Swanand Gangal (Cartoonist) Profile picture
Nationalist/ Cartoonist / RT's Are Not Endorsements / Insta Profile 👇🏻
May 11, 2023 6 tweets 2 min read
फडणवीसांचा माईंड गेम आणि ठाकरेंची हिट विकेट!!

आजच्या निकालातून एक गोष्ट ठळकपणे नमूद केली जात्ये की उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन चूक केली. तो दिला नसता तर कदाचित त्यांचं सरकार वाचलं असतं. अगदी हरिश साळवेंनी पण न्यायालयीन युक्तीवादात मांडलं की राजीनामा दिला तिथेच विषय संपला
(१) Image पण मग मुद्दा हा येतो की उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला? म्हणजे राजीनामा दिल्यानंतर एवढे महिन्यांची न्यायालयीन लढाई ते लढलेच की! ती राजीनामा न देताही लढता आली असती. कदाचित त्याने ते फायद्यातच राहिले असते. मग तरिही राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला सांगितल्यावर ठाकरे का घाबरले?
(२)
Jan 3, 2022 8 tweets 2 min read
मोदींची गाडी, विरोधक अनाडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजवरच्या राजकीय यशात त्यांच्या विरोधकांचा खूप मोलाचा वाटा राहिला आहे. म्हणजे ते कायमच आपल्या वर्तनातून मोदी हेच कसे हा देश चालवायला लायक आहेत हे सिद्ध करत असतात.
(1)
आता हेच बघा सध्या पंतप्रधानांच्या नवीन गाडीवरून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत आहे. वास्तविक ही गाडी नरेंद्र मोदी या व्यक्तीसाठी नसून पंतप्रधान या पदासाठी आहे. म्हणजे उद्या समजा तिसर्‍या आघाडीचे स्वप्न पाहणाऱ्या ममता बॅनर्जी पंतप्रधान झाल्या,
(2)
Sep 2, 2021 9 tweets 2 min read
मिसळीचा शोध मुघलांनी लावला हे तुम्हाला माहित आहे का?

भारतातील सर्व चांगल्या गोष्टी या फक्त आणि फक्त मुघल काळात झाल्या हे आपण सारे जाणतोच. मिसळही त्याला अपवाद नाही.
(1)
मुघलांमधील सर्वात उदार मतवादी, पुरोगामी, विकासपुरूष, भारताचा उद्धारकर्ता वगैरे वगैरे असणारा शासक म्हणजे अकबर. अकबर हा प्रचंड मोठा खवय्या होता. त्याचा मुलगा जहांगीर हा देखील या बाबतीत वडिलांच्या वळणावर गेलेला.
(2)
Jul 26, 2021 5 tweets 2 min read
खालच्या ट्विट्समध्ये दिलेले फोटो आहेत 'सामना' या मुखपत्राच्या आजच्या आवृत्तीचे. शिवसेनेचे मुखपत्र. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या पेपरचे माजी संपादक आणि त्यांच्या पत्नी विद्यमान संपादक आहेत.
(1)
एकीकडे 'सामना' मध्ये बतामी छापली आहे की मुख्यमंत्र्यांनी असे आवाहन केलंय की वाढदिवस साजरा करू नका, पूरग्रस्तांना मदत करा. पण त्या बातमीच्या लगेच खाली सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची शुभेच्छांची जाहिरात
(2)
Apr 8, 2021 12 tweets 4 min read
लसीकरण: महाराष्ट्र आणि गुजरात
#Thread

कालपासून मराठी माध्यमे महाराष्ट्र आणि गुजरात अशी तुलना करत ठाकरे सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी गुजरातची लोकसंख्या कमी आहे तरी लसी जास्त दिल्या जात आहेत असा दावा ते करत आहेत.
1️⃣ पण यावेळी ही गोष्ट सोयीस्करपणे सांगत नाहीत की उत्तरप्रदेशमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त लोकसंख्या (आणि भाजपा सरकार) असूनही त्यांना महाराष्ट्रापेक्षा कमी लस पुरवण्यात आली आहे. यावरून स्पष्ट होते की लोकसंख्या आणि लस पुरवठा यांचा काहीही संबंध नाही.
2️⃣
Jan 27, 2021 15 tweets 2 min read
विशेष सूचना

थ्रेड थोडा मोठा आहे!
वाचायला संयम लागेल!

हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
निवडणुकांना सामोरे जाऊन, ३०३ खासदारांचे बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या सरकारने संसदेत संविधानीक मार्गाने कृषी कायदे पारित केले.
(1/15) हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
विरोधकांना या कायद्यावर चर्चा न करता गोंधळ घालून सभात्याग करणे जास्त महत्वाचे वाटले.
(2/15)
Jul 16, 2020 7 tweets 1 min read
इराण हा एक अधिकृत इस्लामिक देश आहे, जिथली ९९% पेक्षा जास्त लोकसंख्या मुसलमान आहे.

अशा इराण मधले एक जागतिक दर्जाचे दिग्दर्शक माजिद माजदी (नावात बरंच काही आहे) यांनी २०१५ साली एक चित्रपट काढतात ज्याचे नाव 'Mohammad:- The Messenger Of God'.

(1/n) हा त्यावर्षी इराणची Academy Awards साठीची Official Entry असतो आणि त्यावर्षी इराणमधे सगळ्यात जास्त व्यवसाय करणारा हाच चित्रपट असतो.

हा चित्रपट आता Digital Platform वर Release होत आहे आणि या चित्रपटावर भारत नावाच्या Secular देशात बंदी घालावी अशी मागणी 'रझा अकॅडमी' करते.

(2/n)
Jun 8, 2020 8 tweets 2 min read
सोनू सूद आणि 'मातोश्री'चा EGO

• या कोरोना काळात एकिकडे महाराष्ट्र सरकारवर चहुबाजूने टीका होत असताना सोनू सूद करत असलेल्या कामावर मात्र कौतुकाचा वर्षाव होत आहे
(1/n) • अशातच सोनू सूद राज्यपालांना राजभवनात जाऊन भेटतो, रोहित पवार सोनू सूदच्या घरी जाऊन त्याला भेटतात. त्याची माध्यमांत चर्चा होते. पण या सगळ्यात 'मातोश्री' कुठेच नसते.
(2/n)
May 23, 2020 7 tweets 2 min read
जेव्हा संजय राऊतांमुळे बाळासाहेबांना खुलासा करावा लागतो!!!

स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे एक गाजलेले भाषण आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या चित्र-चरित्र प्रकाशानाच्यावेळी केलेले ते भाषण हा एका उत्कृष्ट वक्तृत्वाचा नमुना आहे.
त्या भाषणात प्रमोदजी सांगतात की 'मला बाळासाहेब का आवडतात?'
(1/n) याचे एक कारण म्हणजे बाळासाहेब कधीही 'हे मी बोललोच नाही' अशा पद्धतीचा घुमजाव करत नाहीत. ते बोलण्याच्या आधी किंवा नंतर नाही तर बोलतानाच विचार करत बोलतात. बाळासाहेबांची ही एक खरंच खासीयत होती.
(2/n)
Apr 5, 2020 4 tweets 1 min read
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,
छान बोलतात, शांतपणे बोलतात, संयत बोलतात, घरातला मोठा भाऊ बोलतोय असं वाटतं, वगैरे वगैरे म्हणत कौतुकाचे पूल बांधणाऱ्या (PR agency च्या प्रचाराचे बळी ठरलेल्या??) सर्वांना एक छोटीशी आठवण.....

ते मुख्यमंत्री आहेत...वक्तृत्व स्पर्धेतले स्पर्धक नाहीत!!
(1/n) त्यांना शासन चालवायचंय...वक्तृत्व प्रशिक्षण वर्ग नाहीत!!

त्यांना काम करायला नेमलंय...फक्त तुम्हाला धीर द्यायला नाही!!

एखाद्या डॉक्टरने पेशंटची ट्रिटमेंट केली नाही पण फक्त त्याच्या नातेवाईकांना धीर दिला तर चालेल का??

तसंच आहे हे!!!!

राज्य सरकारचे काम कोणी दाखवू शकेल का??
(2/n)