Long #Thread#TheKerelaStory
"दिवाळीला आई काहीतरी पूजा करते, मला त्यात इंटरेस्ट नाही.लहानपणी शाळेला सुट्टी असायची म्हणून दिवाळीची मजा यायची आता काय करायचं जाऊन घरी", "१०० देव आहेत,कोणाला मानायचं?" "जो देव स्वतःच्या बायकोचं रक्षण करू शकत नाही तो आपल्याला काय वाचवणार?"
हे सगळं ऐकल्यासारखं वाटतंय का हो? शाळा, कॉलेजच्या आवारात, अगदी काहींच्या घरात सुद्धा.. आज हेच संवाद ऐकले The Kerala Story चित्रपट बघताना, नायिकांच्या तोंडून. संवादातला फरक फक्त इतकाच आहे हे सगळं म्हणता यायला आणि इथून पुढेही म्हणत राहायला आपण, आपली मुलं सुरक्षित आहेत. अजून तरी..
दुर्दैवाने त्या नायिका मात्र लव्ह जिहादच्या शिकार बनल्या आहेत.त्यातली एक जण आज जिवंत नाही, तिचे आई वडील रोज नरकयातना भोगत आहेत. एक जण आजही इराण - अफगाणिस्तान बॉर्डर वरील जेल मध्ये आहे, तिची आई तिच्या परतण्याची आस लावून रोजचा दिवस ढकलते आहे. एक भारतातच आहे, +
जिवंत आहे पण झालेल्या बलात्काराची जखम शरीरावर आणि मनावर घेऊन सिस्टीमशी लढते आहे. ही कुठलीही काल्पनिक कथा नाही. प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत. आणि याच नाहीत असंख्य आहेत. आजकाल फक्त मुलीच नाही मुलं सुद्धा लव्ह जिहादची शिकार बनली आहेत.
The Kerala Story, देवभूमी केरळ येथील कासारगोड मध्ये घडणारी घटना. मुलींना कसं ठरवून टार्गेट करून या जाळ्यात ओढलं जातं, कसं पद्धतशीर brainwash केलं जातं, त्यांचे परतीचे मार्ग कसे बंद केले जातात यावर अगदी स्पष्टपणे प्रकाश टाकला आहे. आपण खूप सहजपणे म्हणतो इतक्या शिकलेल्या मुली +
इतक्या बिनडोकपणे वागताताच कशा?मूळात त्यातील अनेक जणी भावनिकदृष्ट्या कमकुवत म्हणजेच धर्माचा अभ्यास-अभिमान नसलेल्या, तरुण वयातील शारीरिक आकर्षणाला बळी पडलेल्या, घरच्यांकडून मानसिक गरजा पूर्ण होत नसलेल्या इ. असतात म्हणूनच त्यांना हेरलं जातं.
त्यातून त्यांच्यावर त्यांच्याही नकळत केले जाणारे ड्रग्सचे प्रयोग, सततचा इस्लामच्या कौतुकाचा मारा, भावनिक फसवणुकीतून ठेवलेले शारीरिक संबंध याचा परिणाम होऊच शकतो. हा सापळा वाटतो तेवढा साधा नाही आणि त्यात अडकलेली व्यक्ती त्यातून बाहेर निघणं त्याहून साधं नाही.
मोठ्या पडद्यावर त्यांचा एकूण प्रवास आणि त्रास बघणं अंगावर येतं. कित्येक मुली यातून बाहेर येऊ शकलेल्या नाहीत, त्यांचं पुढे काय झालं हेही कळलेलं नाही हे वास्तव भीषण आहेच त्याहूनही जास्त त्या कशा अडकवल्या जातात हे अधिक भीषण आहे.
फक्त हिंदूच नाही तर इस्लाम सोडून इतर सर्व धर्मीय मुली याला बळी पडलेल्या आहेत. हल्ली अनेक मुलं सुद्धा बळी पडत आहेत.
आज फार लिहीत नाही. आपल्या मुलींना आवर्जून दाखवूया हा चित्रपट, हिंदू म्हणून पुन्हा एकदा जगायला शिकू, हिंदू आहोत हे दाखवायला शिकू, हिंदू म्हणजे काय हे जाणून घेऊन तसे राहायला लागू, संघटित होऊ, संकटाला वेळीच ओळखून सावध होऊ आणि सक्षमपणे सामोरे जाऊ.
"तुम्ही आम्हाला लहानपणापासून का बरं आपल्या धर्माबद्दल कधीच काही शिकवलं नाही?" असं म्हणायची चित्रपटातील नायिकेसारखी वेळ आपल्या पुढच्या पिढ्यांवर येणार नाही याची काळजी घेऊ.
#thread आज हिंदू घरांमधून गेल्या अनेक वर्षांपासून आजी-आजोबांबरोबर घरातली,शेजारपाजारची लहान मुलं कीर्तनाला जायची बंद झाली,लहान मुलं काय हल्लीचे आजी आजोबाच जायचे बंद झाले.सायंकाळचं देवासमोर दिवा लावून आईबरोबर शुभंकरोती,रामरक्षा,मनाचे श्लोक म्हणणं बंद झालं. #lovejihaad
ज्ञानेश्वरी, दासबोधासारख्या धार्मिक ग्रंथांचं पठण कमी झालं.अध्यात्माचा रोजच्या आयुष्याशी असलेला संबंध जवळपास संपुष्टात आला.आपल्याकडे एक अत्यंत मोठा गैरसमज आहे की अध्यात्म हे म्हाताऱ्या माणसांसाठीअसतं.कीर्तन,अभंग,गीता,ज्ञानेश्वरी,दासबोध आणि असे अनेक ग्रंथ माणसाला #AftabPoonawalla
आयुष्य नेमकं कसं जगावं हे शिकवतात ते आयुष्य संपत आल्यावर वाचून- ऐकून काय उपयोग? त्या वयात माणूस आपल्या वागण्या बोलण्यात आयुष्य जगण्यात काडीमात्र फरक करू इच्छित नसतो! आणि ज्या वयात हे सारं वाचायला हवं त्या वयात आतल्या सैतानाला जागवणाऱ्या भडक वेबसेरीज बघत अख्खी रात्र घालवत आपली +
By Tushar Damgude, Thread 👇🏻
शरद पवार यांनी नुकतेच उल्लेख केलेल्या जेम्स लेनच्या पुस्तकावर ते पुस्तक प्रकाशित झाले तेव्हाच वाचल्याबरोबर त्यातील मजकूर आक्षेपार्ह वाटल्याने त्या पुस्तकावर बंदी घालावी म्हणून पुण्याचे तत्कालीन खासदार प्रदीपदादा रावत, बाबासाहेब पुरंदरे,
जयसिंग पवार,निनाद बेडेकर, सदाशिव शिवदे, वसंत मोरे आदी इतिहासकार मंडळी यांनी सरकार व प्रकाशकाकडे पत्र दिले, प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे या पुस्तकावर बंदी घातली गेली.
पण हे प्रकरण एवढ्या वरचं थांबत नाही. 'शिवाजी ; अ हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' आहे
या जेम्स लेन लिखित पुस्तकावरील बंदी उठवावी असं महाराष्ट्रातील काही लोकांना वाटलं आणि त्यांनी त्यासाठी न्यायालयीन कारवाई चालू केली. महाराष्ट्रात असलेल्या तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकार तर्फे न्यायालयात सबळ बाजू मांडता न आल्याने या पुस्तकावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली.