Words Of DPM Profile picture
Jun 20 8 tweets 2 min read Twitter logo Read on Twitter
दर्शना पवार आणि पुण्यातली MPSC - UPSC करणारी पोरं- पोरी #Thread

खूप अभ्यासू असतात हो यांच्यातले अनेक जण. पाठीमागे कष्ट करणारे, अपेक्षा लावून बसलेले आईबाप गावाकडे सोडून आलेले, पेठेतल्या हॉस्टेल आणि फ्लॅट्स मध्ये ढेकणांशी झुंज देत रात्री झोपून, सकाळी लवकर उठून लायब्ररी गाठणारे!
अनेक वर्ष कळत नकळत वाया जातात अनेकांची आणि म्हणून यांची टिंगल उडते सगळीकडे पण किमान अर्धे तरी प्रचंड सिरियस असतात. पोस्ट काढण्याचं भूत डोक्यावर असताना मेसच्या जेवणात चव आहे का याचं सोयरसुतक नसतं यांना. महिन्याकाठी घरून मिळत असणारा पैसा पुरवत पुरवत अभ्यास चालू ठेवतात.
यांच्यातले काही, हल्ली तर अनेक जण, पुण्याच्या मोकळ्या हवेत झेड ब्रीज गाठतात. पण तरीही ही प्रेमप्रकरणं अभ्यासाला बगल देऊ शकत नाहीत. पुस्तकं, नोट्स आणि क्लासेस च्या भोवऱ्यात आकंठ बुडालेले हे लेकरं सणवार सुद्धा करत नाहीत.
साधी असतात हो ही पोरं. थोडफार राज्यशास्त्र गळी उतरलं की आपण चर्चा करण्यास पात्र आहोत यात आनंद मानणारी, MPSC-UPSC पासून तलाठी आणि SSC पर्यंत सर्व परिक्षांवर घारी सारखी नजर ठेवणारी ही पोरं. यांच्यातीलच एक होती ही दर्शना. पोस्ट काढली होती पोरीने, तेही रँक मध्ये येऊन.
आणि तिचा तो मित्र सुद्धा या यांच्यातलाच, जो आज तिच्याच खुनाचा संशयित आहे आणि अद्याप तरी फरार आहे.
यांच्यातलं कुणी इतका मोठा गुन्हा करू शकेल हे अद्याप तरी पचनी पडत नाहीये मात्र ज्याप्रमाणे घटना घडल्यात, राहुल हांडोरे ने दर्शना पवार ची हत्या केली याची शक्यता खूप जास्त आहे.
यामागे आणखी काही कारस्थान आहे का? कुणी यामागे मास्टरमाईंड आहे का? राहुल ने खून केला असेल तर कशामुळे एवढं पाऊल उचललं त्याने? तिचं यश त्याला पाहवलं नाही म्हणून इतकी टोकाची भूमिका त्याने घेतली असेल का? अनेक प्रश्न आहेत पण त्यांचं उत्तर वेळ आल्यावरच मिळेल.
एक मात्र नक्की, अधिकारी म्हणून निवड झालेल्या मुलीला सुद्धा जीव गमवावा लागल्याने आता अधिकारी बनू पाहणाऱ्या मुलींचे पालक अलर्ट होऊन सावधगिरी बाळगतील की मुलींच्या स्वप्नाचा चुराडा करून त्यांना MPSC करण्यावाचून परावृत्त करतील? या प्रकरणाचे खूप लाँग लास्टिंग परिणाम होतील हे नक्की!
@threadreaderapp please unroll

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Words Of DPM

Words Of DPM Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @dpm_of

Jun 20
Hinduism criticising and correcting itself through the ages:
1. Vedas established through Shrutis and Smritis in Gurukuls.
2. Knowledge in the Vedas was challenged from time to time and every new thesis born out of such criticism became an Upanishad
3. All the Vedas and Upanishads become too rigid and there came Mahakavyas (Ramayan and Mahabharat) to explain it in an entertaining, poetic way with the help of some REAL events and examples.
4. Meanwhile, Puranas develop in the same fashion.
5. Criticism and disagreements to the knowledge of Vedas keep on happening through the 6 Darshan Shastras over many centuries.
6. During the first millenium AD, many scientists discover ayurvedic, mathematical and astronomical wonders such as Charak and Aryabhatta.
Read 5 tweets
Jun 19
Decomposed dead body of an MPSC Topper named Darshana Pawar was found at the foothills of Rajgad fort near Pune on 18th June. She had recently qualified for the post of RFO securing third rank in MPSC. She hailed from Kopargaon Ahmednagar. Image
Pune has lakhs of MPSC aspirants & most of them have rural, humble backgrounds. It is so shocking even to hear cause all those guys are just as common as they can. How come something like this would happen to any of them?
Speaking of Darshana, She went missing on probably 9th June. We can boil it down to 12th June as per Lokmat's report. It is said that she had went on a Trek to Sinhagad and Rajgad on 9th June with her friend named Deepak.
Read 9 tweets
Sep 24, 2022
"देऊळ" Vs "देऊळ बंद"
खरं पाहता दोन्ही चित्रपटांचे आशय, खोली, दर्जा सगळंच वेगळं आहे पण देव-धर्माचा एक दुवा त्यात कॉमन आहे आणि आस्तिक-नास्तिक सगळेच लोक तिथे गल्लत करतात.
पहिलं तर क्लिअर करतो की चित्रपट म्हणून "देऊळ बंद" च्या तुलनेत "देऊळ" कैक पटीने श्रेष्ठ आहे.
पण मग "देऊळ बंद" हा बरेच नास्तिक म्हणतात अगदीच टुकार सिनेमा आहे का? तर असं अजिबात नाहीये. "देऊळ" चा विषय देवाचं बाजारीकरण आहे आणि त्यावर अत्यन्त समतोल साधत विषय हाताळलाय याचं विशेष कौतुक. "देऊळ बंद" ही एका पुराणकथेसारखी आहे ज्यात कथेपेक्षा बोध जास्त महत्वाचा आहे.
जिथे "देऊळ" सिनेमात कसलाही भपकेपणा न करता पद्धतशीर आणि तरीही अत्यन्त रंजकपणे कथा सांगितली जाते, "देऊळ बंद" मध्ये मात्र ऍक्शन सीन, गोळीबार, देवस्थान पर्यटन, भरपूर इमोशन्स, मेलोड्रामा असा ठासून मसाला भरलेला दिसतो. "देऊळ" च्या तुलनेत "देऊळ बंद" नेमका इथंच गंडतो.
Read 17 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(