या राजकीय पंथात हुकूमशाहीची सत्ता प्रस्थापित करील..(16)
( 3 पॅंथरनामा, नामांतर आंदोलन आंबेडकरोत्तर दलित चळवळ )
गावकुसाबाहेरील निश्चल वस्तीत
तू येऊन गरजलास
सारी वस्ती खडबडली
धूळ झटकीत सावध झाली
तुझ्या हाती होता धगधगता हिलाल
हादरून गेले होते सगळे काळोखाचे दलाल..
--साहित्यकार अर्जुन डांगळे. (1)
"दलित" तसेच "अस्पृश्य" म्हणून ज्यांना संबोधित केले गेले, व बाकी सर्व मानवांना मिळणारे समान अधिकार देखील ज्यांना नाकारले गेले.
अशा वर्गसमूहाला माणसात आणण्याचा पहिला प्रयत्न केला ते व्यक्ती म्हणजे महात्मा फुले. त्याच बरोबर छत्रपती शाहू महाराज, सयाजीराजे गायकवाड, गोपाळबाबा (2)
वलंगकर, शिवराम कांबळे यांनी देखील अमानुष व्यवस्था बदलण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. तसेच या चळवळीला व्यापक रूप देऊन ज्यांनी मानवमुक्तीच्या लढ्याला गतिमान केले ते व्यक्तिमत्त्व म्हणजे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी आपल्या गुरूंच्या सत्कार्याची माहिती, (3)
( जातीअंताच्या चळवळीचा समग्र प्रवास महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर )
असंख्य भारतीय समाज सुधारकांना आजही प्रेरणा देणारे, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय सामाजिक क्रांतीचे उद्गाते क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले, आजही-- (1/18)
कित्येक सामाजिक क्रांतीकारकांमध्ये तसेच समाजसुधारकांमध्ये महात्मा फुलेंचे नाव हे सूर्याच्या किरणांप्रमाणे तितक्याच प्रखरतेने व तेजाने आजही चमकत आहे,
याला कारणही तसेच आहे. जेंव्हा 19 व्या शतकामध्ये "मानवमुक्तीची चळवळ" जोर धरू लागली तेव्हा तत्कालीन समाज सुधारकांनी जातीयता (2/18)
नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांच्या या कृतीचा भारतीय जनमानसात सखोल असा कोणताच परिणाम झाला नाही.
कारण अस्पृश्यतेचे मूळ असणारा चातुर्वरण्यांचा सिद्धांत व त्यातून निर्माण झालेली सामाजिक विषमता व त्या आधारित जातीभेद नष्ट करणे, हे त्या समाजसुधारकांचे मुख्य (3/18)
#सावित्रीमाईंनी ज्यांच्या नेतृत्वात "केशवपन" परंपरेला विरोध करत सर्व न्हाव्यांचा संप घडवून आणला असे, भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे एक समाज सुधारकाबरोबर उत्तम पत्रकार देखील होते..(1/15)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापलेल्या "सत्यशोधक समाज" मुंबई शाखेचे अध्यक्ष असणारे नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म इ.स १८४८ रोजी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला.
अतिशय गरीब परिस्थितीतून लोखंडेंनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. व ते रेल्वे (2/15)
खात्यात कारकून म्हणून तर 'पोस्ट खात्यात' काही काळ नोकरीस राहिले, पुढे लोखंडेंनी मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळवली.
तिथे त्यांनी दिवसातून १३-१४ तास दहशतीच्या वातावरणात काम करीत असलेले गिरणी कामगार बघितले. (3/15)
"स्त्रियांनी शिकावे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य होते. व विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, अश्या भारतीय स्त्रीवादाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचे एकूणच सर्व कार्य समाजाला आजही प्रेरणा देणारे आहे. (1/27)
#समानता व बंधुभावाचे मूल्य समाजात रुजवणारे तसेच 'श्यामची आई' ही अजरामर साहित्यकृती निर्माण करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक आणि संवेदनशील शिक्षक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी मानवतेविषयी महान असा संदेश देताना म्हणतात, (2/16)
"आपल्याला वैचारिक दर्जा वाढवायचा असेल तर मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न करा.
व्देषाची लाट आली तर, प्रेमाचा सिंधू घेऊन चला.
संकुचितपणा येत असेल तर विशालता घेऊन चला.
क्षुद्रता पेरू पाहात असाल तर उदारता घेऊन चला.
मनात अंधारुन येत असेल तर प्रकाशाचे झोत आणा." (3/16)
असे प्रतिपादन करणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शेतीविषयक विचारांना गती देणारे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार अधिक समृद्ध करत (2/12)
"शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला."
तसेच "शेतकऱ्यांनी शिक्षण घेतल्याखेरीज त्यांच्यामध्ये नवविचार, नवतंत्रज्ञानाची बीजे रुजवता येणार नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षणाची कास (3/12)