A writer, photographer and a traveler. Studying abroad in USA. Visit my website:-
Apr 2, 2020 • 12 tweets • 3 min read
#कोरोना#कोविड१९ विषाणू काय आहे ते जाणून घेऊ.
मी अमेरिकेतल्या University of Nebraska at Omaha या विद्यापीठात Biology म्हणजेच जीवशास्त्र या विषयात पदवी शिक्षण घेत आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग ग्रस्त झाले आहे. कोरोना व्हायरस म्हणजे नक्की काय?
कोरोनाची जैविक बांधणी कशी आहे आणि हीच बांधणी कोरोना पासून आपला बचाव करण्यात काय सहाय्य करू शकते? करोनाचे रुग्ण नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीद्वारे बरे कसे होतात? या बद्दल काही माहिती जाणून घेऊया. कोरोनाव्हायरस हे SARS-CoV-2 या विषाणूमुळे झालेल्या रोगाचे नाव आहे.