शशांक Profile picture
खरं ते म्होर! शिवरायांचा | भारतीय, #मराठी | Engineer | Cricket & F1 | इथे जगाला फुकटच पण दर्जेदार ज्ञान पाजळायला | व्यसन नाही कुठलं पण व्यासंग भरपुर | #नाशिक
Aug 18, 2018 26 tweets 7 min read
आज थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या जयंतीनिमित्त जरा इतिहास!

पेशवे म्हणजे श्रीवर्धनचे भट मग त्यांचा मराठा राज्यातले एक थोर लढवय्ये,शुर सेनानी आणि मुत्सुद्दी राजकारणी असा गौरव का होतो?
कसा झाला शिवाजी महाराज ते पेशव्यांपर्यत इतिहासाचा प्रवास ह्या ट्विटमालिकेतुन..

#मराठी @MarathiRT तर सुरूवात करूयात शिवाजी महाराजांपासुन! भोसलेकुळात जन्मलेले शिवाजीराजांनी १६४६ साली पहिला किल्ला जिंकून आपल अस्तित्व स्थापित केल. तेव्हापासुन १६७४ मराठी साम्राज्याचे छत्रपतीपद मिळेपर्यतच पर्यतचा २४० किल्ले, सैन्य अन् दौलतीचा प्रवास आपल्याला ठावूक आहेच. 🙏