संविधानाचा हवा तसा वापर करणार्या.आणिबाणी लागु करुन स्वतंत्र भारताला काळा दिवस दाखवणार्या #इंदिरा_गांधी उर्फ #Iron_lady यांची माहित नसलेली दुसरी बाजु🙏
इंदिराजी पदावर येण्याच्या अगोदर भारतात जंगलाची अवस्था भयावह झाली होती.मोठ मोठे प्रकल्प(धरणे,कारखाने,खाणी)
राबविण्यासाठी जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड झाली होती त्यामुळे अनेक प्राणी धोक्यात आले होते.तस्करी करण्यासाठी जंगली प्राण्यांच्या कत्तली वाढल्या होत्या.त्यावेळीस बंदुका मोठ्या सहजपणे उपलब्ध असल्यामुळे अनेकजण जंगलात शिकारी करत फिरायचे.सर्व शिकार्यांचे प्रमुख आकर्षण 'वाघ'.तेव्हाचे
वन अधिकारी कैलास संखाला व पत्रकारांनी मिळुन वाघ धोक्यात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणुन दिले.
इंदिराजी पदावर आल्यावर त्यांनी वन संरक्षण संदर्भात अनेक ठोस पाऊले उचलली.
१)१९६९ साली IUCNमध्ये भारताला सदस्यत्व मिळवुन देणे व त्याच वर्षीची वार्षिक बैठक भारतात पार पाडणे.त्या
बैठकीत इंदिराजींनी वाघांचा मुद्दा अत्यंत ज्वलंतपणे मांडला.भारतात वाघांच्या शिकारीवर तात्काळ बंदी आणली ज्याचा अपेक्षित परिणाम म्हणजे शिखर शिकारी संघटनांकडून इंदिराजींवर मोठ्या प्रमाणात दबाव यायला लागला व शिकारबंदी मुळे परकीय चलनाला धोका येईल अशा बाताही मारल्या गेल्या.त्यावेळीस
इंदिरा गांधी म्हणाल्या,"आपल्याला परकीय गंगाजळी हवीय परंतु त्याबदल्यात मी कोणत्याही निष्पाप आणि सुंदर जंगली प्राण्यांच्या जीवाचा सौदा करणार नाही".
२)'वन्यजीव संरक्षण कायदा,१९७२' मंजुर करून घेतला ज्यामध्ये अभयारण्यांची व राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती,त्यांच्या आतमध्ये कोणत्याही
अवैध्य हालचाली,शिकारी यांना प्रतिबंध अश्या तरतूदी केल्या.
३)त्यावेळीस वाघांची गणना केली असता देशात एकुण १८०० वाघ असल्याचं निदर्शनास आले म्हणुन तात्काळ 'व्याघ्रप्रकल्प,१९७३' ची घोषणा केली ज्यात सुंदरबन पासुन रणथंबोरपर्यंत ९ प्रकल्प उभारले गेले.
४)'वन संवर्धन कायदा,१९८०' अंतर्गत
जंगलातील व्यावसायिक क्रियविक्री प्रतिबंधीत केली.
५)'४२ वी घटनादुरुस्ती,१९७६' करून मार्गदर्शक तत्वांत 'कलम-४८अ' चा समावेश केला(पर्यावरण संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे).
इंदिराजींच्या मनात प्राण्यांबद्दल प्रेम उत्पन्न करणारी घटना वाचणात येते.तरूणपणी
त्या'Delhi Bird club' सदस्या होत्या.त्यांची पक्षांबद्दलची आत्मियता एवढी खास नव्हती पण जेव्हा त्यांच्या वडिलांनी डेहराडून मधुन(वडिल जेलमध्ये होते) त्यांना डॉ.सलीम अली यांचे 'The Book Of Indian Birds' वाचणासाठी पाठवले त्यानंतर त्यांचे वन्यजीवांबद्दलचे प्रेम वाढले. #म #मराठी #रिम
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
