.@SecyDIPAM आणि सचिव, @MoCA_GoI संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करतील
🗓️ आज, 8 ऑक्टोबर 2021
⏲️ संध्याकाळी 4 वाजता
📍नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली
लाइव्ह अपडेट इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये पहा @PIBMumbai वर 🧵
@FinMinIndia @Pib_MoCA
@HardeepSPuri
🎥
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी #Budget2021 च्या भाषणात 2021-22 या आर्थिक वर्षात एयर इंडियाचे संपूर्ण निर्गुंतवणुकीकरण करण्याची घोषणा केली होती
- @SecyDIPAM
🎥
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने एयर इंडियाशी संबंधित विशिष्ट पर्यायी यंत्रणा स्थापन केली होती जिने या राष्ट्रीय हवाई कंपनीच्या यशस्वी बोलीदाराची निवड केली आहे.
- सचिव, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग
@SecyDIPAM
🎥
एयर इंडियाशी संबंधित विशिष्ट पर्यायी यंत्रणेमध्ये गृहमंत्री, अर्थमंत्री, वाणीज्य आणि उद्योगमंत्री आणि नागरी हवाई वाहतूकमंत्र्याचा समावेश आहे
- @SecyDIPAM
@SecyDIPAM यांच्याकडून @airindiain ची जुलै 2017 मध्ये सुरु झालेल्या निर्गुंतवणूक प्रक्रियेची माहिती
➡️पहिल्या बोलीसाठी कोणालाही स्वारस्य नाही
➡️दुसऱ्या फेरीसाठी 7 बोलीदार, पाच जण अपात्र ठरले
➡️15 सप्टेंबर 2021 रोजी दोन पात्र बोलीदारांकडून आर्थिक बोली प्राप्त झाल्या
.@airindiain निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी बहुस्तरीय निर्णय प्रक्रियेचा अंगिकार करण्यात आला आहे, यात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एयर इंडियाशी संबंधित विशिष्ट पर्यायी यंत्रणा समाविष्ट आहे.
- @SecyDIPAM
प्रक्रिया पारदर्शक, स्पर्धात्मक आणि व्यावसायिक मार्गदर्शनाच्या पाठबळाद्वारे राबवली
- @SecyDIPAM
#Covid_19 च्या पार्श्वभूमीवर ईओआय सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.
बोलीच्या प्रक्रियेत इक्विटी बेसिस ते एंटरप्राईझ मूल्य अशी सुधारणा करण्यात आली.
- @SecyDIPAM
विशिष्ट विद्यमान आणि पूर्वाश्रमीचे दायित्व यांची विद्यमान आणि पूर्वाश्रमीच्या मालमत्तेशी सांगड घालण्यात येईल
यापैकी जे अतिरिक्त असेल ते एयर इंडिया ऍसेट होल्डिंग कंपनी या भारत सरकारच्या एसपीव्हीकडे दिले जाईल ज्याकडे काही मालमत्ता आणि दायित्व हस्तांतरित केले जात आहे
- @SecyDIPAM
निवृत्त कर्मचाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल अशी @SecyDIPAM यांची माहिती
बोलीदारांनी आता इक्विटी आणि डेब्ट यांच्या एकूण निर्धारणावर कोटेड एन्टरप्राईझ व्हॅल्यूच्या 15% इतक्या किमान रोख रकमेइतकी आणि कोटेड इव्हीच्या कमाल रिटेन्ड डेब्ट 85% असेल इतकी बोली लावावी
निर्गंतुवणुकीसाठी आरएफपी प्रक्रियेच्या टप्प्यांची @SecyDIPAMकडून माहिती
15 सप्टेंबर 2021 रोजी फायनल ऍग्रीड फॉर्म शेअर पर्चेस ऍग्रीमेंट सादर करणे म्हणजे बोली सादर केल्यानंतर अटी आणि शर्तींबाबत कोणत्याही वाटाघाटी नाही,बोलीदारांनी अटी आणि शर्तींवर बोलीला यापूर्वीच मान्यता दिली होती
एयर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी बोलींच्या तांत्रिक पात्रतेची खातरजमा केल्यावर आंतरमंत्रालयीन गटाने 29 सप्टेंबर 2021ला बोलीदारांच्या उपस्थितीत आर्थिक बोली खुल्या केल्या,या दोन्ही बोली राखीव किमतीपेक्षा बऱ्याच जास्त किमतीच्या होत्या, 4 ऑक्टो 21 रोजी एच1 बोलीला मान्यता देण्यात आली
टाटा सन्सची एसपीव्ही असलेली टॅलेस प्रा. लि. ही कंपनी एयर इंडियाची यशस्वी बोलीदार ठरली आहे, या बोलीचे मूल्य 18,000 कोटी रुपये असल्याची @SecyDIPAM ची घोषणा
@MoCA_GoI @HardeepSPuri
@airindiain @Pib_MoCA
भूमी आणि इमारती यांसारख्या रु. 14,718 कोटींच्या नॉन-कोअर मालमत्ता भारत सरकारच्या एआयएएचएल कडे हस्तांतरित करण्यात येत आहेत
- @SecyDIPAM
इरादा पत्र जारी करण्यात येईल, यशस्वी बोलीदारासोबत समभाग खरेदी करार करण्यात येईल
घालून दिलेल्या अटींची पूर्तता करण्यात येईल, लॉन्ग स्टॉप डेट फायनान्शियल स्टेटमेंट तयार करण्यात येतील आणि सहमती होईल
हा व्यवहार डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होईल
-@SecyDIPAM
एयर इंडियाला सातत्याने तोटा होत होता त्यामुळे एंटरप्राईझ व्हॅल्यू निर्धारित करणे महत्त्वाचे होते
- @SecyDIPAM
@FinMinIndia @MoCA_GoI
@Pib_MoCA
एयर इंडिया आणि एआयएक्सएलचे 31 मार्च 2021 पर्यंत एकूण कर्ज ₹ 46,239 कोटी
31 ऑगस्ट 21 पर्यंत एकूण कर्ज -₹ 61,562 कोटी
यशस्वी बोलीदारांकडे देण्यात येणारा कर्जाचा भार- ₹ 15,300 कोटी
उर्वरित कर्ज- रु 46,262 कोटी AIAHL कडे हस्तांतरित होईल.
- @SecyDIPAM
2009-10 पासून सरकारने ₹ 54,584 कोटी रोख पाठबळ म्हणून आणि ₹ 55,692 कोटी हमी पाठबळ म्हणून ठेवले आहेत. 2009-10 पासून एकूण सरकारी पाठबळ ₹ 1,10,276 कोटी.त्यामुळे एयर इंडियाला सातत्याने होत असलेल्या तोट्यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी हमीप्राप्त कर्जातून निधी दिला जात होता-@SecyDIPAM
एयर इंडिया ऍसेट होल्डिंग कंपनीकडील कर्ज रु. 46,262 कोटी
रु. 14,718 कोटी मूल्याच्या मालमत्तांचा ताबा एआयएएचएल घेणार
इक्विटी- रु. 2700 कोटी
अतिरिक्त मालमत्ता आणि दायित्वांच्या हस्तांतरणाचा विचार करता सरकारवरील निव्वळ भार रु. 44,679 कोटी असेल जो एआयएएचएलकडे जाईल
- @SecyDIPAM
#AirIndia ची निर्गुंतवणूक
यशस्वी बोलीदार सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवतील, पहिल्या वर्षात कोणत्याही कर्मचाऱ्याला कमी केले जाणार नाही.
दुसऱ्या वर्षात एखाद्या कर्मचाऱ्याला कमी करायचे असेल किंवा काढून टाकायचे असेल त्याला व्हीआरएस दिली जाईल
- @SecyDIPAM
कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी आणि प्रॉव्हिडंट फंडचे लाभ दिले जातील, निवृत्तीनंतर सरकारकडून वैद्यकीय लाभ दिले जातील
-@SecyDIPAM
एयर इंडिया ब्रँड अंतर्गत 8 लोगो आहेत. हे लोगो यशस्वी बोलीदाराकडे हस्तांतरित होतील, 5 वर्षांपर्यंत ते इतर कोणाकडेही हस्तांतरित करता येणार नाहीत.5 वर्षांनंतर लोगो हस्तांतरित करता येतील,मात्र केवळ भारतीय व्यक्तींनाच (कायदेशीर व्यक्ती)कोणत्याही परदेशी व्यक्ती किंवा संस्थेला नाही-सचिव
केंद्र सरकारने एअर इंडिया मधील निर्गुंतवणूकीला मंजुरी दिली
टाटा सन्सच्या एसपीव्ही- टॅलेस प्रा.लि. ने एअर इंडियासाठीची निविदा जिंकली
@FinMinIndia
📙pib.gov.in/PressReleasePa…
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.