PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Jul 6, 2021, 13 tweets

देशातील #Coronavirus 🦠 परिस्थितीवर 📺 मीडिया ब्रीफिंग

National Media Centre नवी दिल्ली येथे

⏰ : 4:00 PM

#Unite2FightCorona
लाइव पाहा @PIB_India च्या युट्यूब चॅनेल वर

#COVID19 वर मात करण्यासाठी केलेली कामगिरी, सज्जता आणि त्याविषयीची अन्य ताजी माहिती देण्यासाठी, प्रसारमाध्यमांशी साधल्या जात असलेल्या संवादाचे थेट प्रक्षेपण पाहा-



@airnews_arngbad
@airnews_nagpur
@airnews_pune

#2ndWave मधील, दररोजची नवीन रुग्णसंख्या सातत्याने घटत चालली आहे.

गेल्या 24 तासांत फक्त 34,703 नवीन रुग्णांची नोंद झाली.

नवीन रुग्णसंख्या 50,000 पेक्षा कमी असण्याचा हा सलग नववा दिवस आहे.

: संयुक्त सचिव, @MoHFW_INDIA

#Unite2FightCorona

दैनंदिन रुग्णसंख्या शंभरपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. 4 मे 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ती संख्या 531 होती, 4 जून रोजी 262 तर त्या नंतरच्या महिन्याभरात त्या जिल्ह्यांची संख्या 91 इतकी झाली.

-: संयुक्त सचिव, @MoHFW_INDIA

#IndiaFightsCorona

भारतात 80% नवीन रुग्ण 90 जिल्ह्यांमध्ये नोंदले जात आहेत.

याचा अर्थ असा की, आता संसर्ग स्थानिक पातळीवर मर्यादित भौगोलिक क्षेत्रापुरता वाढत असून, त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज उत्पन्न झाली आहे.

#Maharashtra मध्ये असे 15 जिल्हे आहेत.
-: @MoHFW_INDIA

देशात आता #COVID19 ची उपचाराधीन रुग्णसंख्या 5 लाखांपेक्षा कमी गेल्या 24 तासांतील उपचाराधीन रुग्णसंख्या 4.64 लाख

देशाचा कोरोनामुक्तीचा दर आता 97.2% पर्यंत पोहोचला

गेल्या काही महिन्यांपासून, दैनंदिन कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक-:@MoHFW_INDIA

पॉझिटिव्हिटी दर 21.3% पर्यंत चढला होता (24-30 मार्च 2021) तेव्हा दररोज सरासरी 10.5 लाख चाचण्या केल्या जात होत्या

आता पॉझिटिव्हिटी दर 2.7% पर्यंत असूनही चाचण्यांचे प्रमाण तेवढेच आहे,(गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 18.3 लाख) जेणेकरून कोरोना रुग्णांचे लवकर निदान व्हावे -@MoHFW_INDIA

29 जून ते 5 जुलै या आठवड्यात भारतातील 73 जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर 10% पेक्षा अधिक

या जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी, क्षेत्रबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे

#Maharashtra मध्ये अशा एका जिल्ह्याचा समावेश

-: संयुक्त सचिव, @MoHFW_INDIA

#IndiaFightsCorona

#COVID19 #vaccination
कोविड प्रतिबंधक लसीकरण-

आजपर्यंत 35.75 कोटी मात्रा टोचल्या गेल्या, त्यापैकी 29.12 कोटी मात्रा या पहिल्या मात्रा आहेत.

18-44 वर्षे वयोगटातील लोकांना लसीच्या 10.58 कोटी मात्रा टोचण्यात आल्या आहेत.

-: संयुक्त सचिव, @MoHFW_INDIA

दुसऱ्या मात्रेची आकडेवारी

आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 79.7%
आघाडीवरील योद्ध्यांपैकी 89.4%
45 वर्षांवरील वयोगटात 56.8%

भारतात इतर देशांनंतर एक महिन्याने लसीकरण मोहीम सुरू होऊनही, टोचण्यात आलेल्या मात्रांची प्रत्यक्ष संख्या, अमेरिकेतील संख्येपेक्षा जास्त-@MoHFW_INDIA

#2ndWave ओसरताना निर्बंध शिथिल होत गेल्यावर, #COVID समुचित वर्तनाच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे प्रसारमाध्यमांतील वृत्यांवरून दिसते.

विषाणू अद्यापि अस्तित्वात असून नियमांचे व्यवस्थित पालन न केल्यास विषाणूला आणखी एक संधी मिळण्याचा धोका आहे.
-: @MoHFW_INDIA

सध्या आपण दर दशलक्ष लोकसंख्येमागे 1400 चाचण्या करत आहोत. @WHO च्या शिफारशीच्या हे 10 पट आहे

#2ndWave च्या वेळी आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडून होत असलेल्या बहुतांश उपाययोजनांसाठी, पॉझिटिव्हिटी दर हाच पाया म्हणून वापरल्याने ही लाट वेगाने परतवण्यास मदत झाली
-: DG, @ICMRDELHI

#COVID समुचित वर्तनासाठी समाजाला बरोबर घेऊन काम करणे आवश्यक आहे. प्राधान्य गटांमध्ये आणि ठराविक जिल्ह्यांमध्ये #vaccination शी संबंधित सत्वर उपाययोजना सुरूच ठेवल्या पाहिजेत. येथून पुढेही सावधगिरी बाळगत राहणे अत्यावश्यक आहे.

-महासंचालक, @ICMRDELHI

@COVIDNewsByMIB

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling