Abhijeet Profile picture
Dropping SARCASM & SINCERITY in equal measure.
Apr 25 6 tweets 1 min read
कुठल्याही UPSC टॉपरने आपला संघर्ष, फॅमिली बॅकग्राउंड सांगताना आणि हे सांगताना की मी हे करु शकतो तर कुणीही करू शकतं.. हे पण सांगावं की #UPSC ची तयारी करताना तुम्हाला काय काय sacrifices करावे लागणार आहेत, किती मेहनत करावी लागणार आहे, यश मिळण्याचे चांसेस किती असणारेत..(1/6) कारण या टॉपर्सचा जरी दिशाभूल करण्याचा उद्देश नसला तरी त्यांना ऐकणारी लोकं जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा योग्य अर्थ घेऊ शकते नाहीत किंवा अर्धवट गोष्टीच ऐकून या क्षेत्रात यायचं ठरवलं तर कालांतराने त्रास होऊ शकतो.
कुणी कितीही हुशार असला, खूप प्लॅनिंग आणि योग्य मार्गदर्शन(2/6)
Dec 2, 2022 9 tweets 6 min read
#थ्रेड
#रवीश_कुमार चं जुनं आणि एक ट्विट दाखवून अनेक जण त्यांना ट्रोल करतात.
ट्विटमध्ये त्यांनी "Army chief must join hands with Anna."
असं लिहिलं होतं.या वाक्याचे अनेक अर्थ निघतात. प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार याचे अर्थ लावतो.मी देखील लावला होता.पण हे अर्थ तेव्हाच निघतात(1/9) जेव्हा आपल्याला हे एकच ट्विट दाखवलं जातं आणि त्याच्या आधीचे किंवा नंतरचे ट्विट दाखवले जात नाहीत किंवा मुद्दाम लपवले जातात.
अनेक जण त्या ट्विट ला कोट, रिप्लाय करत #रवीश_कुमार ला ट्रोल करत असतात. यात प्रामुख्याने काँग्रेसचे अंधभक्त, इथे पुरोगामी,रॅशनल म्हणून वावरणारे इ. आहेत.
(2/9)
Dec 1, 2022 7 tweets 2 min read
कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत हे बघून पत्रकाराने पत्रकारिता करायला पाहिजे का?😄
यातून असा अर्थ निघतो की तो पत्रकार चमकोगिरी साठी मोठमोठे पक्ष निवडून त्याबद्दल बातम्या करतोय.
आप आणि केजरीवाल ज्या पद्धतीचं राजकारण आणि जाहिरातबाजी करतंय त्याची वेळीच दखल घेऊन जनतेला
(1/7) जागरूक करणं पत्रकारांचं कर्तव्य आहे.
ज्या दिल्ली मॉडेलची मार्केटिंग आप करतंय त्यात खरंच तथ्य आहे का हे बघायला नको का?लोकांना त्याबद्दल सत्य सांगायला नको का?
मोदींनी जेव्हा गुजरात मॉडेल ची मार्केटिंग केली तेव्हा वेळीच जर त्या मॉडेलचं सत्य पत्रकारांनी जनतेसमोर आणलं असतं तर
(2/7)
Dec 1, 2022 11 tweets 4 min read
रविश कुमारांच्या काँग्रेस सरकारच्या काळातील काही भूमिका वादग्रस्त होत्या हे कुणीही नाकारू शकत नाही.जसं ती आर्मी चीफ ने अण्णा सोबत हात मिळवावा ही भूमिका असेल किंवा अण्णा हजारे बद्दलच्या भूमिका असतील.
पण जेव्हा भाजप सरकार आल्यावर अनेक पत्रकार सत्तेचे गुलाम होत सरकारची(1/11) चाटूगिरी करू लागले तेव्हापासून आजपर्यंत रविश कुमारांनी सत्तेत बसलेल्याना प्रश्न विचारणारा पत्रकार म्हणून स्वतः चं अस्तित्व टिकवलं हे ही कुणी नाकारू शकत नाही. आज बोटावर मोजता येतील इतकेच असे पत्रकार उरलेत जे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात,सामान्य जनतेचे मुद्दे उचलतात.
(2/11)
Nov 19, 2022 6 tweets 2 min read
महात्मा गांधी आणि इतर कैद्यांसाठी ब्रिटिश सरकारने पास केलेल्या बजेट चे फोटो सोशलमीडियावर टाकून अनेक भक्त सावरकरांचा बचाव करू पाहतात.भक्त दावा करतात की सावरकरांना तर 60 च रुपये मिळत होते,पण गांधीना एवढी मोठी रक्कम मिळत होती.
प्रथमतः यातून भक्त हे तर मान्य करतात की
(1/6) सावरकरांना 60 रुपये मिळत होते.
आता वरील फोटो टाकून करण्यात येणाऱ्या दाव्यांबद्दल बोलायचं झालं तर 1942-43 साठी गांधीजी आणि त्यांच्यासोबत स्थानबद्ध असणाऱ्या इतर लोकांच्या खर्चासाठी जे पैसे ब्रिटिश सरकारने मंजूर केले होते त्याबद्दलचा तपशील त्या फोटो मध्ये दिसतो त्यामुळे
(2/6)
Aug 7, 2022 6 tweets 2 min read
अनर्थमंत्री निर्मला अक्का ने ऑईल बॉण्ड वर पुन्हा एकदा संसदेत भाषण देत लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला.
ऑइल बॉण्डचं व्याज आणि परतावा मोदींना करावा लागतोय,त्या इथपर्यंत म्हणाल्या की 2026 मध्ये पण आम्हालाच परतावा करावा लागणार आहे.त्यांच्या बोलण्याचा सूर असा होता की
(1/6) जसं तत्कालीन 2005 मध्ये असणाऱ्या सरकारला स्वप्न पडलं होतं की 2014 ला मोदी सत्तेत येणार आहे त्यामुळे आपण बॉंडचं व्याज आणि परतावा त्यांच्या माथी मारण्यासाठी 2014 पासून repayment सुरू करू.😅
ऑईल बॉण्ड वर अनर्थमंत्री पहिल्यांदा बोलत आहेत असं नाही,2021 मध्येही त्यांनी यावर
(2/6)
Aug 6, 2022 7 tweets 2 min read
बातम्यांच्या चॅनलवर आता अशा प्रकारची जाहिरातबाजी चालू झाली आहे.17 हजारांचा कोर्स 7 वाजेपर्यंत विकत घेतल्यास 2400 मध्ये मिळवा वगैरे.
यात 2-4 लोकांच्या प्रतिक्रिया पण दाखवतात जे सांगत असतात की या सरांकडून ट्रेडिंग शिकल्याने खूप फायदा झाला वगैरे.
पण ट्रेडिंग करताना (1/7) कुणी आपल्याला 80-90% accuracy असलेली स्ट्रॅटेजी शिकवू द्या, जर आपण रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट प्रॉपरली फॉलो केलं नाही तर शेवटी आपल्याला लॉस होतो.
आपण 80-90% accuracy मध्ये छोटे प्रॉफिट घेण्यात यशस्वी ठरतो पण जे 20% ट्रेड आपले फेल जातात तिथे आपण मोठे लॉस घेऊन बसतो
(2/7)
May 5, 2022 4 tweets 1 min read
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला ओळखलं जातं. या लोकशाहीचा पंतप्रधान गेल्या आठ वर्षात भारतात भारतीय पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊ शकला नाही.ती 1 पत्रकार परिषद सोडून द्या ज्यात धरून आणल्यासारखं पंतप्रधानांना बसवलं होतं.
पंतप्रधान ज्या स्क्रिप्टेड मुलाखती देतात
(1/4) त्यात त्यांना प्रश्न विचारले जातात की तुम्ही थकत का नाही,एवढी एनर्जी कुठुन येते वगैरे.
देशात बेरोजगारी,महागाईचा भडका उडाला असताना पंतप्रधान त्यावर बोलत नाहीत.
नुकतेच पंतप्रधान युरोप दौऱ्यावर असताना पत्रकारांचे प्रश्न न घेतल्यामुळे पंतप्रधानांवर टीका होत आहे.
(2/4)
May 5, 2022 8 tweets 2 min read
राज ठाकरेचा डाव त्यांच्यावरच उलटताना दिसतोय.त्यांना वाटलं हिंदूंना भडकावून आपण फक्त मशिदीवरचे भोंगे उतरवण्यात यशस्वी होऊ पण मशिदीवरचे भोंगे उतरवता उतरवता कधी मंदिरांवरचे भोंगे उतरवण्याची वेळ आली हे त्यांना पण समजलं नाही.
(1/n) पहिल्या दोन सभेत RT ने मंदिरांवरील अनधिकृत भोंग्यांचा उल्लेख केला नाही.त्यानंतर गृह मंत्र्यांनी भोंग्यांबद्दल सर्वपक्षीय बैठक बोलावली आणि त्यात चर्चा झाली की अजान बद्दल निर्णय घेतल्यावर मंदिराबद्दल पण निर्णय घ्यावा लागेल आणि त्याचा फटका मंदिरांना पण बसणार.
(2/n)