महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची एकूण साडेतीन शक्तिपीठं आहेत.
कोल्हापूरची महालक्ष्मी माता एक शक्तिपीठ,
तुळजापूरची भवानी माता दुसरं तर,
माहूरची रेणुका माता तीसरं आणि,
नाशिक जिल्ह्यातील वणी-दिंडोरी येथील सप्तशृंगी माता हे अर्धं शक्तीपीठ...
तसेच, पेशवाईतील साडेतीन शहाणे ही महाराष्ट्राच्या इतिहासात तितकेच प्रसिद्ध आहेत...
सखारामपंत बोकील एक शहाणा, देवाजीपंत चोरघडे दुसरा तर,
विठ्ठल सुंदर हा तिसरा,
हे झाले पूर्ण शहाणे कारण हे मुत्सद्दी तसेच योद्धेही होते.
आणि उरलेला अर्धा शहाणा म्हणजे नाना फडणीस जो फक्त मुत्सद्दी होता.
आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील जनतेत साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांपैकी प्रचलित असलेले साडेतीन मुहूर्त...
मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून ज्याचं स्वागत गुढ्या व तोरणं उभारून केलं जातं तो गुढीपाडवा हा पहिला मुहूर्त...
देव आणि पितर यांना उद्देशून ज्या मुहूर्तावर अन्नदानाद्वारे जे पुण्यकर्म पदरात पडतं ते अक्षय्य राहतं म्हणून जो दिवस साजरा केला जातो तो अक्षय्य तृतीया हे दुसरं मुहूर्त...
प्रभु श्रीरामांच्या हातून ज्या तिथीस रावणाचा अंत झाला त्या तिथीस स्मरून साजरा केला जातो तो दसरा अर्थात विजयादशमी हा तिसरा मुहूर्त...
तर बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त म्हणून गणला जातो.
असे हे एकून साडेतीन मुहूर्त...
पैकी आज तिथीनुसार आलेला आहे तो दुसरा मुहूर्त अर्थात अक्षय्य तृतीया...
आजच्या या शुभदिनी, आपले आरोग्यम-धन-संपदा हे अक्षय्य टिकून राहोत या सदिच्छा देऊन अपणास अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत...🙏🏻😊
मित्र, नामे अजय राहाणे, राहणार पंचकेश्वर, ता.निफाड, जी.नाशिक याच्यासोबत सकाळी दुरध्वनी द्वारे चर्चा झाली, विषय अर्थातच काल निफाड तालुक्यात झालेल्या गारपिटीसंदर्भातील होता...
अजयचं स्वतःचं क्षेत्र म्हणाल तर नाममात्र एकरभर, त्यात त्याने ७५% अर्थात दिड बीघा द्राक्षबाग केलेली आहे व उर्वरित अर्धा बीघा म्हणजे १० गुंठे हे तो घरच्या दुभत्या जनावरांच्या वैरणीसाठी राखून ठेवत असतो.
या दीड बीघा क्षेत्रात तो थॉमसन सिडलेस नामे द्राक्षाच्या व्हरायटीचं उत्पादन घेत असतो, वर्षभर त्याची निगा राखणे, त्याला वेळच्यावेळी खतं-औषधी फवारणं, वेळच्यावेळी मजुरांद्वारे डिपींग-थिनिंग सारखी कामं करुन घेणं, या सर्व मशागतीपोटी त्याला वर्षाकाठी दिड-पावणेदोन लाखाचा खर्च पडतो.
२०१३ मध्ये कांदा ७००/- रुपये क्विंटलने विकला होता आणि २०२३ ला, कालच कांदा ७००/- रुपये प्रति क्विंटलनेच विकला आहे...
फरक इतकाच आहे, २०१३ मध्ये डिएपी ५६०/- रुपयांना एक बॅग होती आज १९००/- रुपयांना एक बॅग आहे..
तेव्हा लागवड मजुरी ५०००/- रुपये एकर होती आता ११,०००/- रुपये एकर आहे...
मजूर तेव्हा ५००/- रुपयांचा गॅस भरत होता, तोच आज १२००/- रुपयांना झालाय...
२०१३ ला ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर मशिन ६,००,०००/- रुपयांत सहज बसून जात होते आज तोच संपूर्ण सेट घेतला तर ११,००,०००/- रुपये लागत आहेत.
तेव्हा मिळणारी १५,०००/- रुपयांची बैलजोडी आज ५५,०००+ रुपयांच्या घरात गेली.
तसे तर मराठी रियासतीमध्ये अनेक आयांनी असे बरेच योद्धे जन्माला घातलेत ज्यांनी आपले प्राण याच मराठी रियासतीच्या रक्षणार्थ ऐन तारूण्यात रणांगणावर खर्ची घातले...
मग ते सिंहगडाचे सिंह सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे असुदेत वा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे असुदेत...
शुजा उद्दौल्लाह ने ज्यांच्या मृत्युपश्चात फक्त गोऱ्यापान चेहऱ्यावरच ४० जखमा मोजल्या ते विश्वासराव पेशवे असोत वा निव्वळ "समयी का पावला नाहीत" म्हणणाऱ्या राजांच्या क्रोधाला उत्तर म्हणून केवळ ७ जणांना सोबत घेऊन मोगली छावणीत कहर माजवून मृत्युस आलिंगन देणारे प्रतापराव गुर्जर असोत...
या समस्त मराठी इतिहासात दोन शुरवीरांचे मृत्यू मात्र मनाला चटका लावून जातात...
त्यांचा इतिहास वाचतांना मनाला प्रचंड दाह झाल्याशिवाय राहत नाही आणि तोच दाह आज लेखणीतून रीता करावा या प्रामाणिक उद्देशाने आज काहीतरी अपणासमोर मांडतोय...
सर्वप्रथम.,
थोडंसं इतिहासात डोकावुयात.,
भगवान परशुरामाने म्हणे आपल्या क्रोधाग्नीच्या बळावर अखंड धरणी तब्बल २१ वेळा निक्षत्रीय केली होती म्हणे, अर्थात अखंड पृथ्वीस २१ प्रदक्षिणा घालत सर्वच्या सर्व क्षत्रिय राजांना यमसदनी धाडले होते ते केवळ आपल्या खांद्यावरील परशूच्या सहाय्याने...
या आख्यायिका रचणारेही अर्थात त्यांचेच वंशज, हेच ते ३% वाले....
मग त्या न्यायाने, या पृथ्वीतलावर हेच तेवढे एकमेव श्रेष्ठ हिंदू ठरतात आणि इतर सर्व शुद्र...
अगदी तुमच्या सकट बरं का शहाणे...
खरं तर गणेशोत्सव आला कि पाठोपाठ एक वाद नेहमीच येत असतो, "गणेशोत्सवाची सुरुवात प्रथम कुणी, कधी व का केली..?"
बहुतांश लोक हेच सांगतील कि,लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये एकजूट निर्माण करून त्याचा वापर स्वातंत्र्यलढ्यासाठी करण्यास्तव १८९४ साली पुण्यात गणेशोत्सवास सुरुवात केली.
पण ही माहिती मुळातच सपशेल चुकीची आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही. पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती...
भाऊसाहेब रंगारी, विश्वनाथ खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी १८९२ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी १८९३ मध्ये एक लेख लिहून केसरीतून घेतली होती.
त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच १८९४ साली टिळकांनी त्यास व्यापक स्वरूप दिले.