Digvijay Vibhute Profile picture
Being Indian | जात भारतीय | अस्तित्व भारतीय
Mar 7, 2021 17 tweets 4 min read
#पार्टनर

(तो बेडवरून उठला आणि कपडे घालु लागला. ती तशीच पडुन होती.
तो तिच्याकडे पहात स्मितहास्य करत आहे.)
तो : उठ, आवर, जायचय आपल्याला..
ती : हममम
(ती तशीच पडुन आहे.)
ती : ऐक ना.. थॅन्क्स
तो : कशासाठी?
ती : मला जेव्हा गरज वाटते तेव्हा तु नेहमी माझी गरज पुर्ण करतोस म्हणून 👇 (तो फक्त स्माईल देतो)
तो : मला असं वाटत की आपण लग्न करावं
ती : वेडा आहेस का?
तो : कदाचित
ती : नको असा विचार करू.. तुला मी बेस्ट फ्रेंड मानते
तो : तु पण माझी बेस्ट फ्रेंड आहेस. पण त्या पलिकडे जाऊन मला तुझ्याबद्दल प्रेम वाटते..
👇
Feb 16, 2021 14 tweets 3 min read
राजर्षी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे पराकोटीचे शत्रुत्व जगजाहीर होते मात्र दोघेही एकमेकांचे मोठेपण जाणून होते. त्यामुळे एकमेकांवर प्रखर टीका करताना दोघांनीही कधीच मर्यादा ओलांडली नाही. ना शाहू महाराज टिळकांना कधी 'समाजद्रोही' म्हणाले, 👇 ना लोकमान्य कधी शाहू महाराजांना 'स्वराज्यद्रोही' म्हणाले. परंतु ही नैतिक मर्यादा टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांना पाळता आली नाही. केळकर, खापर्डे, भोपटकर इत्यादी टिळक अनुयायींनी शाहू महाराजांविरुद्धची विखारी चळवळ कायम धगधगती ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न केले. 👇
Feb 15, 2021 6 tweets 1 min read
आपल्याच देशबांधवांना स्वातंत्र्याचे हक्क नाकारणाऱ्या, पण इंग्रजांकडे स्वातंत्र्याचे हक्क मागणाऱ्या लोकांविषयी

१. स्वामी विवेकानंद म्हणाले होते -

"भारताचा उद्धार करावयास हवा. गरिबांना पोटभर अन्न द्यावयास हवे. शिक्षणाचा प्रसार करायला हवा; आणि पुरोहितगिरी नष्ट करायला हवी. 👇 पुरोहितांचा जुलूम नको. सामाजिक अत्याचार नको..

इंग्रजांकडून अधिक सत्ता मिळावी म्हणून आपल्यातील काही खुळे तरुण सभा भरवतात. त्यांचे हे प्रयत्न पाहून इंग्रज लोक नुसते हसतात. ज्याला इतरांना स्वातंत्र्य देण्याची इच्छा नसते तो स्वतःच स्वातंत्र्याला लायक नसतो..! 👇
Jan 31, 2021 14 tweets 3 min read
शाहू महाराज ब्राम्हणद्वेष्टे होते का?

उत्तर : अजिबात नाही. जातिभेदाविरुद्ध लढणारा व्यक्ती एखाद्या जातीचा द्वेष करू शकेल काय? नक्कीच नाही.

मग ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर असा संघर्ष का उभा राहिला?

शाहू महाराजांना समाजातील विषमता संपायची होती, 👇 जातीभेद संपवून मागासलेल्या जातींना त्यांचे सामाजिक हक्क मिळवून द्यायचे होते. ब्रिटिशांच्या काळात सर्व प्रशासनयंत्रणा ब्राम्हण समाजाच्या हातात होती कारण सरकारी नोकरी शिकलेल्याला मिळे आणि शिक्षण ही फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. शाहू महाराजांकडे राजसत्ता होती आणि 👇
Jan 27, 2021 12 tweets 4 min read
भारताला शेतकरी आंदोलनाचा फार मोठा इतिहास आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी साहजानंद सरस्वती, प्रोफ. एन जी रंगा, सर छोटूराम, चौधरी चरणसिंग, महेंद्रसिंग टिकैत अशा अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे. 👇 इंग्रजांपासून ते तत्कालीन काँग्रेस सरकारपर्यंत जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलने झाले तेव्हा सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले, पण कधी आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी अतिरेकी, लाल बावटे, देशद्रोही, विरोधी पक्षाने प्रेरित ठरवण्याचा प्रयत्न झाला नाही.
१९८७ साली केंद्रात काँग्रेसचे/राजीव गांधी 👇
Jan 23, 2021 19 tweets 5 min read
खरंतर १८९६ सालीच शाहू महाराजांनी कोल्हापुरात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम कॉलेजला जोडून एक वसतिगृह स्थापन केले होते. यात सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश होता. या वसतिगृहाचे व्यवस्थापन ब्राम्हण मंडळींकडे होते. शिक्षण ही आपलीच मक्तेदारी आहे 👇 अशी मानसिकता या मंडळींची होती त्यामुळे ब्राह्मणेतर मुलांची संख्या हळूहळू कमी झाली, कालांतराने ते वसतिगृह फक्त ब्राह्मणांचेच बनले. शाहू महाराजांच्या डोक्यात शिक्षण क्षेत्रातील ही मक्तेदारी नाहीशी करण्याबाबत चक्रे फिरत होती. याला वेग आला तो पी.सी.पाटलांमुळे (थोर कृषीतज्ञ).👇
Jan 20, 2021 11 tweets 4 min read
मासिक पाळीच्या दिवसांत स्त्री खरंच अपवित्र किंवा अशुद्ध असते का?
उत्तर : अजिबात नाही. मासिक पाळीचे चक्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालूच असते, त्यामुळे रक्तस्राव होण्याच्या ४ दिवसांपुरती स्त्री अपवित्र आणि इतर दिवशी पवित्र असं असूच शकत नाही.👇 ज्याप्रमाणे आपण अन्न खातो, ते पचवतो त्यातून ऊर्जा तयार होते आणि नको असलेल्या गोष्टी आपले शरीर बाहेर फेकते, हे जसे एक चक्र आहे तसेच मासिक पाळी हे देखील एक चक्र आहे. साधारण २८ ते ३२ दिवसांचे हे चक्र असते, ज्यामध्ये स्त्रीबीज तयार होऊन त्याची वाढ होते. 👇
Jan 16, 2021 20 tweets 5 min read
#राजर्षी_विरुद्ध_लोकमान्य
#शत्रुत्व_आणि_ममत्व
गेल्या शतकातील पहिल्या दोन दशकात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांचा उदय झाला. शाहू महाराजांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा मानवमुक्ती करणारे स्वातंत्र्य आणि 👇 सामाजिक सुधारणा जास्त महत्वाच्या वाटत होत्या तर लोकमान्य टिळकांना राजकीय स्वातंत्र्य अधिक गरजेचे वाटत होते. ही दोन्ही स्वातंत्र्ये एकमेकांस पूरक आहेत याची जाणीव या दोन्ही महापुरुषांना होती तरीही एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याऐवजी एकमेकांशी दोन हात करण्याची परिस्थिती 👇
Jan 13, 2021 9 tweets 3 min read
दहावीला जरा बरे मार्क पडले म्हणून विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. काॅलेजच्या पहिल्याच दिवशी केसांत गुलाबाचं फुल माळून तु आली होतीस. तुझ्या देखण्या रूपाला गुलाबाच्या फुलाने साज चढवला होता. साध्या पंजाबी ड्रेस मध्ये तु खूपच भारी दिसायचीस. मी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो. 👇 वर्गात मी चौथ्या बेंचवर बसायचो आणि तिथून मुलींच्या ओळीत पहिल्या बेंचवर बसलेल्या तुला सारखं सारखं बघायचो. जगताप सरांनी तर खूप वेळा मला तुझ्याकडे बघत बसलेलो असताना पकडलंय. तु नेहमी केसांत गुलाबाचं फुल माळायचीस त्यावरून मी ओळखून गेलो की तुला गुलाबाचं फुल आवडतं. 👇
Jan 9, 2021 20 tweets 5 min read
'क्षत्रीय कुलावतंस हिंदुपदपातशहा' अशी बिरुदावली असणाऱ्या छत्रपतींना एका भटजीने 'शूद्र' म्हणून हिणवले. इथेच वेदोक्ताची ठिणगी पडली आणि छत्रपती शाहू महाराज सामाजिक बंडखोरीस उद्युक्त झाले. १८९९ मध्ये कोल्हापुरात हे प्रकरण सुरु झाले, नंतर एक-दोन वर्षात याचा भडका उडाला आणि 👇 यातून तीव्र सामाजिक संघर्ष उभा राहिला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि शाहू महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक म्हणून जनतेसमोर आले.

हे प्रकरण समजून घेताना आपण आधी वेदोक्ताची पार्श्वभूमी समजून घेऊया.

वेदोक्त म्हणजे काय?
वेदोक्त म्हणजे वेदांत सांगितल्याप्रमाणे.👇
Jan 6, 2021 9 tweets 3 min read
#नोकरी करण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारे का होऊ नये? कोणताही व्यवसाय मनापासून, प्रामाणिकपणे आणि चिकाटीने केला तर तो नक्कीच चांगला बहरतो, अनेकांच्या हाताला काम मिळवून देतो, शेकडो मध्ये सुरु झालेला प्रवास लाखो-करोडोंच्या उलाढाली करून दाखवतो. आजच्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात👇 Image स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरु करून त्याला मेहनीतीची जोड दिल्यास नक्कीच रसाळ फळे खायला मिळतील यात शंका नाही. बारामती तालुक्यातील एका लहानश्या खेड्यातील #सचिन_घाडगे यांनी ७ रुपये रोजंदारीवर सुरु केलेला प्रवास आता वार्षिक ९ कोटीच्या उलाढालीवर आणलाय.👇
Jan 2, 2021 12 tweets 3 min read
ज्या काळात मराठ्यांच्या राज्यातील प्रशासनात मराठ्यांनाच काही अधिकार नव्हते, क्षत्रियांची गणती सुद्धा शुद्रांमध्येच केली जात होती त्या काळात शाहू महाराजांनी मराठ्यांना आणि बहुजन समाजाला प्रशासनात जागा दिली, क्षत्रियांना वेदोक्ताचे अधिकार मिळवून दिले आणि ब्राम्हण, युरोपीय आणि 👇 पारशी लोकांच्या मक्तेदारीला सुरुंग लावला. स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ घेतला तर मला इथे शाहू महाराज #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.

छत्रपती घराण्याचे ऐतिहासिक महत्व बघता मराठा संस्थानांमध्ये कोल्हापूरचे संस्थान अव्वल दर्जाचे असायला हवे होते, 👇
Dec 12, 2020 12 tweets 4 min read
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार यामध्ये मी शाहू महाराजांवर लिहायला सुरवात करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे शाहू महाराज हे शिवछत्रपतींचे वारसदार असून सुद्धा त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला नव्हता, स्वातंत्र्य चळवळीला उघड पाठिंबा दिला नव्हता, बंडखोरी केली नव्हती 👇 तरी ते #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार कसे काय? पहिलं म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ फक्त ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता एवढाच होत नाही. कोणत्याही बंधनातून मुक्तता किंवा अन्यायकारक परिस्थितीतून सुटका असा स्वातंत्र्याचा अर्थ मी घेतो. आणि शाहू महाराजांनी अनेक स्वातंत्र्ये मिळवून दिली 👇
Dec 9, 2020 9 tweets 3 min read
#मूल्यशिक्षण : काळाची गरज
समाजात वावरताना आपण अनेक घटना पाहतो, ऐकतो. अल्पवयीन मुलांकडून चोरी, मारामाऱ्या, खून, बलात्कार असले गंभीर गुन्हे होत आहेत. आजकालची तरुण पिढी अल्पवयातच वाईट व्यसनांच्या आहारी चालली आहे. सामाजिक स्तरावर वाढत चाललेली ही विकृती, 👇 अनैतिकता हा एक प्रकारचा मोठा सामाजिक भूकंप आहे, जो समाजाचे आणि नीतिमूल्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. याची भयानकता किंवा दुष्परिणाम कमी करायचे असतील तर 'शालेय स्तरावरील प्रभावी मूल्यशिक्षण' हाच मोठा उपाय असू शकतो. तंत्रज्ञानाच्या युगामुळे बऱ्याच गोष्टी 👇
Nov 24, 2020 9 tweets 7 min read
#महात्मा_जोतीराव_फुले
भाग १
"महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या संदर्भात ज्या काही चळवळी झाल्या आणि ज्यांच्या पुढाकाराने झाल्या त्यामध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल व त्यांना मानाचा मुजरा करावा लागेल." प्रसिद्ध शिक्षणतज्ञ विठ्ठलराव घाटे👇 यांचे हे वाक्य खूप काही सांगून जाते. त्या काळात संपूर्ण समाज वर्णव्यवस्थेच्या कुलंगड्यात अडकून पडलेला होता, सनातन्यांच्या कर्मकांडाला ऊत आला होता आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हळूहळू पाय पसरायला सुरवात केलेली होती. त्याच काळात बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ चालीरीती, रूढी,👇
Jul 15, 2020 12 tweets 7 min read
#बेरोजगार आहात? स्वतःचा #व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात? व्यवसाय काय करावा हे सुचत नाहीये? नवीन कल्पना शोधत आहात? मग हे नक्की वाचा :

व्यवसाय म्हणजे मोठी रिस्क, व्यवसाय म्हणजे २४X७ ची नोकरी हे आपण ऐकलेच असेल.
👇 खूप सारे नवीन व्यवसाय, नवीन #स्टार्टअप्स चालू झालेले आपण पाहिले असतील. ७०% नवीन व्यवसाय एका वर्षात बंद पडतात हेही ऐकलं असेल. नवीन व्यवसाय उभारताना रिस्क कमी करण्यासाठी, चांगली कल्पना शोधण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी या काही टिप्स -
👇
Jul 14, 2020 5 tweets 2 min read
#अधिक_मास का येतो?

पृथ्वीचा सूर्याभोवती परिभ्रमणाचा काळ ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद एवढा आहे. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे बारा महिने पूर्ण होतात. (इंग्रजी कॅलेंडर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यावर आधारित आहे.)
👇 भारतीय पंचांग चंद्रमास प्रमाणे चालते. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ चांद्र मास मात्र ३५४ दिवसांत पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमावस्येला संपणारे असतात. (इतर राज्यांत पौर्णिमेला)
👇
Jul 13, 2020 6 tweets 2 min read
फेब्रुवारी महिन्यात फक्त २८ दिवसच का? चार वर्षातून एकदा येणारा लीप डे फेब्रुवारी मध्येच का येतो? समजून घेण्यासाठी हे नक्की वाचा -

पूर्वी एक वर्ष हे ३०६ दिवसांचे आहे असे मानले जायचे. त्याप्रमाणे पूर्वी एका वर्षात फक्त १० महिने होते.
👇 वर्षाचा पहिला महिना मार्च असायचा. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे १० महिने पूर्वी मोजले जायचे. नंतर लक्षात आले की एक वर्ष हे ३०६ दिवसांचे नसून ३६५ दिवसांचे आहे.
👇
Jul 9, 2020 7 tweets 3 min read
#गोबेल्सनीती

लोकांचा नाझी पक्षाला पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी रोड शोज आणि मोठे इव्हेंट आयोजित केले जायचे. त्या वेळी नेत्यांची भाषणं व्हायची. देशात सर्वकाही कसं चांगलं आहे (सब चंगा सी), अशा प्रकारच्या भाषणांची उजळणी या ठिकाणी केली जायची.
👇 हिटलरच्या वाढदिवशीदेखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे. 1936 मध्ये ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं होतं. जर्मन सरकार कसं यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती.
👇
Jul 8, 2020 6 tweets 2 min read
#गोबेल्सनीती

1934 साली हिटलर सत्तेत आल्यानंतर जोसेफ गोबेल्सला Ministry of Enlightenment and Propagandaचा कारभार देण्यात आला. प्रचार हा अदृश्य आणि सर्वत्र असावा, असं त्याला वाटायचं. त्यामुळे माध्यमं, साहित्य, कला यांच्यावर कठोर निर्बंध लादली जायची.
👇 हलके फुलके मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा नाझी विचारांचा प्रचार करणारं साहित्य, चित्रपटांना परवानगी दिली जायी. आर्यन वंश हा सर्वांत शुद्ध आहे आणि ज्यू हे राष्ट्रद्रोही आहेत, या संदेशाचा मारा जर्मन लोकांवर केला जायचा. ज्यू पत्रकारांवर बंदी घालण्यात आली होती.
👇
Jul 7, 2020 5 tweets 2 min read
#गोबेल्सनीती

'सामान्य माणूस विचारवंत नसतो'

1934 मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी जर्मनीमध्ये सर्वत्र रंगबेरंगी पोस्टर्स लावले जायचे. सर्व राजकीय पक्ष आपले पोस्टर्स रंगीत बनवून त्यावर खूप साऱ्या घोषणा आणि पक्षाचे विचार लिहीत.
👇 याच निवडणुकीत नाझी पक्षाने मात्र काळ्या पार्श्वभूमीवर हिटलरचा चेहरा आणि नाव असलेलं पोस्टर प्रसिद्ध केलं. त्या पोस्टरवर पक्षाचं नाव किंवा कोणतीही घोषणा नव्हती. हे पोस्टर आपल्या स्पष्ट आणि ठळक दिसण्यामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलं.
👇