आरव कदम Profile picture
May 3 14 tweets 3 min read Twitter logo Read on Twitter
एकदा काय होतं,
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे खाजगी हेलिकॉप्टर बंद पडते.
पायलट लाख प्रयत्न करून बघतो पण निष्फळ, काही उपयोग होत नाही.
अखेरीस व्हाईट हाऊसमध्ये कार्यरत ड्युटी इंजिनिअरला पाचारण करतात, तो संपूर्ण हेलिकॉप्टर २-३ वेळा तपासून बघतो पण त्यातला दोष त्यालाही सापडत नाही. Image
मग स्थानिक इंजिनीअर्स येतात, कुणी इलेक्ट्रीकल तर कुणी मेकॅनिकल क्षेत्रातील मातब्बर असतात, सगळं इंजिन खोलून, तपासून परत जाग्यावर बसवतात पण काही म्हणता काही ही उपयोग होत नाही, हेलिकॉप्टर मात्र ढिम्मच, जागचं हलायला काही तयार नाही....
अखेरीस हेलिकॉप्टर कंपनीमधील इंजिनीअर्स ला थेट अलास्का वरून बोलावण्यात येतं...
आता खुद्द राष्ट्राध्यक्षांचं काम म्हटल्यावर बिचारे हातातलं सगळं काम सोडून धावत पळत व्हाईट हाऊस गाठतात.
ते सगळी माहिती घेतात, सगळं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा तपासतात पण त्यांनाही त्यात कुठलाच दोष अढळत नाही.
इकडे बायडेनची परिस्थिती मात्र नाजूक, दिवसभराचं संपूर्ण नियोजन कोलमडून पडलेलं, सवारी तर जागची हलायला तयार नाही, अर्थातच त्याचं फ्रस्ट्रेशन त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकू लागतं, ते बघून त्या हेलिकॉप्टर कंपनीमधील इंजिनीअर्सचा मुख्य जो असतो तो त्यास सुचवतो कि.,
"सर, भारतातील महाराष्ट्र राज्यात उल्हासनगरमध्ये भंगारबाजारात एक कारागीर आहे, जो इंजिनची सेल्स आणि सर्व्हिसिंग ची कामे करतो, कधीतरी गरजेनुसार मी त्याचा सल्ला अशा कामी घेत असतो, मला वाटतं आपण त्यालाच येथे बोलवावं, त्याच्याशिवाय कुणालाही हे काम जमेलसं वैयक्तिक मला तरी नाही वाटत."
बायडेन विचार करतो, असाही दिवस वाया गेलाच आहे, बघुया तरी हा भारतीय कारागीर आहे तरी काय चिज...
मग अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या तैनातीतलं खास एअर फोर्स वन चार्टर्ड जेट विमान निघतं ते थेट मुंबई विमानतळावर जाऊन उतरतं. उल्हासनगर भंगार बाजारातून महत्प्रयासाने त्याला शोधून काढलं जातं.
आणि आहे तशा अवस्थेत एअरफोर्स वन विमानाने थेट व्हाईट हाऊसमध्ये त्याला आणलं जातं...
बायडेन मोठ्या नवलाईने बघतात, 'नावापुरताच पांढरा म्हणता येईल अशा सदऱ्यातील, ती दाढीची खुंटं वाढलेली आणि जागोजागी वंगणाचे डाग पडलेली ती आसामी' आणि विचार करतात जीथं इंजिनिअर थकले तेथे हा काय करणार...
तो कारागीर अगदी शांतपणे त्या कंपनी इंजिनिअर्सच्या हेडकडून संपूर्ण परिस्थितीचं गांभिर्य समजावून घेतो, जरावेळ एकटक आकाशाकडे बघत काहीतरी विचार करतो, कानावर खोचलेली बिडी काढून शिलगावतो आणि तिचे झुरके घेत घेत एकदाच, फक्त एकदाच हेलिकॉप्टर चहुबाजूंनी फिरून बघतो आणि.,
क्षणात कुठल्यातरी निष्कर्षाप्रत पोहचल्याचा आविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागतो...
तो हेलिकॉप्टरच्या डाव्या बाजूने उभा राहतो व तेथे हजर असलेल्या सर्वांना आपल्या बाजूला येऊन उभं राहण्यास फर्मावतो, आता त्यास बायडेन तरी कसे अपवाद ठरतील, नाही का.
आणि आता तो आज्ञा देतो, "सर्वांनी मिळून हेलिकॉप्टरची डावी बाजू ४५ अंश कोनात उचलून धरायची आणि जोवर मी सांगत नाही तोवर खाली ठेवायची नाही..."
सर्वजण ताकद लावतात आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे करतात, अर्थात यासही बायडेन अपवाद नाहीतच....
हा स्वतः मात्र मस्त बिडीचे झुरके घेत त्यांच्या पाठीमागे उभा राहून मनगटावरील घड्याळात बघत कुठल्यातरी विचारात हरवून जातो....
सर्वांच्या हातांना कढ येतात पण खाली ठेवायची आज्ञा होईपर्यंत तसं करता सोय नाही आणि अखेरीस तशी आज्ञा येते.,
"हं, ठेवा आता खाली.."
खाली ठेवताक्षणीच पुढची आज्ञा पायलट साठी, "जा रे, सेल्फ मार..."
घाई घाई पायलट केबीनमध्ये घुसतो आणि सेल्फ मारतो तर काय आश्चर्य, हेलिकॉप्टर हाफ सेल्फमध्ये स्टार्ट होतं...
हा अचंबा बघून सर्वजण तर तोंडात बोटे घालायचीच काय तेवढी बाकी राहतात...
तो मात्र अगदी शांतचित्ताने उच्चारतो, "आता मला आणलं तसं‌ परत नेऊन ही घाला, दुकानात लै काम पडलंय..."

बायडेन त्याच्या गळ्यात हात घालुन त्यास एकाबाजूला घेऊन जातो आणि त्याला विचारतो, "भावा, जिथं अमेरिकन इंजिनिअर्स थप्पी पडले तिथं तु हे काम एवढ्या सहजतेने कसे काय केले...??"
तो अगदी शांतपणे उत्तर देतो.,
"माझ्याकडे बजाज कंपनीची जुनी चेतक स्कुटर आहे, ती बंद पडली की मी हेच करतो, ३ मिनिटांसाठी असं‌ उजव्या बाजूला काणं करून ठेवतो आणि मग किक मारतो, हाफ किकमध्ये स्टार्ट...
बस इथंही मी तेच केलं..."
#बायडेन_शॉक्स_कारागीर_रॉक्स 😜😂
#कधीतरी_ऐकलेलं
#सहजच
🤣🤣

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with आरव कदम

आरव कदम Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Aarav_D_K

Apr 22
#साडेतीन_संख्येचे_महात्म्य

महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची एकूण साडेतीन शक्तिपीठं आहेत.
कोल्हापूरची महालक्ष्मी माता एक शक्तिपीठ,
तुळजापूरची भवानी माता दुसरं तर,
माहूरची रेणुका माता तीसरं आणि,
नाशिक जिल्ह्यातील वणी-दिंडोरी येथील सप्तशृंगी माता हे अर्धं शक्तीपीठ...
तसेच, पेशवाईतील साडेतीन शहाणे ही महाराष्ट्राच्या इतिहासात तितकेच प्रसिद्ध आहेत...
सखारामपंत बोकील एक शहाणा, देवाजीपंत चोरघडे दुसरा तर,
विठ्ठल सुंदर हा तिसरा,
हे झाले पूर्ण शहाणे कारण हे मुत्सद्दी तसेच योद्धेही होते.
आणि उरलेला अर्धा शहाणा म्हणजे नाना फडणीस जो फक्त मुत्सद्दी होता.
आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील जनतेत साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांपैकी प्रचलित असलेले साडेतीन मुहूर्त...

मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून ज्याचं स्वागत गुढ्या व तोरणं उभारून केलं जातं तो गुढीपाडवा हा पहिला मुहूर्त...
Read 6 tweets
Apr 20
एक मनुष्य डोंगराळ भागातून पायदळी प्रवास करत होता,

अचानक त्याला एक आवाज आला "तिथेच थांब..."

तो तिथल्या तिथेच थांबला, व तो जसा थांबला त्याच्या समोरच डोंगरावरुन एक भला मोठा दगड पडला.

त्या माणसाने त्या आवाजाचे आभार मानले व पुढे निघाला.

😢😢
थोड्या दिवसांनी तो मनुष्य रस्त्याने जात असता पुन्हा त्याला आवाज आला "तिथेच थांब..."

तो तिथल्या तिथेच थांबला, आणि त्याच्या समोरुन अचानकपणे एक मोठी गाडी अत्यंत भरधाव वेगाने निघून गेली...
त्याने पुन्हा एकदा त्या आवाजाचे आभार मानले...
आणि यावेळी त्याने नम्रपणे विचारले "आपण कोण आहात, तुम्ही माझा प्रत्येकवेळी जीव वाचवत आहात?"

पुन्हा आवाज आला.

"मी तुझे रक्षण करणारा हितचिंतक देवदूत आहे..."

त्या माणसाने पुन्हा एकदा त्या आवाजाचे आभार मानले....

....आणि अश्रु भरल्या डोळ्यांनी रडत-रडत विचारले....
Read 5 tweets
Mar 19
मित्र, नामे अजय राहाणे, राहणार पंचकेश्वर, ता.निफाड, जी.नाशिक याच्यासोबत सकाळी दुरध्वनी द्वारे चर्चा झाली, विषय अर्थातच काल निफाड तालुक्यात झालेल्या गारपिटीसंदर्भातील होता...
अजयचं स्वतःचं क्षेत्र म्हणाल तर नाममात्र एकरभर, त्यात त्याने ७५% अर्थात दिड बीघा द्राक्षबाग केलेली आहे व उर्वरित अर्धा बीघा म्हणजे १० गुंठे हे तो घरच्या दुभत्या जनावरांच्या वैरणीसाठी राखून ठेवत असतो.
या दीड बीघा क्षेत्रात तो थॉमसन सिडलेस नामे द्राक्षाच्या व्हरायटीचं उत्पादन घेत असतो, वर्षभर त्याची निगा राखणे, त्याला वेळच्यावेळी खतं-औषधी फवारणं, वेळच्यावेळी मजुरांद्वारे डिपींग-थिनिंग सारखी कामं करुन घेणं, या सर्व मशागतीपोटी त्याला वर्षाकाठी दिड-पावणेदोन लाखाचा खर्च पडतो.
Read 14 tweets
Mar 13
नुकताच एक लेख वाचण्यात आला, खरोखर डोळ्यात अंजन घालणारे लिखाण वाटले म्हणून आपल्या सर्वांसमवेत शेअर करत आहे, बघा, पटतंय का....🙏🏻

काही चुकत असेल तर तसं ही सांगा...🙏🏻

#कृषीविषयक⛏️
#थ्रेड👇🏻
२०१३ मध्ये कांदा ७००/- रुपये क्विंटलने विकला होता आणि २०२३ ला, कालच कांदा ७००/- रुपये प्रति क्विंटलनेच विकला आहे...
फरक इतकाच आहे, २०१३ मध्ये डिएपी ५६०/- रुपयांना एक बॅग होती आज १९००/- रुपयांना एक बॅग आहे..
तेव्हा लागवड मजुरी ५०००/- रुपये एकर होती आता ११,०००/- रुपये एकर आहे...
मजूर तेव्हा ५००/- रुपयांचा गॅस भरत होता, तोच आज १२००/- रुपयांना झालाय...
२०१३ ला ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर मशिन ६,००,०००/- रुपयांत सहज बसून जात होते आज तोच संपूर्ण सेट घेतला तर ११,००,०००/- रुपये लागत आहेत.
तेव्हा मिळणारी १५,०००/- रुपयांची बैलजोडी आज ५५,०००+ रुपयांच्या घरात गेली.
Read 11 tweets
Mar 11
तसे तर मराठी रियासतीमध्ये अनेक आयांनी असे बरेच योद्धे जन्माला घातलेत ज्यांनी आपले प्राण याच मराठी रियासतीच्या रक्षणार्थ ऐन तारूण्यात रणांगणावर खर्ची घातले...

मग ते सिंहगडाचे सिंह सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे असुदेत वा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे असुदेत...
शुजा उद्दौल्लाह ने ज्यांच्या मृत्युपश्चात फक्त गोऱ्यापान चेहऱ्यावरच ४० जखमा मोजल्या ते विश्वासराव पेशवे असोत वा निव्वळ "समयी का पावला नाहीत" म्हणणाऱ्या राजांच्या क्रोधाला उत्तर म्हणून केवळ ७ जणांना सोबत घेऊन मोगली छावणीत कहर माजवून मृत्युस आलिंगन देणारे प्रतापराव गुर्जर असोत...
या समस्त मराठी इतिहासात दोन शुरवीरांचे मृत्यू मात्र मनाला चटका लावून जातात...
त्यांचा इतिहास वाचतांना मनाला प्रचंड दाह झाल्याशिवाय राहत नाही आणि तोच दाह आज लेखणीतून रीता करावा या प्रामाणिक उद्देशाने आज काहीतरी अपणासमोर मांडतोय...
Read 23 tweets
Jan 23
आता विषयास हात घातलाच आहे तर एकदा खोलात जाऊन अभ्यास करूयात.,

काय म्हणता शहाणे.....??
सर्वप्रथम.,
थोडंसं इतिहासात डोकावुयात.,
भगवान परशुरामाने म्हणे आपल्या क्रोधाग्नीच्या बळावर अखंड धरणी तब्बल २१ वेळा निक्षत्रीय केली होती म्हणे, अर्थात अखंड पृथ्वीस २१ प्रदक्षिणा घालत सर्वच्या सर्व क्षत्रिय राजांना यमसदनी धाडले होते ते केवळ आपल्या खांद्यावरील परशूच्या सहाय्याने...
या आख्यायिका रचणारेही अर्थात त्यांचेच वंशज, हेच ते ३% वाले....
मग त्या न्यायाने, या पृथ्वीतलावर हेच तेवढे एकमेव श्रेष्ठ हिंदू ठरतात आणि इतर सर्व शुद्र...
अगदी तुमच्या सकट बरं का शहाणे...
Read 17 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(