Amit Shinde Profile picture
🚩एक बदनाम झंजावत 🚩

Sep 22, 2020, 9 tweets

कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती.प्रत्येक पुरुषाला खंभीर पणे साथ देण्यासाठी एक स्त्री असते त्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे भाऊराव यांच्या पत्नी लक्ष्मीबाई.कर्मवीर भाउराव पाटलांनी लावलेलं रोपटे मोठ करण्याच्या जडण घडणीत त्यांच्या पत्नी लक्ष्मी बाई यांचा मोलाचा वाटा आहे.
#म
#मराठी

पण पडद्यामागच्या कलाकार कधीच प्रकाश झोतात येत नसतो.म्हणून लक्ष्मीबाई यांच्याबद्दल एक प्रसंग.
एका स्त्री ची इच्चाशक्ती किती प्रचंड असते ते सिद्ध होते....
@ChakankarSpeaks @VrushaliGYadav @AmteSheetal @TanpureSonali

सन १९३० च्या मकर संक्रातीच्या सणाच्या वेळी वसतिगृहात फारच बिकट परिस्थ्िाती निर्माण झाली. वसतिगृहातील सर्व धान्य संपले होते. पैसाही शिल्लक नव्हता. पूर्वीची उधारी राहिल्यामुळे व्यापारी उधार धान्य देण्यास तयार नव्हता. भाऊराव देणग्या जमा करण्यासाठी बाहेरगावी गेले होते.

वसतिगृहातील सेक्रेटरीने लक्ष्मीबाईना ही हकिगत सांगितली . अशा वेळी काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. आतापर्यंत वसतिगृहाच्या अडीअडचणीला लक्ष्मीबाईच्या अंगावरील जवळपास ६० तोळ्यांचे सोन्याचे दागिने विकले गेले हाते. आता विकण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते
#मराठी

त्याच वेळी त्यांचे लक्ष गळ्यातील मंगळसूत्राकडे गेले . क्षणभर मनाची घालमेल झाली . लगेच आपल्या सौभाग्याचे लेणें असलेले मंगळसूत्र काढून त्याला ते गहाण ठेवुन पैसे आणण्यास सांगितले अशा प्रकारे वसतिगृहातील मुलांची खाण्यापिण्याची अडचण त्यांनी दुर केली
#मराठी
#सातारा

ते गहाण ठेवलेले मंगळसूत्र नंतर सोडविता न आल्यामुळे विकून टाकावे लागले.
लक्ष्मीबाईनी रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत तनमनधन अर्पण केले. म्हणून त्यांच्या परिसस्पर्शाने रयत शिक्षण संस्थेचे सोने झाले.
#कर्मवीर_भाऊराव_पाटील
#कर्मवीरभाऊरावपाटील

इ स.१९३० साली लक्ष्मीबाईचे निधन झाले पण त्यांनी मरणोत्तर आपली व्यक्त केलेली इच्छा ती म्हणजे बोर्डींगमध्ये सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश असावा व दुसऱ्या दिवशी पाडव्याचे जेवण सर्वांनी घ्यावे .
#कर्मवीर_भाऊराव_पाटील
#कर्मवीरभाऊरावपाटील

लक्ष्मीबाईंचा आदर्श व कृती ही भारतीय स्त्रिायांना आजही प्रेरणा देणारी घटना आहे
सन १९४८ मध्ये एका समारंभात भाऊराव म्हणाले होते. ‘मी सर्वाच ऋण फेडीत आलो परंतु माझ्या पत्नीचे ऋण मला आजतागायत फेडीत आलेले नाही.
#कर्मवीरभाऊरावपाटील
#कर्मवीर_भाऊराव_पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन __/\__
#कर्मवीरभाऊरावपाटील
#कर्मवीर_भाऊराव_पाटील

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling