सुडाच्या अग्निनं बेफाम होवुन औरंगजेबाच्या सेनासागरात घुसुन त्याच्या तंबुचे कळस काढुन आणणारे सरसेनापती..
सह्यगिरीच्या पर्वतराजींपासुन ते दख्खनेत जिंजी पर्यंत स्वराज्याची फळी तलवारीच्या जोरावर अबाधित ठेवणारे सरसेनापती..
#म
#मराठी
@UnrollHelper @MarathiRT
फंदफितुरीच्या राजकारणाला बळी न पडता थोरल्या महाराजांच्या स्वराज्याशी इमान राखणारे सरसेनापती..
अवघ्या दोन अडीच वर्षात मुघलांचे एकसे एक सिपाहसालार मातीत लोळवणारे सरसेनापती...
"तुम्ही तो आलमगिरास दहशत लाविली" असे ज्यांना रामचंद्रपंत अमात्य म्हणाले ते सरसेनापती...
#म
#मराठी
स्वामिनिष्ठेचे दुसरे नाव
"ममलकत मदार सरसेनापती संताजीराव घोरपडे" यांना लवुन त्रिवार मुजरा..
आज मराठा साम्राज्याचे सरसेनापती, रणधुरंदर संताजी घोरपडे यांचा #स्मृतिदिवस
#मराठी
#म
संताजी घोरपडे यांचा पराक्रम आणि युद्धकौशल्य याचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता याबद्दल मोगल इतिहासकार खाफिखान लिहतो की " समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती.
#म
#मराठी
ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे.
आपल्या युद्धनितीने मोगलांना सळो की पळू करून सोडणारे मराठा सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा ...
रणमार्तंड मराठे
#सरसेनापती
#ममलकत_मदार
#मुजरा_सरकार
युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे.
@faijalkhantroll @MarathiBrain @anubandhmarathi @RtMaratha @marathivichar
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
