DigiThane is one of Thane Municipal Corporation's Official handles for the dissemination of genuine information on City, Emergencies & Govt Updates
Aug 10, 2021 • 7 tweets • 3 min read
अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरीच लसीकरण
नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन
यासाठी नागरिकांनी forms.gle/E3n36oj81pMniV… या लिंकवर जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अशा रुग्णांना घरी जाऊन लस देण्यात येणार आहे.
दीर्घ आजारपणामुळे तसेच शारीरिक अपंगत्वामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन लसीकरण करण्याची विशेष मोहीम ठाणे महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली असून नागरिकांनी या लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे.
Mar 24, 2021 • 8 tweets • 2 min read
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'होळी उत्सव' साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन
महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा 'होळी उत्सव' यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अत्यंत साधा पद्धतीने साजरा करून राज्य शासनाने
दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.
Jun 5, 2020 • 4 tweets • 1 min read
🚱शनिवारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद
टेमघर जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळ्यापूर्वी सबस्टेशनमधील कामे करणे, ट्रान्सफार्मरचे ऑईल फिल्टेशन करणे,मुख्य जलवाहिनीवर असलेली क्रॉस कनेक्शनवर होत असलेली गळती थांबविणे (1/4) @TMCaTweetAway
तसेच टेमघर जलशुध्दीकरण केंद्रात मुख्य जलवाहिनीवर असलेल्या झिरोवेलासिटी वॉलमधून होणारी गळती थांबविणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. ही कामे करण्यासाठी शनि. दि. 06/06/2020 रोजी सका. 9.00 ते रवि. दि. 07/06/2020 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे (2/4)
May 27, 2020 • 4 tweets • 2 min read
#WaterCut
शुक्रवारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद
@TMCaTweetAway च्या पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळ्यापूर्वी सबस्टेशनमधील कामे करण्याकरिता #शुक्रवार दिनांक 29/05/2020 रोजी सकाळी 9 ते रात्रौ 9.00 वाजेपर्यत 12 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. #Thane#Update
परिणामी घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, जॉन्सन, इटरनिटी, समतानगर ऋतूपार्क, सिध्देश्वर जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर, कळव्याचा काही भाग इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहिल.