🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Sep 29, 2020, 10 tweets

आत्ताच अधिवेशन संपुष्टात आलं..#CAG(comptroller and Auditor General of India) ने सरकारचा लेखाजोखा मांडला..त्यामध्ये त्यांनी 'स्वच्छ विद्यालय अभियान' अंतर्गत जे शौचालय बांधण्यात आले त्यासाठी सरकारच्या कामावर ताशेरे ओढले असुन कामावर नापसंती दर्शविली आहे.
#म #रिम #स्वच्छ_भारत_अभियान

सुरूवातीला आपण CAG म्हणजे काय जाणुन घेऊ:-
राज्यघटनेतील कलम 148 ते 151 मध्ये कॅगबद्दल माहिती दिली आहे..आपण सामान्य जनता जो कर भरतो तो सरकारचा महसुल असुन सरकार ते पैसे कोठे,कसे आणि किती वापरते ह्या सर्वाची तपशीलवार माहिती कॅग आपल्याकडे ठेवते आणि अधिवेशन आले की सभागृहाला माहिती देते

या अधिवेशनात कॅगने मांडलेला रिपोर्ट आपल्याला सगळी खरी परिस्थिती दाखवुन देतयं.2014 ला जी 'स्वच्छ भारत अभियान' योजना चालु झाली त्यात शाळांमध्ये ही शौचालय बांधण्याबद्दल निर्देश देण्यात आले होते..सरकारने देशाला वेगळीच माहिती दिली आणि कॅगने पाहणी केल्यावर वेगळीच माहिती पुढे आली🙏

प्रथमता तुम्हाला सांगु इच्छितो की, शौचालय बांधण्याचे कंत्राट सरकारने CPSE(central Public Sector enterprises) ज्या की सरकारच्या मालकीच्या आहेत त्यांना दिले होते कारण या कंपन्या एव्हढा नफा कमवतात तर त्या समाजाचं देण लागतात या हिशोबाने त्यांना शौचालय बांधण्यास सांगितले गेले🙏🙏😄

सरकारच्या सांगण्यानुसार 53 सरकारी कंपन्यांनी एकुण 1,40,997 शौचालय बांधली त्यातील कॅगने 15 राज्यामधील 2326 शौचालयांचा सर्वे केला..आपणास वाटेल की किती छोटा सर्वे आहे.परंतु तुम्हाला माहितच असेल 'शितावरून भाताची परिक्षा'..2326 शौचालयांचा सर्वे करूनच कॅगने समजायच ते समजुन घेतल😜😅😉..

2326 मधील 691 शौचालय तर वापरातच नाहीत कारण:-
1)पाण्याचा अभाव
2)स्वच्छतेचा अभाव
3)शौचालयांची दयनीय अवस्था
4)दुसर्याच कामासाठी वापर केला जातो
5)काही ठिकाणी शौचालयच बंद ठेवलेत इ.

*2326 मधील 1279(55%) शौचालयात तर हात धुण्याची व्यवस्थाच नव्हती.
83 शौचालय स्वता CPSE ने बांधले नाहीत..

महाशयांनी 200 शौचालय तर ज्या शाळेमध्ये बांधायला हवे होते त्यात न बांधता तिसरीकडेच बांधलेत..
सर्वोच्च न्यायालयाने 2009 साली 'Right of children to Free and Compulsory Education (RTE) Act' अंतर्गत सांगितले की शाळेतल्या मुलांना व मुलींना वेगवेगळ्या शौचालयाची तरतुद केलीच पाहिजे...

त्याप्रमाणे कॅगने सर्वे केला असता,
1967 शाळांमधल्या(जिथे मुल-मुली एकत्र शिकतात) 535 शाळांमध्ये मुलांना आणि मुलींना वेगळे शौचालय अस्तित्वात नसुन 99 शाळांमध्ये तर शौचालयच अस्तित्वात नाही.😵😱
म्हणजे 'सर लघवीला जाऊन येऊ का??' अस मुलांनी कुणाच्या भरोश्यावर विचारायच🤦🏻‍♂️
@CovidWarriorM5

मला सांगायच आहे की, ह्या सगळ्यामध्ये सरकार आणि कंपन्या जबाबदार असले तरी संपूर्णपणे त्यांना दोष देण्यात अर्थ नाही..एखादं सरकारी काम कागदोपत्री पुर्ण झालय अस दाखवुन परत त्याठिकाणी आपण ते झालेल काम पाहायला गेलो तर तिथे काहीच अस्तित्वात नसतय हा सर्वांना आलेला अनुभव आहे..@Digvijay_004

उदाहरणार्थ, शौचालयांच्या स्वच्छतेचा मुद्दा पाहिला तर स्वच्छता राखणार्या authorities आहेत त्यांनी नेमुन दिलेलं काम चोख पार पाडावं..सर्वांनी मिळुन केल्याशिवाय देश पुढे जाणार नाही🙏🙏
#म #मराठी
@anil010374 @prash_dhumal @Kapil_Zoting @PomaneSpeaks @gpekmaratha @ImLB17 @sub_naikade

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling