संघ स्वयंसेवक 🚩, भाजपा कार्यकर्ता 🌷, Followed by PM @narendramodi ❤️
Nov 26, 2020 • 6 tweets • 2 min read
हुतात्मा पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबाळे !
२६/११ म्हणलं की शरीर एकदम थरथरायला होतं. रात्री तुळजापूरहुन येताना अचानक वडिलांना फोन आला, मुंबई मध्ये दहशतवादी हल्ला झाला. पहिल्यांदा ते सगळ्यांना बॉम्बब्लास्ट वाटला. संपूर्ण महाराष्ट्रात चेकिंग सुरू झाले. #MumbaiTerrorAttack
(1/6)
पुण्याला रात्री १२ ला पोचलो आणि संपूर्ण पुणे शहरात कडेकोट बंदोबस्त. घरी जाऊन टीव्हीवर बघितले आणि सगळेच घाबरले. पूर्ण ३ दिवस हे नाटक चालले आणि शेवटी आपल्या सुरक्षाकर्त्यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.. #MumbaiTerrorAttack