लिखाण अंगावर\मनावर घेऊ नये.
मराठीत बोललात तर बरे होईल. आणि हो विनोद बुद्धी जागृत असेल तरच संपर्क साधा...अन्यथा..🙏
Jul 1, 2020 • 16 tweets • 5 min read
आषाढी एकादशी निमित्ताने मागील वर्षाचा(2019) अनुभव येते मांडत आहे. सोसायटीत वारकरी यावे सगळ्या सभासदांना त्यांची सेवा करण्याचा आनंद मिळावा यासाठी मी व माझा मित्र प्रयत्न करत होतो. #वारी_पंढरीची#वारी
आधी सोसायटी ग्रुप मध्ये विचारले कि कुणाच्या गावातील वारकरी दिंडी घेऊन आले आहेत काय, तर फक्त दोन सभासदांचे प्रतिसाद आले. त्यातले कोल्हापूर भागातील सभासदाला आम्ही संपर्क करून त्या भागातील दिंडीला आणायचे ठरवले.