“एक दिवस आम्ही अदृश्य होऊ,” असे तुवालू - Tuvalu देशाचे नागरिक गेली काही वर्ष म्हतायत. समुद्र सर्व वाळू खात आहे. पूर्वी तिथे वाळू लांब लांब पसरली जायची, आणि लोकांना तिथे पोहताना कोरल दिसायचे. आता सर्व वेळ ढगाळ वातावरण आहे आणि कोरल पण मरण पावले आहेत. तुवालू बुडत आहे.
हे सगळं वाचून भितीदायक वाटतं ना? खरंच तुवालू बुडत आहे. तुवालू हा देश म्हणजे जगातील किमान भेट दिलेला देश आहे. केवळ २००० लोकं वर्षभरातून तुवालूला भेट देतात (फेसबुकवरसुद्धा फक्त १० हजार लोकांनी तिथं check in केलंय).
तुवालू हा दक्षिण पॅसिफिकमधील नऊ लहान बेटांचा गट आहे
ज्याने १९७८ मध्ये युनायटेड किंगडममधून स्वातंत्र्य मिळवले. ऑस्ट्रेलिया देशाच्या उत्तर-पूर्वेकडे तर फिजी देशाच्या उत्तरेला तुवालू हा देश आहे. फुनाफुटी ही तुवालूची राजधानी आहे. शक्यतो गुगल मॅप्सवर बघितलं तर दिसत नाहीच परंतु नावाने लगेच सापडतो पण असंख्य लोकांनी कधी सर्चही केले नसेल.
या देशात जवळपास ११ हजार लोकसंख्या आहे. Climate Change/Global Warming मुळे त्या देशाची पूर्णपणे वाट लागलीये म्हणून तुवालू बुडत आहे असं म्हंटलं जातं.
जगातील Climate Change वर काम करणारे काही मोजके लोकं तिथे जातात. तीन दिवसातून एकदा त्या देशात विमान येतं
आणि इतर वेळी लोकं एअरपोर्टवर रोज मनसोक्त खेळतात. हा एक सडपातळ देश आहे. कुठंही उभं राहिलं की दोन्ही बाजूचा समुद्र दिसतो. २६ स्क्वेअर किमी या देशाचा एरीया आहे. जवळपास गाडीवर जर चक्कर मारायची म्हंटलं तर हा देश फक्त ९ किलोमीटिरचा आहे. ३०/४० मिनिटात तर चक्कर मारता येते.
१९८९ ला United Nations ने असं म्हंटलंय की येत्या काही वर्षात हा देश Global Warming मुळे नाहीसा होईल.
तुवालूला कुठला भारतीय प्रवासी गेलाय का याचा मी शोध घेतोय. कोणाला काही त्याबद्दल माहिती मिळाली तर सांगावं. निदान त्या व्यक्तीचे किस्से तरी ऐकता येतील.
तर, १९६ देश या जगात आहेत. किती देशात मी जाऊ शकेल माहिती नाही परंतु जमलंच तर तुवालूला नक्की जाईन. एवढंच की तिथे जायला चिक्कार पैसे लागतील. पण बघू... स्वप्न बघायला काय हरकत आहे. त्यातूनच तर जिंदगी वसूल करण्याची उर्जा मिळते!
- साकू
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या २०२० च्या आकडेवारीनुसार, जवळपास १३.६ दशलक्ष भारतीय भारताबाहेर राहतात. या संख्येतील सर्वात मोठा हिस्सा, ३४ लाख लोकं संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २५ लाख लोकं सौदी अरेबियामध्ये आणि अमेरिकेत १३ लाख भारतीय राहतात.
तसेच कुवेतमध्ये १० लाख, ओमानमध्ये ७.७९ लाख आणि कतारमध्ये ७.५६ लाख भारतीय राहतात. थोडक्यात काय, तर परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, बहुसंख्य NRIs, जवळजवळ ७.६ दशलक्ष मध्य पूर्व म्हणजेच आखाती (Gulf) अर्थातच मुस्लिम देशात राहतात. हे भारतीय आपल्या देशात परकीय चलन आणतात जे की मोठं काम आहे.
२०१७ मध्ये, आखाती देशांमधून भारतात ३७ अब्ज डॉलर्स पाठवले गेले. आखाती देश लाखो भारतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देतात आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फलदायी असतात. दूर्दैवाने, भाजपातील काही मुख्य लोकं द्वेषापोटी मूर्खपणे काही ही बरळतात आणि परिणामी भारताची बदनामी होते.
“एक लक्षात घेतले पाहिजे की, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, तो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे केला आणि तो तसा करणे आवश्यक होते. याचा अर्थ शिवाजी महाराजांचे राज्य फक्त हिंदूंकरिता निर्माण झाले असे नाही. शिवरायांचे राज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. #ShivrajyabhishekDin#Shivray
आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रापासून पूर्णपणे फारकत न घेता शास्त्र व परंपरा सांभाळून महाराजांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर सर्व देशातल्या भूमिपुत्रांना आश्वस्त केले. या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे.”
- डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक #ShivajiMaharaj
सांस्कृतिक संघर्ष उभा राहवा म्हणून काहीजण त्यांच्या पद्धतिने/सोयाने मुद्दे मांडतात परंतु ते जनसामन्यांना पटत नाही कारण आता लोक तेवढे चिकित्सक नक्कीच झाले आहेत आणि त्यात डॉ. जयसिंगराव पवार सरांसारखे ज्येष्ठ इतिहास संशोधक असल्यामुळे आपल्या सर्वांपुढे खरा इतिहास समोर येतो.