ओएनडीसी आहे तरी काय?
भारत सरकारने एप्रिल २०२२ मध्ये 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' लाँच केले ज्याला ओएनडीसी असेसुद्धा म्हटले जाते. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला एक पर्याय म्हणून भारत सरकारचा हा उपक्रम आहे. #म#मराठी#ONDC
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड या एका खाजगी नॉन प्रॉफिट कंपनीने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अंतर्गत ओएनडीसीची सुरुवात केली आहे. भारतामध्ये ई-कॉमर्सचे ओपन नेटवर्क डेव्हलप करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. #म#मराठी#ONDC
ओएनडीसी म्हणजे काय? हे थोडक्यात सांगायचं झालं तर ई-कॉमर्स क्षेत्रातील छोट्या आणि मोठ्या कंपन्यांचं हे नेटवर्क आहे. या नेटवर्कचा वापर करून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ई-कॉमर्स प्लेयर्सचे वर्चस्व काही प्रमाणात कमी करायचे असा यामागचा हेतू आहे.#म#मराठी#ONDC
किराणा माल, इतर ग्रॉसरी, फूड डिलिव्हरी, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल बुकिंग अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये जे स्थानिक ई-कॉमर्स प्लेयर्स आहेत त्यांना ओएनडीसी नेटवर्क खुले असेल. याशिवाय जर ॲमेझॉन फ्लिपकार्ट या मोठ्या प्लेयर्सने #म#मराठी#ONDC
ओएनडीसी इंटिग्रेट करून घेतले तर ॲमेझॉनवर एखादे प्रॉडक्ट तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला त्याच प्रॉडक्टसाठी फ्लिपकार्टचे रिझल्टसुद्धा ॲमेझॉनच्याच ॲप मध्ये दिसू शकतील.
ओएनडीसीचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे तो म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांची ई-कॉमर्स क्षेत्रातील #म#मराठी#ONDC
आणि एकूणच डिजिटल क्षेत्रातील जी मोनोपॉली आहे ती मोडून काढायची आणि स्मॉल मिडीयम एंटरप्रायजेस, मायक्रो एंटरप्रायजेसला नवनवीन संधी उपलब्ध करून द्यायच्या.
सध्या ओएनडीसी पायलट म्हणून भारतातील पाच शहरांमध्ये चालवले जात आहे. #म#मराठी#ONDC
यामध्ये बेंगलोर, दिल्ली, कोइंबतूर, भोपाळ आणि शिलॉंग या शहरांचा समावेश आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत भारतातील 100 शहरांमध्ये ओएनडीसी सुरू होईल असे नियोजन आहे.
ओएनडीसी महत्त्वाचे का? ओएनडीसीमुळे मोठ्या प्लेयरची मोनोपॉली कमी करणे शक्य होईल.#म#मराठी#ONDC
याशिवाय जे छोटे मर्चंट आहेत त्यांचा रिच वाढवणे सोपे होईल. या मर्चंटला जास्तीत जास्त बायर्स उपलब्ध होतील. मोठे प्लेयर्स प्रायसिंग स्ट्रॅटेजी वापरून जो अवास्तव नफा कमवतात त्यावर काही प्रमाणात नियंत्रण येईल.#म#मराठी#ONDC
येणाऱ्या दोन वर्षांमध्ये ओएनडीसी भारतातील २५% कंझ्यूमर परचेससाठी वापरले जाईल असे त्यांचे लक्ष आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे ९० कोटी बायर्स रजिस्टर करतील यासाठी ते प्रयत्नशील असतील.#म#मराठी#ONDC
ओएनडीसी म्हणजे काय? हे त्यांच्याच कर्मचाऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक शॉपिंग मॉल आहे. मात्र नेहमीच्या शॉपिंग मॉलला जशी दोनच गेट असतात त्या ऐवजी या मॉलला १००० गेट आहेत. त्यामुळे हा मॉल ठराविक सेलर्स पुरता मर्यादित न राहता तिथे अधिकाधिक सेलर्सला आपले प्रॉडक्ट विकता येतील.
फ्लिपकार्टची मालकी असलेली लॉजिस्टिक कंपनी इ-कार्ट, रिलायन्स रिटेलची गुंतवणूक असलेली डन्झो यासारख्या कंपन्यांनी ओएनडीसी आपल्या प्लॅटफॉर्मवर इंटिग्रेट करून घेतले आहे. फोन पे देखील लवकरच ओएनडीसी नेटवर्क जॉईन करतील. #म#मराठी#ONDC
याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक यासारख्या बँका ओएनडीसीबरोबर चर्चेत आहेत. ओएनडीसीचा वापर करून कर्जवाटप, क्रेडिट कार्ड इश्यू करणे आणि इतर सर्विसेस बँका सहजरित्या देऊ शकतील.#म#मराठी#ONDC
ओएनडीसी समोरचे प्रमुख आव्हान याबाबत भारतामध्ये जास्तीत जास्त जनजागृती करणे जास्तीत जास्त सेलर्सला हे नेटवर्क जॉईन करण्यासाठी भाग पाडणे हेच असेल.
तुम्हाला दुकानदाराने डुप्लीकेट चार्जर📲देऊन गंडवले तर...कदाचीत असे चार्जर खराब क्वॉलीटीचे📵 असल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. परंतू हे डुप्लीकेट चार्जर्स 📲ओळखणे सोप्पे आहे. थ्रेड👇
#Thread #म #मराठी 1/n
आजकाल अनेक मोबाईल कंपन्या मोबाईल सोबत चार्जर्स देत नाहीत. तसेच बऱ्याच वेळा आपला चार्जर खराब देखील होतो. अशावेळी चांगला चार्जर विकत घेणे मोठे कठिण होते. परंतू त्यावर उपाय सापडला आहे. चार्जर घेताना त्यावर तीन सिंबॉल प्रिंट केलेले असतात. ते नक्की पाहून घ्या.
#म #मराठी
2/n
डबल स्केअरचे जे सिंबॉल असते त्याचा अर्थ चार्जर इलेक्ट्रिक शॉक फ्री आहे. होमचा अर्थ असा आहे की हे चार्जर तुम्ही घरात वापरू शकता. याशिवाय ८ सारख्या सिंबॉलचा अर्थ आहे हे हाय क्वॉलीटी चार्जर असून यापासून चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो.
#म #मराठी 3/n
आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या कर्ज घेतल्याशिवाय शक्य होत नाहीत आणि म्हणूनच आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी कर्ज घेतो. मात्र या कर्जाचे मॅनेजमेंट व्यवस्थित केले नाही तर त्याचा डोंगर उभा राहतो.
#म #मराठी
त्यातून मार्ग काढणे कधीकधी अतिशय जिकिरीचे होऊ शकते. मग या कर्जाच्या डोलाऱ्याखाली अनेकदा कुटुंब देखील उध्वस्त होते. म्हणूनच आजच्या थ्रेडमधून आपण कर्जमुक्त होण्याचे सहा मार्ग पाहणार आहोत. #म #मराठी
पहिला मार्ग आहे तो म्हणजे डेट कन्सॉलिडेशन, म्हणजे तुमची जी कर्जे आहेत किंवा क्रेडिट कार्डवरचे बॅलन्स आहेत, ते तुम्ही एकाच कर्जात एकत्र करायचे. या एकाच कर्जाचा व्याजदर इतर कर्जांच्या व्याजदरापेक्षा कमी असेल. #म #मराठी
डिजिटल एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करणारी बायजूज ही भारतीय युनिकॉर्न कंपनी आता घराघरामध्ये पोहोचली आहे. अगदी शनिवार, रविवार तुम्ही घरच्यांसोबत शॉपिंग मॉलमध्ये गेलात तर तिथेही या कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुमचा पिच्छा सोडत नाहीत. #म #byjus
ऑनलाइन शिक्षण कसे महत्त्वाचे आहे आणि ऑनलाइन हेच कसे भविष्य आहे हे सगळ्यांना पटवून देत बायजूज ही कंपनी मोठी झाली. मात्र 2021 मध्ये या कंपनीने डिजिटल हेच भविष्य हा आपला मंत्र बाजूला ठेवत आयआयटी आणि मेडिकल प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देणारी #म #मराठी #byjus
आकाश एज्युकेशन सर्विसेस ही कंपनी विकत घेतली. नुसती विकतच घेतली नाही तर त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केला. किती? तर तब्बल एक बिलियन डॉलर. म्हणजे साधारण आठ हजार कोटी रुपये!! जगभरामध्ये शिक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेले हे सगळ्यात मोठे डील असेल. #म #byjus
थ्रेड👇
लॉकरमधून वस्तू चोरीला गेल्यास बँक भरपाई देते?
#मराठी #म #Banks
@MarathiRT @MarathiBrain @RtMarathi @Mazi_Marathi @HashMarathi तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या मौल्यवान वस्तू, सोनं वगैरे बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवता. यासाठी बॅंक तुमच्याकडून वार्षिक चार्जेसही घेते. परंतू जर त्या लॉकरमधील वस्तूंची चोरी झाली तर?.
@MarathiRT @MarathiBrain @RtMarathi @Mazi_Marathi @HashMarathi तुम्हाला यासाठी बॅंक कर्मचाऱ्याशी भांडण्याची गरज नाही. आरबीआयचा एक नियम तुम्हाला ग्राहक म्हणून इथे कामाला येतो.
एकच कंपनी अनेक स्टॉक एक्सचेंजेसवर लिस्टेड का असते?
थ्रेड👇
#म #मराठी #StockMarket #StockExchange
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi भारतात अनेक कंपन्या या बीएसई किंवा एनएसई अशा दोनही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट आहेत. इंफोसिससारखी कंपनी तर बीएसई एनएसई आणि अमेरिकेतील NASDAQ एक्सचेंजवरही लिस्ट आहे.
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi कंपनी जेव्हा स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते, तेव्हा तीला वन टाइम फी बरोबरच अन्युअल फीदेखील भरावी लागते. मग कंपन्या इतका खर्च करून कंपन्या वेगवेगळ्या एक्सचेंजेसवर का लिस्ट होतात. तर त्याला मुख्य तीन कारणं आहेत.
भारतात पहिली नोटबंदी कधी झाली होती?
थ्रेड👇
#म #मराठी #Money
भारतात १९५४ साली आरबीआयने ५ हजार व १० हजारांच्या नोटा छापल्या होत्या. पुढे या नोटा २४ वर्ष चालू राहिल्या. परंतू १९७८ साली या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.
थोडक्यात काय तर १९७८ पहिल्यांदा नोटबंदी करण्यात आली होती. तेव्हा ५ हजार व १० हजारांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात आल्या होत्या. बाकी इतर नोटा मात्र चलनात होत्या.