#संप_सरकारी_कर्मचाऱ्यांचा #बोंब#आमदार_खासदारांच्या_नावाने -२
तीन वर्षानंतर आज विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवार यांच्या भूमिकेत बदल झाला आहे. कारण कोणत्याही विषयात राजकारण करण्याची आपल्या देशात परंपरा आहे.
मूळ विषय बाजूला सरायचा असेल तर, त्याला फाटे फोडायचे आणि मुख्य मुद्द्याला
बगल द्यायची.
ही आपल्याकडील शहाण्या लोकांची नेहमीचीच पद्धत.
सोशल मीडियावर तर अशा अद्भुत लोकांची प्रचंड गर्दी झालेली दिसते. जर तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटित दादागिरी वर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला निघालात, तर हे म्हणतील आमदार खासदारांच्या वेतन भत्त्याचे काय ?
राज्यातील
Mar 14, 2023 • 5 tweets • 2 min read
#संप_सरकारी_कर्मचाऱ्यांचा #बोंब#आमदार#खासदारांच्या_नावाने
आजपासून तीन वर्षांपूर्वी बरोबर तीन मार्च 2020 रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळात अजित पवार यांनी जुन्या पेन्शन संदर्भात राज्याचे अर्थमंत्री म्हणून आपली भूमिका मांडली होती.
आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित
दादांचे ते प्रसिद्ध भाषण सध्या सर्वत्र गाजत आहे.
आज विरोधी पक्षनेते पदावर बसलेले अजित दादा सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या असा आग्रह धरत आहेत.
पण तीन वर्षांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री म्हणून ते काय म्हणाले होते तेही पहा,
"वर्ष 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना
Mar 14, 2023 • 5 tweets • 3 min read
#कर्तव्या_ऐवजी_हक्कांसाठी_होणारे #आंदोलन#संप#संपणार_कधी
आज राज्यातील जवळपास एकोणीस लाख #सरकारी कर्मचाऱ्यांनी #संप सुरू केलाय. या संपामुळे आम जनतेची फरपट होणार आहे. कर्मचारी आंदोलनात असल्याने अनेक शासकीय कामे खोळंबणार आहेत. शालेय शिक्षकांनीही संपाला पाठिंबा दिल्यामुळे दहावी -
बारावीच्या पेपर तपासणीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. शिवाय अवकाळीच्या पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या प्रक्रियेतही अडथळे येतील... पण लक्षात घेतोय कोण?
हा संप बेकायदेशीर असल्याचे म्हणत शासनाने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात