चहा..❤️
काही महिण्यापासून मॉर्निंग वॉकला येणाऱ्या आजोबांबरोबर मैत्री झाली.रोज सकाळी माझी ऑफिसला यायची वेळ आणि त्यांची वॉकला यायची वेळ एकदम जुळून आली होती.गेल्या दोन-अडीच महिण्यापासून रोज भेटणं आणि गप्पा मारत मारत चहा ओढणं चालू होतं. कधी मला उशीर झाला, आलो नाही तर आजोबा माझ्या 👇
नावानं चहा पिऊन जातं.पण गेल्या हफ्त्यात ते आलेच नाही..😔 म्हणून चहा वाल्याकडं चौकशी केली, तर तो बोलला बाबा कालचं दुसऱ्या रस्त्याला दिसलें मला.आज- काल इकडं येतच नाही.मला जरा वाईट वाटलं आपल्या कडून काही चुकलं का, बाबांना काय झालं, कोण्ही बोललं असेल का असे असंख्य प्रश्न डोकयात👇
घोंगावात होते.उद्या भेटू बाबांना असं ठरवून ऑफिसवर येऊन काम चालू केलं.कामाची धावपळ,फोन चालू असतानाच एक जोडपं मला भेटायला आलं.बाई एकदम चिडलेली होती, पुरुष तीला दापत होता.. दोघांची घाल मेल बघून विचारलं बोला मॅडम काय काम आहे..माझा आवाज ऐकताच बाई.. तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे की👇
नाही? तुम्ही स्वतःला काय दानशूर समजता का? मी काय बोलावं तेचं कळना म्हणून चहा सांगतो मॅडम..आपण चहा पिऊ मग बोलू सविस्तर असं बोललो तर मॅडम चा पारा अजून वाढला.. तुमच्या चहानीच वाट लावलीय आमची आणि वर थोबाड करून अजून चहा सांगताय लाज नाही वाटतं का तुम्हाला..आता मात्र माझं डोकं फिरलं 👇
ओ मॅडम एक तर तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये काही काम नसताना आलात आणि येऊन शिव्या काय देताय.. काय झालं ते पहिलं सांगा मला.. तुमच भांडायचं कारण काय ते सांगा पहिलं.. मग त्या सभ्य पुरुष्याने त्या बाईला गप्प करून बोलण चालू केलं.. हे पहा दादा तुम्ही रोज ज्या बाबांना चहा पाजता ना ते माझे 👇
सासरे आणि हिचे वडील आहेत. त्यांना साखरेचा त्रास आहे.. त्यामुळं आम्ही त्यांना गोड चहा नाही देत..काही महिण्यापासून ते मॉर्निंग वॉकला जातो म्हणून सांगतात आणि तुमच्या बरोबर इथं येऊन चहा पितात.. त्यांची साखर वाढलीये आता आणि त्यांची साखर कंट्रोल होतं नाही म्हणून आम्ही काळजी करत 👇
असतो.तुम्ही त्यांना परत भेटला तर चहा पाजू नका एवढीच विनंती करायला आलोय आम्ही.. आणी त्यांना भेटू पण नका आता. असं सगळं बोलून इकडच्या तिकडच्या गप्पा मारून ते जोडपं निघून गेलं..आता या सर्व प्रकारात चुकी कुन्हाची.. 🤔
मी बाबांना चहा पाजून माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला..👇
बाई नी मुलगी या नात्यानी बापाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला..
बाबांनी कित्येक वर्षांपासून लागलेली चाहाची तलब पूर्ण करण्याचा प्रयत्न केला..
यात गोड असलेला चहा मात्र पांचट होऊन गेला ..😔 #चहा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गांव... ✊️❤️
गांव आपल्या प्रत्येकाच असं हक्काचं ठिकाण. जिथं आपल्या जन्मापासून सुरु झालेला जीवन प्रवास मृत्युच्या सरणावर चढू पर्यंत साथ देणार एक अविस्मरणीय ठिकाण असत.बदलत्या काळानुसार गांव पण बदलत गेलं.पंचवीस तीस वर्षांपूर्वीच अनुभवलेलं गांव आता बदलेलं दिसत.सकाळी हफश्याच्या..👇
खडकड आवाजानी तर कधी गाय,म्हशी, चिमण्याच्या आवाजाने जागं होणार गांव आता मोबाईल अलार्मने जागं होतं.सकाळी किटलीत पावशेरच्या मापाने दूध टाकणारा गवळी आता पिशवी घेऊन येतो.चपातीचा वास,चटणीचा ठसका, अंड्याच्या पोळीचा घमघमाट आता नाहीसा झालाय, त्याची जागा ब्रेड, मॅगी सॅन्डविच ने.. 👇
घेतलीये. दुपारी जेवताना प्रत्येकाच्या घरातून ताटात काहीतरी आणलं जायचं न विचारता एकमेकांना घास भरवत असलेले मित्र आज मी जेवण करून घेतो तु ऐ नंतर असं बोलायला लागलेत.गावातलं सुख - दुःखातलं कुठलंही कार्य असलं तर पडेल ते काम करायला धजनारी तरुण मुलं -मुली आज इव्हेंट मॅनेजमेंट.. 👇
बाप..✊️❤️
दहावीला असताना शाळेत लागणाऱ्या वह्या, पुस्तकांसाठी बापाला निरोप पाठवला होता.तालुक्याच्या बाजाराचा दिवस पकडून दादा आले.नायलॉनची भली मोठी लिंबाने भरलेली पिशवी सायकलच्या हँडल ला अडकवून उन्हा तान्हात ते आले होते.थोडा वेळ मी राहत असलेल्या वसतिगृहात विश्रांती करून मी.. 👇
एवढे लिंब विकून येतो असं बोलून गेले.मी शाळेत नं जाता त्यांची जवळ पास तीन-चार तास वाट पाहत बसलो.ते आले.चेहरा थोडा पडलेला होता,लिंबाची पिशवी खाली होती,अंगावरचे कपडे घामाने भिजलेले होते.पाच दहा मिनटं बसल्यावर वसतिगृहाच्या मुलांचा आणि शिक्षकांचा अंदाज घेऊन जरा डबक्या आवाजात.. 👇
"तुमचे जेवणं झाले का,?सर बाहेर आहे वाटतं, आता पोर किती आहेत आत, असं सगळं बोलत असतानाच मी लगेच मध्येच बोललो दादा तुम्हाला जेवण आणू का उरलेलं कालवण आणि भाकरी आहेत.ते लगेच बर आन मला पण भूक लागलीये.. पण तुला तुझे सर काही बोलणार तर नाही ना?नाही बोलणार असं बोलून मी चार पळी कालवण.. 👇