संदीप काळे sandeep kale Profile picture
#संगणकशास्त्र निष्णात #समाजकारण #मानवतावादी #निसर्गप्रेमी #मराठीला_प्राधान्य #शिवभक्त

Sep 26, 2020, 9 tweets

संयुक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेष करून पर्जन्य छायेच्या प्रदेशातून बरेचसे होतकरू आणि कष्टाळू तरुण पुण्य मुंबईत येऊन चमकू शकतील. पण त्यासाठी त्यांना आपलासा वाटणारा आधार मिळाला पाहिजे.यासाठी सर्व स्तरातील सर्व प्रकारच्या लोकांनी प्रयत्न करावे लागतील. असे संघटन हवे जे

सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते मिळून चालवू शकतील. उदा. गावातील होतकरू मुलांची माहिती स्थानिकांना असते. ते आपल्या पक्ष संघटनेतील पुणे मुंबई मधील नेते मंडळींना संपर्क करून शिफारस करू शकतील. मुलांशी आणि कुटूंबाशी संवाद साधून नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी समजावून सांगतील आणि मुलाची

तपासणी करू शकतील. तसेच शहरात आल्यावर आपल्या मुलाची राहण्याची, जेवणाची, उत्पनाची सोय होईल आणि तो सुरक्षित राहील असं विश्वास द्यावा लागेल.समजा एखाद्या परिसरात एखादा व्यवसाय चालू शकतो हे स्थानिक सांगू शकतील. उदा. एखाद्या परिसरात दुध, भाजी, किराणा, शालेय साहित्य यांचे दुकान चालेल अशी

माहिती गोळा करायची. हि माहिती ठराविक सदस्यकडे एक्सेल मध्ये असावी.कालांतराने त्यासाठी संकेतस्थळ बनवता येईल. हैवासाठी वेळ लागू शकतो पण आपण वाट पाहण्यापेक्षा हे काम सुरु केले पाहिजे. सध्या अगदी फिरती हातगाडीपासून, घरपोच सेवा अशा कित्येक प्रकारच्या व्यवसायात संधी आहेत(कोरोना

जाईपर्यंतच). त्यानुसार गुंतवणूकदारांना(भांडवल/जागा असणारे) माहिती द्यायची. त्यांना गावातून येऊ इच्छुक असणाऱ्या तरुणांना जोडून द्यायचे. शिवाय त्या व्यवसायाला लागणारी माहिती उदा. कच्चा माल, जाहिरात, धोके काय आहेत, कायदेशीर मार्गदर्शन, पालिका, पोलीस कर्मचाऱयांकडून सहकार्य तसेच

वस्तू सहज आणि स्वस्त दरात(उदा. मुंबईतील बाजारात कोणत्या ठोक विक्रेत्याकडे)कुठे मिळतील हि माहिती समितीच्या सदस्यांना ठेवता येईल. तसेच स्थानिकांनी सुद्धा प्राधान्याने अशा व्यावसायिकाकडून खरेदी करावी. ह्यातून मराठी लोक आणि कुटुंब स्थिर होऊ शकतील. शिवाय आपल्या शहराच्या आर्थिक नाड्या

आपल्याच लोकांच्या हातात राहतील. काही जणांनी अशी समिती सुरु करायला उत्साह दाखवलाय तो टिकून राहावा. आणि मी ह्यसाठी योगदान देईनच पण माझ्या मर्यादा मला माहित आहेत. ह्या कामासाठी विशेष प्रभावी लोकांची गरज आहे. सगळ्यांना एका धाग्यात गुंफले पाहिजे. उल्लेख केल्या लोकांकडून खास अपेक्षा

आहेत. नाम, निर्मिती अशा संस्था पुढे आल्यास हे कठीण काम लीलया पूर्ण होईल. #म #मराठी @GajananKaleMNS @vasantmore88 @mnsadhikrut @AUThackeray @RRPSpeaks @TUSHARKHARE14 @prash_dhumal @MaheshZagade07 @Tukaram_IndIAS @anil010374 @anilshidore

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling