आरव कदम Profile picture
I was born Intelligent, but Education ruined me... 😔😒
Jun 1, 2023 8 tweets 2 min read
पत्रिका न काढता, कुंडली न बनवता, ती न पाहताही आयुष्यात यशस्वी होता येतं याचा धडधडीत पुरावा म्हणजे १ जून जन्मतारीख असलेली कर्तृत्ववान माणसं..!

तारीख, वेळ, दिवस, वार, हे सर्व माणसानं मोजण्यासाठी बनवलेली एककं आहेत.
जसं किलो, मीटर, फूट ही जशी एककं., Image तसलंच हेसुद्धा एक एकक ही साधी सोपी गोष्ट समजून घेतली की, यश त्या गोष्टींवर अवलंबून नसतं, तर यश माणसाच्या कर्तृत्वावर, कर्मावर ठरतं हे मान्य करायला लागतं..!

पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून अलिप्त ठेवलेल्या समाजाला शिक्षणाची कवाडं समाजसुधारकांनी उघडली,
May 3, 2023 14 tweets 3 min read
एकदा काय होतं,
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे खाजगी हेलिकॉप्टर बंद पडते.
पायलट लाख प्रयत्न करून बघतो पण निष्फळ, काही उपयोग होत नाही.
अखेरीस व्हाईट हाऊसमध्ये कार्यरत ड्युटी इंजिनिअरला पाचारण करतात, तो संपूर्ण हेलिकॉप्टर २-३ वेळा तपासून बघतो पण त्यातला दोष त्यालाही सापडत नाही. Image मग स्थानिक इंजिनीअर्स येतात, कुणी इलेक्ट्रीकल तर कुणी मेकॅनिकल क्षेत्रातील मातब्बर असतात, सगळं इंजिन खोलून, तपासून परत जाग्यावर बसवतात पण काही म्हणता काही ही उपयोग होत नाही, हेलिकॉप्टर मात्र ढिम्मच, जागचं हलायला काही तयार नाही....
Apr 22, 2023 6 tweets 2 min read
#साडेतीन_संख्येचे_महात्म्य

महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची एकूण साडेतीन शक्तिपीठं आहेत.
कोल्हापूरची महालक्ष्मी माता एक शक्तिपीठ,
तुळजापूरची भवानी माता दुसरं तर,
माहूरची रेणुका माता तीसरं आणि,
नाशिक जिल्ह्यातील वणी-दिंडोरी येथील सप्तशृंगी माता हे अर्धं शक्तीपीठ... तसेच, पेशवाईतील साडेतीन शहाणे ही महाराष्ट्राच्या इतिहासात तितकेच प्रसिद्ध आहेत...
सखारामपंत बोकील एक शहाणा, देवाजीपंत चोरघडे दुसरा तर,
विठ्ठल सुंदर हा तिसरा,
हे झाले पूर्ण शहाणे कारण हे मुत्सद्दी तसेच योद्धेही होते.
आणि उरलेला अर्धा शहाणा म्हणजे नाना फडणीस जो फक्त मुत्सद्दी होता.
Apr 20, 2023 5 tweets 4 min read
एक मनुष्य डोंगराळ भागातून पायदळी प्रवास करत होता,

अचानक त्याला एक आवाज आला "तिथेच थांब..."

तो तिथल्या तिथेच थांबला, व तो जसा थांबला त्याच्या समोरच डोंगरावरुन एक भला मोठा दगड पडला.

त्या माणसाने त्या आवाजाचे आभार मानले व पुढे निघाला.

😢😢 थोड्या दिवसांनी तो मनुष्य रस्त्याने जात असता पुन्हा त्याला आवाज आला "तिथेच थांब..."

तो तिथल्या तिथेच थांबला, आणि त्याच्या समोरुन अचानकपणे एक मोठी गाडी अत्यंत भरधाव वेगाने निघून गेली...
त्याने पुन्हा एकदा त्या आवाजाचे आभार मानले...
Mar 19, 2023 14 tweets 4 min read
मित्र, नामे अजय राहाणे, राहणार पंचकेश्वर, ता.निफाड, जी.नाशिक याच्यासोबत सकाळी दुरध्वनी द्वारे चर्चा झाली, विषय अर्थातच काल निफाड तालुक्यात झालेल्या गारपिटीसंदर्भातील होता... अजयचं स्वतःचं क्षेत्र म्हणाल तर नाममात्र एकरभर, त्यात त्याने ७५% अर्थात दिड बीघा द्राक्षबाग केलेली आहे व उर्वरित अर्धा बीघा म्हणजे १० गुंठे हे तो घरच्या दुभत्या जनावरांच्या वैरणीसाठी राखून ठेवत असतो.
Mar 13, 2023 11 tweets 4 min read
नुकताच एक लेख वाचण्यात आला, खरोखर डोळ्यात अंजन घालणारे लिखाण वाटले म्हणून आपल्या सर्वांसमवेत शेअर करत आहे, बघा, पटतंय का....🙏🏻

काही चुकत असेल तर तसं ही सांगा...🙏🏻

#कृषीविषयक⛏️
#थ्रेड👇🏻 २०१३ मध्ये कांदा ७००/- रुपये क्विंटलने विकला होता आणि २०२३ ला, कालच कांदा ७००/- रुपये प्रति क्विंटलनेच विकला आहे...
फरक इतकाच आहे, २०१३ मध्ये डिएपी ५६०/- रुपयांना एक बॅग होती आज १९००/- रुपयांना एक बॅग आहे..
तेव्हा लागवड मजुरी ५०००/- रुपये एकर होती आता ११,०००/- रुपये एकर आहे...
Mar 11, 2023 23 tweets 4 min read
तसे तर मराठी रियासतीमध्ये अनेक आयांनी असे बरेच योद्धे जन्माला घातलेत ज्यांनी आपले प्राण याच मराठी रियासतीच्या रक्षणार्थ ऐन तारूण्यात रणांगणावर खर्ची घातले...

मग ते सिंहगडाचे सिंह सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे असुदेत वा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे असुदेत... शुजा उद्दौल्लाह ने ज्यांच्या मृत्युपश्चात फक्त गोऱ्यापान चेहऱ्यावरच ४० जखमा मोजल्या ते विश्वासराव पेशवे असोत वा निव्वळ "समयी का पावला नाहीत" म्हणणाऱ्या राजांच्या क्रोधाला उत्तर म्हणून केवळ ७ जणांना सोबत घेऊन मोगली छावणीत कहर माजवून मृत्युस आलिंगन देणारे प्रतापराव गुर्जर असोत...
Jan 23, 2023 17 tweets 4 min read
आता विषयास हात घातलाच आहे तर एकदा खोलात जाऊन अभ्यास करूयात.,

काय म्हणता शहाणे.....?? सर्वप्रथम.,
थोडंसं इतिहासात डोकावुयात.,
भगवान परशुरामाने म्हणे आपल्या क्रोधाग्नीच्या बळावर अखंड धरणी तब्बल २१ वेळा निक्षत्रीय केली होती म्हणे, अर्थात अखंड पृथ्वीस २१ प्रदक्षिणा घालत सर्वच्या सर्व क्षत्रिय राजांना यमसदनी धाडले होते ते केवळ आपल्या खांद्यावरील परशूच्या सहाय्याने...
Aug 31, 2022 13 tweets 4 min read
#थ्रेड

खरं तर गणेशोत्सव आला कि पाठोपाठ एक वाद नेहमीच येत असतो, "गणेशोत्सवाची सुरुवात प्रथम कुणी, कधी व का केली..?"

बहुतांश लोक हेच सांगतील कि,लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये एकजूट निर्माण करून त्याचा वापर स्वातंत्र्यलढ्यासाठी करण्यास्तव १८९४ साली पुण्यात गणेशोत्सवास सुरुवात केली. पण ही माहिती मुळातच सपशेल चुकीची आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही. पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती...