Ajit Pawar Profile picture
संकल्प, निष्ठा, कर्म- हाच माझा धर्म! उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य | Commitment, Conviction, Service- My Vision | Deputy Chief Minister- Maharashtra
Mar 24, 2023 17 tweets 4 min read
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धमक्या आल्या. अंबानी हॉस्पिटलला धमकी आली. मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आली. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धमक्या आल्या आहेत. धमक्या देणाऱ्यांना जरब बसेल, अशी कारवाई सरकारकडून झाली पाहिजे आणि हे सत्र थांबलं पाहिजे. कोकणातल्या रिफायनरीच्या विरोधात लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. याचा तपास झाला पाहिजे आणि केवळ हल्लेखोर आंबेरकर नाही तर त्याच्या पाठीमागचा मास्टरमाईंड सापडला पाहिजे. कठोर शिक्षा झाली पाहिजे.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
Mar 24, 2023 25 tweets 7 min read
नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्यानं तरुण बेरोजगार आहे, महागाईनं सामान्य जनता त्रस्त आहे.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३

bit.ly/3JHJrVp राज्यातल्या महिला,मुली सुरक्षित नाही,दिवसाढवळ्या तलवारी,कोयते नाचवले जात आहेत,गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसं मारली जात आहेत,राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे,ही राज्याची स्थिती आहे.सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली जाताहेत.
Mar 23, 2023 18 tweets 6 min read
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी पुणे हे राज्याचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,औरंगाबाद,नागपूर या शहरांचा समतोल विकास होण्याची गरज आहे.गेल्या काही दिवसात राज्यातील पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांची कामं रखडली आहेत.

bit.ly/42BWyju पुण्यात सुरु झालेली मेट्रो नागरिकांसाठी काही कामाची नाही. पुणे मेट्रोचा उपयोग शाळकरी मुलांच्या सहलीसाठी, वाढदिवस साजरे करण्यासाठी, जादूचे प्रयोग करण्यासाठी होत असून पुणे मेट्रोसह रिंग रोडच्या कामाला गती द्यावी.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
Mar 23, 2023 6 tweets 2 min read
राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे विधानसभेत आज प्रश्न क्रमांक दोन राखून ठेवण्याची नामुष्की आली आहे. या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहाच्या प्रथा, परंपरा पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ मंत्र्यांच्या अनुपस्थितीनं प्रश्न राखून ठेवण्याचं समर्थन करता येणार नाही. विधिमंडळाच्या इतिहासात मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न राखून ठेवल्याचं यापूर्वी एकही उदाहरण नाही.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
Jul 9, 2020 8 tweets 2 min read
‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली आज, मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. यावेळी सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राहील आणि संस्थेला तातडीनं ८ कोटींचा निधी दिला जाईल, असं जाहीर केलं. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद होणार नाही. समाजबांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन २०२०-३०’ हा दहा वर्षांचा आराखडा तयार केला जाईल.
Jul 7, 2020 5 tweets 1 min read
In order to strengthen law & order in the State & ease workload of the police force, decision to recruit 10,000 youths in the police shipai category has been taken today at Mantralaya. This will benefit the urban & rural youth, giving them a chance to serve in the police force. ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल,याचा विचार करून सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीनं मांडण्याचे निर्देश दिले. मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल.
May 29, 2020 6 tweets 1 min read
विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्यं बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याचा कोरोनानं दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल. यासंबंधीचा शासन निर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये रुग्णांचं सर्व्हेक्षण,शोध,माग काढणं,प्रतिबंधात्मक उपाययोजना,चाचणी,उपचार,मदतकार्य अशा अनेक जबाबदाऱ्या जोखीम पत्करून कर्मचारी आपलं कर्तव्यं बजावतायेत.या कर्मचाऱ्यांची सुरक्षा,त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय.