Satchidanand Shevde Profile picture
Orator, Author, Preacher, Column writer. RT don't necessarily mean endorsement

May 31, 2021, 5 tweets

#साठवणीतील_आठवण
चार वर्षांपूर्वी सिडने,ऑस्ट्रेलिया येथील विश्व सावरकर संमेलन संपल्यावर न्यूझीलंडला आलो. रोटोरुआत मुक्काम केल्यावर ऍग्रोडोमच्या फार्म शो मध्ये नाना जातीच्या मेंढ्या व लोकर भादरणे पाहून रेनबो स्प्रिंग हे देखणे पक्षी आवास पाहून पुढे हॉबिटनकडे निघालो.

विश्वामित्राची प्रतिसृष्टी कशी असेल,याची झलक हॉबीटन मुव्ही सेट पाहून मिळाली.ज्यांनी 'लॉर्ड ऑफ़ द रिंग्स' आणि 'द हॉबिट' (तीन भाग) चित्रपट पाहिले असतील त्यांना सेटची कल्पना येईल.१२५० एकरच्या हिरव्याकंच कुरण टेकड्यांवर हा सेट पसरला आहे.होबिट्सची छोटी घरे, खऱ्या खोट्या भाज्या,

लाकडाचे सरपण, वाळत घातलेले छोटे कपडे, छोट्या चिमण्यातून निघणारा धूर, एका टेकड़ीवर उभा असलेला कृत्रिम वृक्ष आदी गोष्टी तोंडात बोट घालायला लावणाऱ्या होत्या. केवळ तीन सेकंदाच्या दृश्यासाठी सफरचंदाच्या झाडाची पाने तोडून तिथे बहुधा मेपलची हुबेहुब पण खोटी पाने डकवून शॉट घेणाऱ्या

दिग्दर्शकाला दाद द्यावी असे वाटले. अर्थात अनेक हॉबिट घरे ही बाहेरुन मस्त वाटली तरी आत जागा मुळीच नसल्याने अंतर्गत शूटिंग हे स्टुडिओत झाले. घरे, शेत, क़ुरणे, पाणचक्की छोटी घोड़ागाड़ी आदी सर्व प्रकार तिथे होते. सेट कायम ठेवून तो प्रदर्शनीय बनवणे ही कल्पना उत्तम वाटली. दोन तास

मन्त्रमुग्ध होवून त्या प्रतिसृष्टीत फिरल्यावर दमलेल्या पर्यटकांना फुकट म्हणजे तिकीट शुल्कात चहा, कॉफी, थंड पेय आणि बियर ही सोय होतीच....!
#म #मराठी #देशाटन #न्यूझीलंड

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling