Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture
Sanatan Dharmiya🚩| Unapologetic Hindu🚩| यजुर्वेदीय ।।भारत का रहने वाला हूं भारत की बात सुनाता हूं।।

May 26, 2021, 29 tweets

#Thread
#SavarkarJayanti
#सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग १) :-
इसवी सन १८५७ पासून ते भारताने स्वातंत्र्य मिळवेपर्यंत अनेक थोर क्रांतिकारांनी स्वातंत्र्याच्या समरकुंडात आपल्या प्राणांच्या आहुत्या देऊन, आपल्या 'स्वातंत्र्यलक्ष्मीचे' आराधन केले.
१/

त्याच मांदियाळीतील अतीदिव्य तारा म्हणजे स्वा.सावरकर.
बालपणीच आपल्या कुलदेवतेसमोर "सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.!" या घेतलेल्या शपथीचं निर्वहन तात्यांनी शरीरास आत्यंतिक कष्ट सोसवून केलं. बऱ्याच प्रसंगी अशी वेळ येई की वाटे आता प्राणदोर तुटतो की काय.!
२/

पण मनात सतत आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच ध्येय त्यांना परत आपल्या कर्मात अग्रेसर करी.
अशा या स्वातंत्र्यवीराची बदनामी करण्याचे कारस्थान केवळ आपल्या काही ऐहिक सुखासाठी काही लोक करत आहेत. कारण काय सांगतात तर सावरकरांनी अंदमान मध्ये असताना माफीनामे लिहिले होते म्हणून ते काही
३/

काही शूर वैगरे नाहीत ते माफीवीर आहेत. ह्याविषयी उत्तर देण्याचा प्रयत्न दोन थ्रेडच्याद्वारे करणार आहे.
१९११ साली सावरकरांना जी आतापर्यंत कोणाही कैद्यास झाली नव्हती अशी सलग दोन जन्मठेपींची अर्थात ५० वर्षे कारावासाची शिक्षा झाली आणि त्यांची रवानगी काळ्या पाण्यास म्हणजेच अंदमानात
४/

करण्यात आली. अंदमान म्हणजे साक्षात नरक यातनेचा 'रौरव नरकच' होता. त्यावेळी 'बारी' नावाचा अधिकारी तिथे बंदिपालक अर्थात जेलर होता. बारी क्रुर आणि निर्दयीपणाचे मूर्तीमंत प्रतीक. त्यावेळी अंदमानात राजकीय कैदी (सावरकरांसारखे) आणि इतर गुन्ह्यांत अटक झालेले कैदी असे बंदिवान होते.
५/

तात्याराव ज्यावेळी तिथे गेले त्यावेळी त्यांचे मोठे बंधू बाबाराव ही तिथेच बंदी होते.
त्यावेळी अंदमानात कैद्यांना अत्यंत अमानुष अशी वागणूक दिली जाई. त्याच विस्तृत वर्णन सावरकरांनी माझी जन्मठेप ह्या पुस्तकात केलेले आहे. उदाहरणासाठी जर सांगायचं झालं तर कैद्यांना तिथे काथ्या कुटून
६/

त्याची दोरी बनवण्याचे अत्यंत अवघड काम ज्यात बोट सोलून निघून रक्त निघे, तसेच कोलू फिरवून खोबऱ्याचे तेल काढण्याचे अत्यंत कष्टदायक काम देण्यात येई. ज्यात तो नुसता कोलु पाहून अनेक लोकांना घेरी येई. असे काम सकाळी उठून रात्री झोपेतो अखंड करावे लागे. केवळ काही काळासाठी जेवणासाठी
७/

विश्रांती देण्यात येई. काम पूर्ण नाही झाले की बेड्या ठोकून उभे राहणे, वेत खाणे अशा अनेक शिक्षांना सामोरे जावे लागे. त्यात परत ही कामे कैद्याची कुवत बघुन न देता सर्रास कोणालाही देण्यात येत होती. राजबंद्याना तर जास्त कडक शिस्त असे.
सावरकर त्यात विशेष कैदी होते त्यांना
८/

सगळ्यांपेक्षा वेगळे ठेवण्यात आले होते. कोणासही भेटू देण्यात येत नव्हते आणि कष्ट तर चालूच होते. अशात त्यांनी अथक परिश्रम करून वेगवेगळया प्रयत्नांनी सर्व कैद्यांना एकत्र केले तिथे एक मंडळ तयार केले.जशी जशी ह्यांची एकी आणि ताकद वाढू लागली तसा तसा जाच कमी होऊन सुधारणा होऊ लागल्या.
९/

हे १९११-१९ ह्या अंदमानातील काळाच अगदीच संक्षिप्त वर्णन आहे. आपण विस्तृत वर्णन वरील पुस्तकात अवश्य वाचावे.
ह्याच काळात सावरकरांनी सरकारला विविध अर्ज केले. ते वर्ष होतं १९१४ चं जगात पहिलं महायुद्ध उसळलं होत. इंग्लंड विरुद्ध जर्मनी अशी लढाई झाली होती. पूर्ण जगाची व्यवस्था अस्थिर
१०/

झाली होती आणि हीच संधी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. त्यामुळे कुठल्याही खोट्या आश्वासनांवर का होईना आपण सगळ्यांची सुटका करून घेतली पाहिजे. हे हेरून तात्यांनी सरकारला अर्ज केला की "अशा युद्धप्रसंगी सरकारने राजबंद्याना मुक्त करावे जेणे करून सरकारला युद्धास
११/

पाठिंबा मिळेल. तसेच भारतीयांमध्ये सरकारचा विश्वास द्विगुणित व्हायला मदत मिळेल.त्यासाठी मी स्वतः ह्या युद्धात सरकारकडून लढण्याची हमी देतो." यात शेवटचा परिच्छेद महत्त्वाचा आहे ज्यात ते म्हणतात की "जर तुम्हाला वाटत असेल की मी हे फक्त माझ्या सुटकेसाठी करत आहे तर सरकारने खुशाल मला
१२/

फक्त बंदी ठेवावे बाकी लोकांना जाऊ द्यावे." आता सांगा कोण कुठे माफी मागतोय.?
सावरकरांचं जे म्हणणं होत तेच त्यावेळी काँग्रेसच म्हणणं होत मग यात कसली चुकीची गोष्ट आहे. उलट ते म्हणत आहेत त्यांना बंदीच ठेवा आणि बाकींना जाऊ द्या. युद्धात लढण्याचे आश्वासन वैगरे त्या शत्रूस खेळवत
१३/

ठेवण्याच्या गोष्टी आहेत. शत्रूस असे खोटी आश्वासने द्यायचीच असतात ही आम्हाला महाराजांची शिकवण आहे. तिचेच पालन इथे तात्यांनी केले. एवढं सांगून पण सुटका झालीच नाही.
त्यानंतरचा अर्ज आहे ऑक्टोबर १९१७ चा ज्यावेळी इंग्लंडचा युद्धात विजय होण्याची चिन्हे दिसू लागली.अशात सरकार भारतात
१४/

नवीन कार्यक्रम राबवणार ही बाब तात्यांना लक्षात आली ते विचारात घेऊन त्यांनी हा अर्ज केला आहे. त्यात विशेषतः ते सांगत आहेत की "जर भारताच्या कल्याणार्थ सरकारला काही योजना आखायाच्या असतील तर त्या सर्वांना समान लक्षात घेऊन व्हायला हव्यात.अशावेळी राजकीय कैद्यांचा विचार व्हायला हवा.
१५/

जगातील कुठल्याही देशात राजबंद्यांना कारावासात ठेवत नाहीयेत. तुम्ही आयर्लंड बाबतीत काय धोरण ठेवले आहे ते बघा. भारतात पण सर्व राजबंद्यांना तशीच वागणूक भेटायलाच हवी" आणि शेवटी परत तेच म्हणणे की "मला सोडता येत नसेल चालेल पण बाकी लोकांना सोडा." ह्याच उत्तर पण नकारात्मकचं आलं.
१६/

ह्यात उत्तराखातर जे पत्र आलं त्याच्यात सरळ सरळ उल्लेख आहे की सर्वांना सुटका देण्याबाबत जो अर्ज आला होता तो अग्राह्य आहे. कुठेही फक्त 'सावरकरांची सुटका' असा उल्लेख नाही ये. तरीही माफीवीर कोण सावरकर का?
त्यानंतरचा आणि शेवटचा अर्ज आहे मार्च १९२० चा. इंग्लंडचा विजय झाला आणि देशात
१७/

नवे कायदे झाले. त्याचप्रमाणे वेळोवेळी आपल्या बंधूस पत्राद्वारे इथली जाचक परिस्थिती व कैद्यांचे हाल सावरकर कळवत होते त्याद्वारे ते संपूर्ण देशात कळाले व त्याविषयी रोष निर्माण होऊ लागला. विविध नेते मंडळी ह्याविषयी सरकारला प्रश्न विचारू लागले तसेच अनेक लोकांनी केलेल्या सह्यांचे
१८/

अर्ज सरकारकडे जाऊ लागले. ह्याचा संमिश्र परिणाम असा झाला की अंदमानातील राजकैद्यांना सोडण्याचा आदेश निघाला ज्यात अर्थातच सावरकर बंधूंची नावं नव्हती.म्हणून तात्यांनी अर्ज केला की "त्यांच्यानंतर आलेली लोकसुद्धा नवीन आदेशात सोडली गेलेली आहेत जे आमच्यापेक्षा गंभीर गुन्ह्यात आत
१९/

होते. तसेच आम्ही बंधूंनी जवळ जवळ १० वर्षे शिक्षा सर्व बंधने पाळून भोगली आहे. याउपरही सरकार सांगेल ती आंशिक बंधने आम्ही पाळून बाहेर राहू. पण आम्हाला सोडण्यात यावे." हे असं सांगण्याच मुख्य कारण होत की दोघांची तब्येत खालवत चाललेली होती. तसेच बाबारावांचा क्षय वाढत होता. बाहेर
२०/

काही अंशी जास्त सेवा भारतभूची करता येईल या गोष्टी लक्षात घेऊन हा अर्ज होता. पण परत अपयश आले आणि अर्ज अग्राह्य झाला.
बऱ्याच जणांना वर दिलेल्या अर्जाच्या भाषेविषयी वाटत असेल की ह्यात 'Your Honour', 'I beg', 'I request' असे शब्द आले ज्यात सावरकर माफी मागत आहेत असे दिसत आहे
२१/

तर त्यांना हे माहिती पाहिजे की ही सरकारी पद्धत(प्रोटोकॉल) असते तसे लिहिण्याची. खाली गांधीजींचे एक पत्र देत आहे त्यात असे शब्द आपल्याला आढळतात म्हणून काही गांधीजी इंग्रजाचे गुलाम होतात का.!
सावरकर बंधूंना सोडले नाही ही गोष्ट जेंव्हा गांधीजींना कळाली तेंव्हा ते सुद्धा हळहळले व
२२/

त्यांनी 'यंग इंडियामध्ये' लवकरात लवकर सावरकर बंधूंची सुटका व्हावी या आशयाचा लेख लिहिला. एवढं होऊन पण सरकार बधलं नाही आणि शेवटी ज्यावेळी अंदमान वसाहत काही काळा पुरती बंद करायची हा निर्णय झाला, त्यावेळी सावरकर बंधूंची सुटका झाली ते वर्ष होत १९२१.पण सुटका कसली तिथून त्यांना काही
२३/

रत्नागिरीत तर काही काळ येरवड्यात तुरुंगातच ठेवण्यात आलं व १९२४ साली स्थानबद्धतेच्या निर्बंधात रत्नागिरीस धाडण्यात आले. तिथे त्यांनी १९३७ पर्यंतचा काळ हा स्थानबद्धतेत काढला व शेवटी नाईलाज होऊन सरकारला त्यांना मुक्त करावे लागले.
अशा ह्या स्वातंत्र्य योद्धयाने आपल्या
२४/

जीवनाचा अधिकसा काळ अत्यंत कष्टमय जाचातं काढला. यानंतर ही सावरकर अखंड १९६६ पर्यंत लढतचं राहिले जे की पुढील थ्रेडमध्ये येईलच. ह्या सगळ्याचा उद्देश एकच होता आपल्या 'मातृभूमीचे स्वातंत्र्य' ज्याद्वारे सकळ भारतीयांचे कल्याण साधता येईल.
२५/

तेंव्हा या थोर पुरुषाचा अपप्रचार करण्याचा कट लोकांनी थांबवावा..!! आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात अनेक प्रकारचा त्रास सहन करावाच लागेल हे सावरकर जाणून होते आणि सर्व लक्षात घेऊनच त्यांनी लढ्यात सहभाग घेतला म्हणून ते म्हणतं,
२६/

की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास-निसर्ग-माने।
जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचे
बुद्धयाचि वाण धरिले करि हे सतीचे।।
धन्यवाद..!
@ShefVaidya @AparBharat @authorAneesh @smitprabhu

संदर्भ:-
१) माझी जन्मठेप - स्वा सावरकर
२) माझ्या आठवणी - स्वा सावरकर
३) Echoes from Andamans - Veer Savarkar
४) सावरकर चरित्र - शी ल करंदीकर
५) Savarkar and His Times - Dhananjay Keer
६) Struggle for Freedom - R C Majumdar
७) Swarajya,OpIndia and StandPointIndia's Articles

८) इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांचा ब्लॉग.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling