Discover and read the best of Twitter Threads about #गोबेल्सनीती

Most recents (4)

#गोबेल्सनीती

लोकांचा नाझी पक्षाला पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी रोड शोज आणि मोठे इव्हेंट आयोजित केले जायचे. त्या वेळी नेत्यांची भाषणं व्हायची. देशात सर्वकाही कसं चांगलं आहे (सब चंगा सी), अशा प्रकारच्या भाषणांची उजळणी या ठिकाणी केली जायची.
👇
हिटलरच्या वाढदिवशीदेखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे. 1936 मध्ये ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं होतं. जर्मन सरकार कसं यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती.
👇
त्याने तिचा पुरेपूर वापर केला आणि आर्यन वंश कसा शक्तिशाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला. कला आणि कलाकार दोन्हीवर सरकारचं नियंत्रण हवं, असं या प्रचार मंत्रालयाला वाटायचं.
👇
Read 7 tweets
#गोबेल्सनीती

1934 साली हिटलर सत्तेत आल्यानंतर जोसेफ गोबेल्सला Ministry of Enlightenment and Propagandaचा कारभार देण्यात आला. प्रचार हा अदृश्य आणि सर्वत्र असावा, असं त्याला वाटायचं. त्यामुळे माध्यमं, साहित्य, कला यांच्यावर कठोर निर्बंध लादली जायची.
👇
हलके फुलके मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा नाझी विचारांचा प्रचार करणारं साहित्य, चित्रपटांना परवानगी दिली जायी. आर्यन वंश हा सर्वांत शुद्ध आहे आणि ज्यू हे राष्ट्रद्रोही आहेत, या संदेशाचा मारा जर्मन लोकांवर केला जायचा. ज्यू पत्रकारांवर बंदी घालण्यात आली होती.
👇
प्रत्येक बातमीला नाझी अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावरच ती छापली जायची. 1939 पर्यंत जर्मनीत असलेल्या वर्तमानपत्रांपैकी 69 टक्के वर्तमानपत्रं ही नाझींच्याच मालकीची होती. त्याच सुमारास जर्मनीत रेडिओ लोकप्रिय होऊ लागला.
👇
Read 6 tweets
#गोबेल्सनीती

'सामान्य माणूस विचारवंत नसतो'

1934 मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी जर्मनीमध्ये सर्वत्र रंगबेरंगी पोस्टर्स लावले जायचे. सर्व राजकीय पक्ष आपले पोस्टर्स रंगीत बनवून त्यावर खूप साऱ्या घोषणा आणि पक्षाचे विचार लिहीत.
👇
याच निवडणुकीत नाझी पक्षाने मात्र काळ्या पार्श्वभूमीवर हिटलरचा चेहरा आणि नाव असलेलं पोस्टर प्रसिद्ध केलं. त्या पोस्टरवर पक्षाचं नाव किंवा कोणतीही घोषणा नव्हती. हे पोस्टर आपल्या स्पष्ट आणि ठळक दिसण्यामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलं.
👇
'सामान्य माणूस हा विश्लेषक किंवा विचारवंत नसतो म्हणून त्याच्यापर्यंत अगदी मोजक्या शब्दात आपला संदेश पोहोचला पाहिजे,' हा हिटलरचा विचार ध्यानात घेऊनच प्रचार विभागाने हे पोस्टर बनवलं होतं.
👇
Read 5 tweets
#गोबेल्सनीती

जोसेफ गोबेल्स याच्या आत्महत्येला साधारण ७५ वर्षे लोटली आहेत. तरीही 'गोबेल्सनीती' हा शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतो. एखादा राजकीय नेता भूलथापा देत असेल तर तो गोबेल्सचे प्रचारतंत्र वापरतोय असं विरोधक म्हणतात. कोण होता जोसेफ गोबेल्स?
👇
"एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते. एखाद्या गोष्टीचा प्रचार करताना ती गोष्ट सोपी आणि काही ठळक मुद्दे असायला हवेत. आणि ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी." अॅडॉल्फ हिटलरचं हे प्रचाराचं सूत्र प्रत्यक्षात उतरवणारा सूत्रधार होता जोसेफ गोबेल्स.
👇
गोबेल्सची ओळख हिटलरचा एक विश्वासू सहकारी, एका प्रचारतंत्राचा जनक, नाझी पक्षाचा प्रचारक, संपादक, प्रचारमंत्री, युद्धमंत्री आणि शरणागती जाहीर करणारा जर्मनीचा एका दिवसाचा चान्सलर अशी आहे. 'गोबेल्सनीती'मुळेच हिटलर सत्तेवर आला आणि सत्ता टिकवू शकला.
👇
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!