जगात भारी आम्ही कोल्हापुरी, पण सध्या तरी पुणे तिथे काय उणे◾पोटापाण्यासाठी #अभियांत्रिकी छंद म्हणून #फोटोग्राफी #भटकंती #Trekking◾बाकी दुनियादारी पासून ४ हात दूर
Jun 27, 2020 • 5 tweets • 2 min read
मोबाईलची गॅलरी चाळता चाळता हा फोटो दिसला आणि फ्लॅशबॅक मोड ऑन झाला.. चोहोबाजूंनी वेढलेली अन् वृद्धापकाळाकडे झुकलेली चिंचेची विस्तीर्ण झाडं आणि त्या झाडांच्या गर्दीत एखाद्या भूतबंगल्यासारखी दिसणारी ही हवेली....
खरं तर शेकडो वर्षांपापूर्वीचा हा एक ऐतिहासिक वारसा आहे..
#भटकंती
हबशी महल की हशबी महल? ह्यात बऱ्याचदा खूप जमलिंग व्हायचं, इतिहासाची पानं चाळली आणि सारं कन्फ्युजन दूर झालं. निजामशाही वजीर मलिक अंबर ह्याची ही हवेली. जुन्नरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हापूस बागेतील. येथे हापूस बाग म्हणजे आंब्याची बाग नव्हे, 'हबशी बाग' ह्या शब्दाचा हा अपभ्रंश.