Dr Vidya Deshmukh Profile picture
Doctor ( Ayu).secular. Love science.
Mar 4, 2023 14 tweets 4 min read
हे खरय की Y chromosome हा shrink होतोय ..!!

म्हणजे अस की, Y गुणसूत्रावर सध्या 27 - 30 gene आहेत जे महत्वाचे प्रोटीन बनवतात.

याउलट x गुणसूत्रावर मात्र 800 gene आहेत जे शरीरातील इतर biological activity मधे उपयोगी आहेत.

यावरून अंदाज येतो की Y गुणसूत्र किती छोटे आहे. y गुणसूत्र इतकच छोटं आहे ? की आता ते छोटं होतय ?

Australia's plateaus जो आपल्या evolution साखळीत येतो त्यांच्या अभ्यासावरून नवीन संशोधन असं सांगतात की ,पूर्वी म्हणजे 166 million वर्षापूर्वी x व y दोघांची लांबी सारखीच होती. पण त्यानंतर तो सतत सातत्याने छोटा होत चाललाय
Oct 19, 2022 19 tweets 5 min read
The fabric of the Cosmos
Brian Greene

लेखकाविषयी:-American theoretical physicist, mathematician, and string theorist.

पुस्तकात जे काही लिहिलंय त्या अंगानं वाचकाशी हे हितगुज आहे.

आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनादी काळापासून चालू आहे. गेल्या२-३ शतकात त्याविषयी बरंच संशोधन सुरू आहे.

Space व timeम्हणजे काय ?

ते कधी अस्तित्वात आले ?

आपण स्पेस टाईम शिवाय राहू शकू का?

या विश्वाच्या मर्यादा काय आहेत?

टाईम ट्रॅव्हलने आपल्याला भूतकाळात किंवा भविष्यात जाणं शक्य आहे का?
Mar 10, 2022 20 tweets 5 min read
मानव निसर्गावर विजय मिळवू पाहतोय .

निसर्गतः मिळालेल्या शक्तीचा वापर करून तो चमत्कार घडवतोय. खरा चमत्कार तर हाच की निसर्गच कसा बनला हे शोधणे त्याचा genome शोधणे व त्यात बदल करणे

त्याला त्याचं नशीब स्वतःच्या हाताने लिहायचय. पुस्तक :A Crack in creation
लेखक :Jennifer Doudna
Samuel Sterberg

2020साली Jennifer Doudna व
Emmanuelle Charpentier यांना केमिस्ट्री मधील नोबेल मिळालं.
आपलाgenomबदलण्यासाठीCRISPR टेक्नॉलॉजीचाprogram toolkitम्हणून वापर करता येईल व तो कसा यासंदर्भात त्यांनी संशोधन केल
Dec 11, 2021 14 tweets 4 min read
कोरोनाव्हायरस ने 2020-2021 मध्ये जगभरात धुमाकूळ घातला. आता त्याचा नवीन varient आला आहे...
#Omicron
त्यानिमित्ताने म्युटेशन संदर्भात काही गोष्टी समजून घेऊ. व्हायरस मधील म्युटेशन म्हणजे काय ?
Coronavirus genome मधे 30,000 nucleotide आहेत.
ह्याचे ४structural protein आहेत.
•Neucliocapsid protein N
•membrane protein M
•spike protein S
•envelope protein E
यातNeuliocapsid म्हणजे protein shell.
Sep 25, 2021 7 tweets 2 min read
सिव्हील सर्व्हिसच्याअद्भुत दुनियेचं तरुण वयात सर्वांना आकर्षण असतं.
विशेषतः कष्टावर विश्वास असणाऱ्याचं....

मानमरातब,पैसा,यश,सत्ता सारं कसं शाश्वत.
असाच काहीसा विषय आहे
डार्क हॉर्स..एक अकथित कहाणी

'साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त साहित्यकृती' लेखक-नीलोत्पल मृणाल
अनुवाद-डॉक्टर सतीश श्रीवास्तव

ही केवळ एका युवकाची कहाणी नसून वास्तवात अगणित स्वप्नांची अकथीत सत्यकथा आहे.

IAS / IPSहोणाऱ्या होणाऱ्या लक्षावधी विद्यार्थ्यांच्या यथार्थ संघर्षाची ही कहाणी आहे जे दिल्लीतील मुखर्जी नगरात भारतातून विशेषतः
Aug 23, 2021 14 tweets 4 min read
Book name - God delusion
writer - Richard Dawkins

हे British evolutionary biologist आहेत.
ते कट्टर निधर्मवादी आहेत.
ह्या पुस्तकाच्या 3 millions copies जगभरात विकल्या गेल्या आहेत.

आपण जेव्हा डोळे उघडून जगाकडे पाहत होतो तेव्हा विविध प्राणी, झाडं,फुल,आकाश,निसर्ग हेच दिसतं. हे मानवानं नाही बनवलं तर याला कोणी तरी बनवलं असेल व ज्यांना बनवले तो मानवापेक्षा जास्त शक्तिशाली असणार ...
या संभावनेतून देव आणि धर्म या कल्पनेची निर्मिती झाली.
ईश्वराने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवले नाही तर आपणच ईश्वराला आपलं स्वरूप दिलं.
Jul 20, 2021 7 tweets 2 min read
लहानपणी जोकोविचचे आई बाबा रिसॉर्टवर काम करायचे. टेनिस महागडा खेळ असल्याने त्यांना कोर्टची फी परवडण शक्यच नव्हतं. तेंव्हा लहानसा नोवाक तिथं वेटरचं काम करून टीपच्या बदल्यात तिथे आलेल्या पर्यटकांकडून रिसॉर्टवर दोन तास टेनिस खेळायचा सौदा करायचा. आज जगजेत्ता बनलेल्या जोकोविचने स्वतः कडे पैसे येताच सर्बिया मध्ये मोफत ३० टेनिस कोर्ट्सचं संकुल उभारलं आहे, जिथे कुणालाही पैसे न देता खेळता येतं!

एकदाच नाही,सहावेळा जिंकलंय त्यानं विम्बल्डन.

३४ हे वय जिथं म्हातारं मानलं जातं, त्या टेनिसच्या मैदानावर झोकोविच आजही अजिंक्य ठरला.
Jul 2, 2021 14 tweets 3 min read
ज्ञानेश्वर म्हणजे वात्सल्याचा, करुणेचा सागर..

भगवद्गीतेतील तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी उपमा व दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले.

गीतेचे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानोबांनी केले. कशाचीही अपेक्षा न करता हा ज्ञानरूपी यज्ञ सिद्धीस नेला. त्यासाठी तप केले.
या तपश्चर्येतून हा वाक् यज्ञ सफल झाला व त्यातून 'ज्ञानेश्वरी'नावाचे अमृत निघाले.

ज्ञानेश्वर माऊलीनी भावार्थ दिपीकेच्या १८ व्याअध्यायाच्या शेवटी 'पसायदान'च्या ९ओव्या लिहल्या.
Jun 23, 2021 7 tweets 3 min read
स्वप्न खरचं पुर्ण होतात,
शिक्षणाची पाटी फुटली म्हणून काय झाल….. तुम्ही वाचत रहा.
पुस्तक स्वप्नही दाखवतात आणि
ती पुर्णही करतात.

ह्या advertise मधे दाखवलय तस खरच शक्य आहे का ?

.
.
. Michael Faraday.....

अफलातून सायंटिस्ट.

Albert Einstein kept a picture of Faraday on his study wall, alongside pictures of Arthur Schopenhauer and James Clerk Maxwell.
May 29, 2021 11 tweets 4 min read
कोणती vaccine घ्यावी अशा शंका खूप जणांना आहे?
येथे अतिशय सुंदर अशा slide आहेत.ज्यामध्ये सर्व vaccine ची तुलना दिली आहे. ज्यामुळे सर्व लस cellular level कशा काम करतात व त्याचे काय फायदे आहेत ते सहज समजेल.
त्यातील जे पर्याय उपलब्ध होतील, त्यातून हवी ती लस निवडण्यास मदत होईल. अमेरिकेतील फायझर कंपनीचं vaccine-
ह्या मध्ये corona virus चा mRNA जो spike protein ला code करतो तो इजेक्शन रुपात दिला जातो.
हा mRNA, lipid च्या nanoparticals ने संरक्षीत केलेला असतो.
शरीरात गेल्यावर हे लस spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनवते.
May 18, 2021 10 tweets 3 min read
Sputnik-V
रशियाचे sputnik-v हया vaccine चा पहिला dose शुक्रवार दिनांक 13/5 रोजी Dr.reddys lab तर्फे दिला गेला.
भारतात उपलब्ध होणारे हे corona वरील तिसरे vaccineआहे.
याचे दोनdose 21 दिवसाच्या अंतराने द्यावे लागतात.
एका ची किंमत 995 /-रुपये इतकी आहे. Storage:-
Liquid formमध्ये-17°Cला स्टोअर करावे लागते. त्यामुळे metro citiesतसेचtire1city मध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.
तरpowder formमध्ये 2°ते8°c मध्ये म्हणजे conventional refrigeratorमध्ये storeकरता येते.

Research and production:-Gamalieya National research Instituteने हेdevelop
May 16, 2021 4 tweets 2 min read
Pfizer on new varient..
आता SARS-cov2चे नवीनvarient आले आहेत. ज्यामध्ये genes मध्ये mutation आढळते.

Spike proteinसोडून इतर geneमध्ये बदल झाले असेल तर फरक पडत नाही...म्हणजे तयार आहे ते vaccine त्यावर काम करते.

पणSpike protein च्याgene मधेmutation झाले तर हे vaccineउपयोगी नाही spike protein...
Spike protein ने virus हा human cell च्या ACE 2 receptor ला attach होता.
आताचे vaccine हे, ह्या spike protein विरोधात antibody बनवतात व immunity प्रदान करतात.

त्यामुळे हा प्रोटीन आला तरच आपली immune system ही active होते. Image
May 14, 2021 20 tweets 7 min read
Pfizer त्याचे covid-19 vaccine कसे बनवते ?

अमेरीकेतील Chesterfield व Missouri येथे trillions of bacteria ज्यात
'corona virus चे gene असलेले DNA'चे
loop बनवले जातात.
हेच Pfizer - BioNTech चे raw material.
ही Pfizer ची facility तीन राज्यात विखुरली आहे. लाखो डोस येथे बनवले जातात, Image व गोठवून वितरित केली जातात.
ही किचकट प्रक्रिया अठरा स्टेपस मध्ये होते.

step 1: pull DNA from cold storage.
शास्त्रज्ञ Master cell Bank मधून DNAचेvial घेतात.ह्याvial-150c गोठवलेली असते त्यात DNA चे Ring असतात.त्याना plasmid म्हणतात.ते Immune response triggerकरायला कारणीभूत होतात. Image
May 10, 2021 14 tweets 4 min read
2017मध्ये 3 leading vaccineकंपन्यांनी एक महत्त्वकांक्षी उद्दिष्ट असलेल्या प्रकल्प सादर केला. तोपर्यंत कोणतेही vaccine असे नव्हते की जे single beta corona virus ला थोपववु शकेल. coronavirusहा कुविख्यात virus ग्रुप आहे ज्यामध्ये sever acute respiratory syndrome (sARS), Middle East respiratory syndrome(MERS) अनेक common cold व bat viruses येतात.
Researchers या सर्व विरोधी एकच असे vaccine बनवु पहात होते.

National Institute of allergy and infectious disease(NIAID) हा planउत्कृष्ट आहे असे मानले पण fundingला नकार दिला.
Apr 4, 2021 10 tweets 3 min read
हा नेहमी कुतूहल व वादाचा विषय राहिला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला ?

•1936 मध्ये Annihilation of casteया ग्रंथात आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाचा निर्णय जाहीर केला •पण1956मध्ये Buddhism स्वीकारला.
#AmbedkarJayanti #LetsReadIndia दोन दशके त्यांनी सर्व मुख्य धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर बौद्ध धर्माची निवड केली.

बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला?

'Buddha and future of his religion'या निबंधात याचे उत्तर दिले आहे.

1950 मध्ये कोलकत्ता येथील Mahabodhi societyचे मासीक मध्ये हा निबंध प्रकाशित केला
Oct 15, 2020 10 tweets 2 min read
अनन्याची बातमी कळली आणि सारे जण हळहळले. मृत्यू अटळ असला तरी निराश होऊन मधेच निघून जाणं जिव्हारी लागल.
Twitterपरिवारात पुन्हा असं घडू नये म्हणून हा प्रपंच.
स्वतःच्या भावना स्वतःच्या काबूत असणं खूप गरजेचं असतं त्यासाठी जाणीपूर्वक emotional intelligence वाढवण्याची गरज आहे. IQतसा शालेय जीवनात महत्त्वाचा ठरतो तसा emotional intelligence जीवनात उपयोगी ठरतो.
EQ (emotional quotient)म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणे ,समजण,मॅनेज करणं तसंच इतरांच्या भावना ओळखणं आणि त्यावर प्रभाव टाकण.