Vikrant | विक्रांत Profile picture
IITian | Defence & Infra Enthusiast | Keen Observer
Mar 9, 2024 9 tweets 4 min read
#Thread

भारतातील National Highway Nomenclature

देशात जवळपास दीड लाख किलोमीटरचे नॅशनल हायवे नेटवर्क आहे. यात शेकडो वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. या नेटवर्क मधील राष्ट्रीय महामार्गांचे Numbering कसे होते याबाबत.. Image 2010 पर्यंत National Highways ना त्यांचे क्रमांक Randomly दिलेले होते पण 2010 साली Ministry of Road Transport & Highways ने Random numbering असलेल्या हायवे नेटवर्कला एका सूत्रात बांधत Nomenclature ची नवीन पद्धत आणली. ज्यात महामार्गांची Numbering System पण बदलली आणि.. Image
Feb 11, 2024 18 tweets 8 min read
#Thread

Long Term Nuclear Waste Warning Messages

काही हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर Mesopotamia, Indus Valley, Chinese, Egyptian सारख्या Civilizations होत्या. नैसर्गिक आपत्तींमुळे काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या. आजही त्यांचे अवशेष आपल्याला बर्‍याच Ancient Sites वर पाहायला मिळतात.
Image
Image
Ancient Civilizations ची जागा नंतर विविध साम्राज्यांनी घेतली. Mongol, Persian, Turks सारखे Empires तयार झाले. त्यानंतर स्थानिक राजवटी उदयास आल्या

नजीकच्या इतिहासात सर्व जगावर युरोपियन्सनी विशेषतः ब्रिटिशांनी राज्य केले आणि आज Geographical Boundaries असलेले सर्व स्वतंत्र देश आहेत Image
Jan 25, 2024 5 tweets 2 min read
#MarathaReservation च्या निमित्ताने आता गर्दीचे विविध अंदाज लावले जातील. तर हे Crowd Estimation कसे काम करते याबाबत..

Crowd सहसा दोन Broad Type ची असते, एक Dynamic - रॅली, मोर्चा आणि दुसरी Static - सभा, मेळावा. दोन्हीमधे Crowd Estimation ची वेगवेगळी पद्धत आहे. (1/5) Image मोर्चा, रॅली यासारख्या Crowds, नेहमी हलणार्‍या ( Dynamic ) आणि एका रस्त्यावरुन एका रेषेत चालणार्‍या ( Linear ) प्रकारात मोडतात. Dynamic Linear Crowds ना मोजण्याची एक प्रचलित पद्धत आहे.
Jan 20, 2024 18 tweets 8 min read
#Thread

महाराष्ट्र Expressway Grid

महाराष्ट्रातील Operational, Under Construction आणि DPR, Planning Phase मधे असलेल्या सर्व Expressways चे 3500 किमींचे विशाल नेटवर्क तयार होत आहे.

MSRDC 🟠 आणि NHAI 🔵 बांधत असलेल्या सर्व Expressways चे Specifications, Route & Status

(1/17) Image 1. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग

> 6 Lane, 701 Km
> नागपूर - भरवीर 600 Km सेक्शन : Operational. भरवीर - मुंबई 101 Km सेक्शनचे 75-80% Construction पूर्ण झालं आहे, काही महिन्यांत पूर्ण 701 Km महामार्ग खुला होईल.


Image
Image
Image
Image
Dec 25, 2023 26 tweets 10 min read
#Thread

Nuclear Energy आणि भारत

Cleanest Form of Energy म्हणून ओळखल्या जाणार्‍या अणुऊर्जेचे फायदे, सौरऊर्जा आणि पवनऊर्जेसोबत होणारी तुलना, Power Sector मधील काही Technical Insights आणि बदलत्या काळानुसार अणुऊर्जा Adopt करण्यात भारत कुठेपर्यंत आहे याबाबत.. Image Global Warming ने त्रस्त झालेल्या आणि Net Zero Carbon Emission चे टार्गेट असलेल्या आजच्या जगात 85% ऊर्जा ही अजूनही Conventional Fossils Fuels द्वारे येते.

हेच प्रमाण कमी करण्यासाठी, Conventional कडून Renewables कडे शिफ्ट होण्याचे जगभरात प्रयत्न सुरू आहेत. Image
Dec 2, 2023 6 tweets 3 min read
हे आहे Mi-26,
जगातील सर्वात मोठे हेलिकॉप्टर #Defence

भारतीय वायुसेनेचे 3 Mi-26 हेलिकॉप्टर्स चंदीगढच्या एअरफोर्स बेसवर विविध तांत्रिक कारणांमुळे गेल्या 7-8 वर्षांपासून धूळखात पडून आहेत. पण आता बातमी आली आहे की रशियाच्या मदतीने IAF पुन्हा यांना Service मधे Active करणार आहे. 1/6
Image
Image
भारताने Heavy Lift Transport Helicopter कॅटेगरीत रशियन Mi-26 ऐवजी आता अमेरिकन Chinook वापरायला सुरुवात केली आहे. तसं तर जिथे एका Chinook ची किंमत 700 कोटी आहे, तिथे एक Mi-26 फक्त 250 कोटींत येते.

CH-47 Chinook
Image
Image
Nov 26, 2023 39 tweets 18 min read
#Thread #Defence

जम्मू & काश्मीर मधील दहशतवाद आणि राष्ट्रीय रायफल्स

भारताचे मुकुट व निसर्गसंपन्न असलेल्या जम्मू & काश्मीरची नेमकी Geography, काश्मीर खोर्‍यातील दहशतवादाचा उदय आणि त्याचा बिमोड करणारी Counter Insurgency & Counter Terrorism (CI/CT) फोर्स राष्ट्रीय रायफल्स बाबत...


Image
Image
Image
Image
First things First, कोणताही Geopolitical किंवा Military conflict समजून घेण्याआधी त्या भागाची Geography समजणे महत्वाचे आहे

आणि जेव्हा विषय जम्मू & काश्मीरचा येतो तेंव्हा तर POK, LOC, LAC, Aksai चीन, काश्मीर Valley अश्या टर्म्स आणि त्यांचे Geographical लोकेशन माहिती असणे must आहे.
Nov 20, 2023 16 tweets 7 min read
#Thread

Uttarakhand Tunnel Collapse

उत्तराखंड मधे 12 नोव्हेंबर रोजी Under Construction Tunnel कोसळून 41 कामगार गेल्या 9 दिवसांपासून बोगद्यात अडकले आहेत. ही Tunnel नेमकी कुठे कोसळली, कामगार कोणत्या ठिकाणी अडकले आहेत आणि कशाप्रकारे Rescue ऑपरेशन सुरू आहे याबाबत Diagram सह...


Image
Image
Image
Image
उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त झालेली ही Tunnel चारधम हायवे प्रोजेक्टचा एक भाग आहे. ब्रम्हखाल - यमनोत्री राष्ट्रीय महामार्गावर याचे काम सुरू होते. 2018 मधे कॅबिनेटने 1400 कोटींच्या या 4.5 किमी लांब Tunnel ला मंजुरी दिली होती.
Aug 12, 2023 13 tweets 4 min read
पुणे आणि पुणेकरांवर Meme थ्रेड..!

1. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नुकताच पुण्यात आलेला विद्यार्थी : 2. घराच्या गेटसमोर गाडी पार्क केल्यावर पुणेकर : Image
Jun 18, 2023 22 tweets 7 min read
#Thread

मणिपूर Violence

गेल्या दीड महिन्यापासून चालू असलेल्या मणिपूर हिंसाचारामागे काय कारणं आहेत, नेमकी याची सुरुवात कुठून झाली आणि सरकार व सुरक्षा यंत्रणा सध्या कशी परिस्थिती हाताळत आहेत याबाबत... Image या सर्व हिंसाचाराचे मूळ आहे Meitei समाजाचा अनुसूचित जमातीमधे समावेश करण्याची मागणी.. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येपैकी 60% असलेले बहुसंख्य Meitei लोक हे राज्याच्या 10% जमिनीवर राहतात तर उर्वरित 40% Kuki आणि इतर Tribals राज्याच्या 90% जमिनीवर राहतात.
Mar 16, 2023 20 tweets 5 min read
#Thread

जुनी पेन्शन योजना Vs National Pension Scheme ( NPS ) व पेन्शन मागील सर्व अर्थचक्र Image जुनी पेन्शन योजना ही Traditional स्कीम आहे ज्यात कर्मचार्‍यांच्या पगारीसारखाच पेन्शनचाही पूर्ण खर्च सरकार उचलते. ज्यासाठी बजेट मधे विशेष पेन्शन बिल सादर केले जाते. सरकारवरील वाढता पेन्शनचा बोजा पाहता 2004 मधे केंद्र सरकारने National Pension Scheme लागू केली आहे. Image
Mar 7, 2023 20 tweets 6 min read
#Thread

Operation Cactus

हिंद महासागरात अतिशय स्ट्रॅटेजिक ठिकाणी असणार्‍या मालदीव या छोट्याश्या देशाला एका मोठ्या उठावापासून वाचवण्यासाठी भारताने राबवलेले हे ऑपरेशन Cactus. हे ऑपरेशन म्हणजे भारतीय संरक्षण दलाचे तिन्ही अंग लष्कर, वायुसेना आणि नौसेनेतील समन्वयाचा उत्तम नमुना होता ImageImage 1965 ला ब्रिटीशापासून स्वतंत्र झालेल्या मालदीवचे पहिले राष्ट्रपती इब्राहिम नासीर भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सिंगापूरला पळून गेल्यावर दुसरे राष्ट्रपती म्हणून अब्दुल गय्युम पदावर आले. नासीर यांनी 1980 & 1983 मधे दोनदा गय्युमविरोधात लष्करी उठाव करवण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला
Sep 21, 2022 20 tweets 8 min read
#Thread #म

महासागरांतील अगदी दुर्गम बेटांपासून तप्त वाळवंटापर्यंत, घनदाट जंगलापासून ते अगदी भरशहरी भागात पसरलेले अमेरिकेचे विदेशी जमिनीवरच्या Military Bases चे जाळे कसे आहे आणि याबाबत त्यांची Overseas Military स्ट्रॅटेजी काय आहे याबाबत.. 👇 आजच्या घडीला 80+ देशात असलेल्या 800 Military Bases वर दीड लाख अमेरिकन सैनिक तैनात आहेत आणि विशेष म्हणजे हा आकडा अधिकृत आहे, याव्यतिरिक्त कित्येक Black Bases असून Google Maps वर सुद्धा अश्या बर्‍याच ठिकाणांना ब्लर केलेलं आहे. Image