अस्तित्वाच्या या लढाईत #माझी_लेखणी मला साथ देत आहे.
मी कोण ? कसा आहे ? विचारू नका.
तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही घ्या 😊
कधी कृष्ण आहे ! कधी बुद्ध आहे ! ☺️
आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून गावाच्या दिशेनं परतीला लागली. नुसती धूळ शिल्लक उरलेल्या त्या बाजारातील आया बाया सुद्धा चपला फरफटत चालू लागल्या. म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. (१)
फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. लाडवांची पुरचुंडी प्लास्टिकच्या पिशवीत चुंबळीच्या पदराखाली सरकवली. आजी एसटी च्या खांबाशी पोहोचते, तो एसटी निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने तिला हटकलंच, "म्हातारे, आज उशिरसा ?" (२)
Jun 11, 2020 • 6 tweets • 2 min read
अगदी सहजतेने मनातील देशभक्ती शायरीच्या आणि #लेखणी च्या माध्यमातून उतरवणारे, तितक्याच निपुणतेने इंग्रजांविरुद्ध #बंदूक चालवणारे #रामप्रसाद_बिस्मिल यांचा आज जन्मदिन.
लेखणी आणि बंदूक हे दोन्ही परस्परविरोधी शस्त्र सहसा एकत्रित येऊ शकत नाहीत. पण बिस्मिल अपवाद होते. क्रांतीकारकांना (1
शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ही संघटना चालविण्यासाठी पैश्याची गरज होती. बिस्मिल शायरी आणि पुस्तके लिहून प्रसिद्ध करायचे आणि त्यातून येणाऱ्या मिळकतीने संघटनेसाठी शस्त्र खरेदी करीत होते.
मागितल्याने स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी रक्त (2