Prafulla Wankhede 🇮🇳 Profile picture
Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG

Apr 22, 2020, 6 tweets

आपल्याकडे इलेक्ट्रिक कार, मोटारसायकल याचे लोकांना खुप कुतूहल आहे.

त्यासंबंधी काही #माहिती आणि माझी मते या थ्रेड मधे देतोय.

मी #इलेक्ट्रिककार विरोधी नाही पण तंत्रज्ञान समजून घेण्यास आणि नविन शिकायला कायमच तत्पर असतो.

काही वर्षापुर्वी या कारची निर्मिती आणि सोलार आधारित #म १/६👇

तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना हे मुद्दे लक्षात घेण्यायोग्य वाटले ते असे.

१. आपल्याकडे सर्वाधिक वीज ऊत्पादन #औष्णिक ऊर्जेवर-कोळश्यावरच होते त्यामुळे आपण मुंबई/पुण्याचे शहरांचे #प्रदुषण चंद्रपुर किंवा इतर ठिकाणी पाठवतो.
(आपल्या घरातील घाण शेजाऱ्याच्या घरात टाकण्यासारखे) #म २/६ 👇

२. ऊच्च प्रतिच्या बॅटरी निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी (लिथियम) आपण अमेरिका आणि इतर देशांवरच अवलंबुन आहोत.(ते ही अतिशय महाग दर देऊन)

३. भारतातील प्रत्येक इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी ही बाल्यावस्थेत असल्याकारणाने तंत्रज्ञान आणि सुरक्षितता यांवर फार न बोलणेच बरे.३/६ 👇

४. पाश्चिमात्यांना फाॅलो करण्याच्या नादात आपण संपुर्ण गृहपाठ न करताच खुप घाई करतोय असे माझे प्रामाणिक मत आहे.

५. पुरेशा चार्जिंग स्टेशन्सची कमतरता, स्वच्छ वीजनिर्मिती,कच्चामाल किंवा भारतीय तंत्रज्ञान विकसित करण्याचा मंद वेग आणि मुळातच फक्त काॅपीपेस्ट करण्याची वाईट वृत्ती #म ४/६

यामुळे लगेच काही हाती लागेल याबद्दल मला शंका वाटते.

६. वेळोवेळी सरकारी धोरणात बदल करण्याची पद्धत यामुळे जागतिक स्तरावर भारतातील ऊद्योगक्षेत्रातील विश्वासाहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह.

सरकार बदलले कि आपल्याकडे पाॅलिसी सहज बदली होतात ही अत्यंत वाईट बाब आपण सोडली पाहिजे. ५/६ #म #मराठी

आपण सर्वप्रथम खरे तर #जलविद्युत प्रकल्प, #अणुऊर्जा, वायूऊर्जा आणि अपारंपारिक क्षेत्रातुन स्वच्छ #वीज निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे.

वर सांगितल्याप्रमाणे पायभूत सुविधा, कच्चा माल आणि सरकारी ठाम विश्वास गरजेचा.

तरच इलेक्ट्रिक कार/मोटारसायकल यशस्वी होतील.

धन्यवाद 🙏 #मराठी #म

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling