अलीकडच्या काळात #आमचीमुंबई वर भयानक म्हणावेत असे हल्ले पहायला मिळतात.. त्यात भारत आणि जगासमोर मुंबई हे शहर कसं जगण्यालायक नाही हे दाखवण्याचा खटाटोप सुरुय.. त्यासाठी एकीकडे सुरवातीपासून लोकांच्या मनात मुंबई विषयी तिरस्कार निर्माण करायचा तर #म #धागा 👇
दुसरीकडे तिचं आर्थिक महत्व कमी करायचं हा कुटील डाव काही जणांनी मांडलाय.. ते कोण आहेत मराठीजन जाणतातच.
1 मे 1960.. आपल्या महाराष्ट्रातील शूर हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडून गुजरातपासून वेगळा मुंबई सह एक महाराष्ट्र अस्तित्वात आणला.. तेंव्हापासून गुजरातजणांसाठी मुंबई ही दुखरी नस. 👇
त्यावरती इलाज म्हणून नेहमीच मुंबईचं महत्व आर्थिक आणि सामाजिक आघाडीवर कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम गुजरातकर राबवतात.. त्यास आता कितीतरी दशके लोटली. त्यास भीक न घालणे ही महाराष्ट्राची कर्तबगारी.. तिस तडा जाताना हल्ली वारंवार दिसतो. तो तडा कोणामुळे गेला ते 2014 नंतरच्या घडामोडी 👇
पाहून कळू शकेल. काही महत्त्वाच्या घडामोडी खाली दिल्यात.
अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन कशासाठी हा प्रश्न नेहमी विचारून तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकार त्याचं यथोचित उत्तर मराठी जणांना देऊ शकलं नाही. उत्तर स्पष्ट होतं.. मुंबईचं महत्त्व कमी करणे.👇
गिफ्ट सिटी अर्थात गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी... 880 एकरावर एक प्रोजेक्ट आहे.. इंटरनॅशनल फायनान्स सेंटर ही मुंबईत होणारी नियोजित व्यवस्था ..गुजरातला गिफ्ट करण्यात आली. तिथं आता सव्वा लाख कोटी रुपयांची उलाढाल करणारा हा प्रोजेक्ट साकारतोय.. बँकिंग, फायनान्स, आयटी,हॉटेल्स, 👇
BPO, ट्रेडिंग असं सगळं जे जे आत्ता मुंबईसाठी महत्वाच आहे ते सगळं तिकडं जाईल.. देशाच्या एकूण करात 30 टक्के वाटा मुंबईचा असतो.. हा वाटा काही वर्षांनी बुलेट ट्रेनद्वारे नवीन गिफ्ट सिटीतून घ्यायचा यांचा विचार दिसतोय.
मध्यंतरी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवल्याची बातमी आली होती.. 👇
बाकी सांस्कृतिक बर्डनही महाराष्ट्रजण भोगत असतातच.. या सर्वास 'कुठे नेवून ठेवलाय माझा महाराष्ट्र' असं विचारणारे आज सामील आहेत का? हे सर्व मराठीजन जाणतातच.. त्याविषयी विस्तृत लिहण होईलच. 👇
तूर्तास यांना वरचेवर मुंबई असुरक्षित का वाटते हे न कळण्याइतपत महाराष्ट्र अज्ञान नक्कीच नाही.. सुज्ञ त्यांना नक्कीच पुरून उरतील याबाबत शंकाच नाही.❤
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
