क्रीडाजगत Profile picture
क्रीडाजगतातील संपूर्ण घडामोडी मराठीमध्ये 🏆🏅 आपल्या भाषेत सर्व खेळ..🏸⚽🎾🏏🎯🏑 https://t.co/zK4RYYjRvN
Jun 11, 2022 18 tweets 17 min read
फॉर्म्युला वन रेसिंग #F1 #Thread
ह्या स्पर्धेचे आयोजन फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑटोमोबाईल (FIA) तर्फे केले जाते. ह्या स्पर्धेला फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप (F1) म्हणून देखील ओळखतात. जगभरातील वेगवेगळ्या २० ते २२ रेसिंग ट्रॅक्सवर ही स्पर्धा होते. 🛣️
#Formula1 #FormulaOne #रेसजगत ह्या स्पर्धेत एकूण १० संघ असतात आणि प्रत्येक संघाचे २ असे एकूण २० चालक असतात. ह्या रेस मध्ये २ प्रकारच्या स्पर्धा असतात एक कार चालकांसाठी तर दुसरी कारच्या बांधणीबद्दल संघासाठी. प्रत्येक रेसच्या निर्णयानंतर मिळणारे सर्व अंक मिळून शेवटी विजेता ठरतो. 🏆
#F1 #Formula1 #रेसजगत