PaisaPani Profile picture
अर्थ विषयावरील सर्व अपडेट्स आपल्या मराठी भाषेत तुमच्यासाठी... 📲Whatsapp- https://t.co/G87QKpUJZs 📲Telegram- https://t.co/oO9DDgqffm 📲YouTube- https://t.co/dwgx70PxBb

May 12, 2023, 14 tweets

ओएनडीसी आहे तरी काय?
भारत सरकारने एप्रिल २०२२ मध्ये 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' लाँच केले ज्याला ओएनडीसी असेसुद्धा म्हटले जाते. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला एक पर्याय म्हणून भारत सरकारचा हा उपक्रम आहे. #म #मराठी #ONDC

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड या एका खाजगी नॉन प्रॉफिट कंपनीने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अंतर्गत ओएनडीसीची सुरुवात केली आहे. भारतामध्ये ई-कॉमर्सचे ओपन नेटवर्क डेव्हलप करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. #म #मराठी #ONDC

ओएनडीसी म्हणजे काय? हे थोडक्यात सांगायचं झालं तर ई-कॉमर्स क्षेत्रातील छोट्या आणि मोठ्या कंपन्यांचं हे नेटवर्क आहे. या नेटवर्कचा वापर करून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ई-कॉमर्स प्लेयर्सचे वर्चस्व काही प्रमाणात कमी करायचे असा यामागचा हेतू आहे.#म #मराठी #ONDC

किराणा माल, इतर ग्रॉसरी, फूड डिलिव्हरी, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल बुकिंग अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये जे स्थानिक ई-कॉमर्स प्लेयर्स आहेत त्यांना ओएनडीसी नेटवर्क खुले असेल. याशिवाय जर ॲमेझॉन फ्लिपकार्ट या मोठ्या प्लेयर्सने #म #मराठी #ONDC

ओएनडीसी इंटिग्रेट करून घेतले तर ॲमेझॉनवर एखादे प्रॉडक्ट तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला त्याच प्रॉडक्टसाठी फ्लिपकार्टचे रिझल्टसुद्धा ॲमेझॉनच्याच ॲप मध्ये दिसू शकतील.

ओएनडीसीचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे तो म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांची ई-कॉमर्स क्षेत्रातील #म #मराठी #ONDC

आणि एकूणच डिजिटल क्षेत्रातील जी मोनोपॉली आहे ती मोडून काढायची आणि स्मॉल मिडीयम एंटरप्रायजेस,  मायक्रो एंटरप्रायजेसला नवनवीन संधी उपलब्ध करून द्यायच्या.

सध्या ओएनडीसी पायलट म्हणून भारतातील पाच शहरांमध्ये चालवले जात आहे. #म #मराठी #ONDC

यामध्ये बेंगलोर, दिल्ली, कोइंबतूर, भोपाळ आणि शिलॉंग या शहरांचा समावेश आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत भारतातील 100 शहरांमध्ये ओएनडीसी सुरू होईल असे नियोजन आहे.

ओएनडीसी महत्त्वाचे का? ओएनडीसीमुळे मोठ्या प्लेयरची मोनोपॉली कमी करणे शक्य होईल.#म #मराठी #ONDC

याशिवाय जे छोटे मर्चंट आहेत त्यांचा रिच वाढवणे सोपे होईल. या मर्चंटला जास्तीत जास्त बायर्स उपलब्ध होतील. मोठे प्लेयर्स प्रायसिंग स्ट्रॅटेजी वापरून जो अवास्तव नफा कमवतात त्यावर काही प्रमाणात नियंत्रण येईल.#म #मराठी #ONDC

येणाऱ्या दोन वर्षांमध्ये ओएनडीसी भारतातील २५% कंझ्यूमर परचेससाठी वापरले जाईल असे त्यांचे लक्ष आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे ९० कोटी बायर्स रजिस्टर करतील यासाठी ते प्रयत्नशील असतील.#म #मराठी #ONDC

ओएनडीसी म्हणजे काय? हे त्यांच्याच कर्मचाऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक शॉपिंग मॉल आहे. मात्र नेहमीच्या शॉपिंग मॉलला जशी दोनच गेट असतात त्या ऐवजी या मॉलला १००० गेट आहेत. त्यामुळे हा मॉल ठराविक सेलर्स पुरता मर्यादित न राहता तिथे अधिकाधिक सेलर्सला आपले प्रॉडक्ट विकता येतील.

फ्लिपकार्टची मालकी असलेली लॉजिस्टिक कंपनी इ-कार्ट, रिलायन्स रिटेलची गुंतवणूक असलेली डन्झो यासारख्या कंपन्यांनी ओएनडीसी आपल्या प्लॅटफॉर्मवर इंटिग्रेट करून घेतले आहे. फोन पे देखील लवकरच ओएनडीसी नेटवर्क जॉईन करतील. #म #मराठी #ONDC

याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक यासारख्या बँका ओएनडीसीबरोबर चर्चेत आहेत. ओएनडीसीचा वापर करून कर्जवाटप, क्रेडिट कार्ड इश्यू करणे आणि इतर सर्विसेस बँका सहजरित्या देऊ शकतील.#म #मराठी #ONDC

ओएनडीसी समोरचे प्रमुख आव्हान याबाबत भारतामध्ये जास्तीत जास्त जनजागृती करणे जास्तीत जास्त सेलर्सला हे नेटवर्क जॉईन करण्यासाठी भाग पाडणे हेच असेल.

थ्रेड आवडल्यास नक्की रिट्विट करा.
#म #मराठी #ONDC

पैसापाणीसोबत जोडले जा-
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- openinapp.co/lkt3v
टेलीग्राम चॅनेल जॉईन करा- openinapp.co/v7le5
युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा- openinapp.co/a99mn

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling