Abhishek Somwanshi Profile picture
मराठी. संगणक अभियंता. पुणेरी! #महाराष्ट्रधर्म

Mar 6, 2022, 8 tweets

पुणे मेट्रोच्या एका टप्प्याचं आज उद्घाटन झालं. मेट्रो होतेय हे भारीच आहे. आनंदच आहे.. ❤️ पण ज्याचं उद्घाटन झालंय तो टप्पाही पूर्ण झालेला नाही हे आज प्रवास केला तेव्हा लक्षात आलं. कौतुकाचं अनेकांनी लिहिलं, मी उद्घाटन पुणेकरांऐवजी निवडणुकीसाठी झालंय यावर लिहितो.
#thread #PuneMetro

पाच पैकी ज्या दोन स्थानकांचा वापर पंतप्रधानांनी केला तिथेच काम पूर्ण झालंय, इतर तीन स्थानकांवर अगदी जिन्यासारखी मूलभूत कामं सुद्धा अर्धवट आहेत.. फलाटावर सुरक्षेसाठी पिवळी पट्टी फक्त गरवारे स्थानकावर आखली होती, वनाझला पंतप्रधान गेले नव्हते त्यामुळे तिथे ती नव्हती (छायाचित्र ४).

पहिल्याच दिवशी वनाझ स्थानकावर आग लागल्याची सूचना आणि सायरन वाजला, उद्घोषणा झाली. परंतु नक्की ड्रिल होतं की आग लागली होती की चुकून अलार्म वाजला होता यावर तिथल्या गोंधळलेल्या नागरिकांना उपस्थित स्टाफने काहीही स्पष्टीकरण दिलं नाही, खरंच पळा की पळू नका हेही सांगितलं नाही.

वनाझ स्थानकावर तुम्ही आयडियल कॉलनी स्थानकावर आहात असा फलक जमिनीत नट बोल्टने फिट करून लावला आहे, यावरून उद्घाटनासाठी काम उरकलंय हे जाणवलं.. स्थानकात असताना पटकन बाहेरचं शहर लक्षात येत नाही, त्यामुळे दोन क्षण मीही गोंधळलो.

सरकते जिने अर्ध्या क्षमतेनेही चालू शकत नव्हते, बंद पडत होते. परतीच्या प्रवासाचं तिकीट घेतलं तर पैसे पूर्ण घेतले गेले पण तिकीट एका बाजूच्या प्रवासाचंच मिळालं. त्यावर प्रवास मात्र परतीचाही झाला म्हणजे स्थानकातून बाहेर निघताना तिकीट तपासणी यंत्राने त्याचं काम केलं नाही.

या सगळ्यात एक गोष्ट व्यवस्थित वाटली ती म्हणजे स्वतः मेट्रो गाडी, जी खचाखच गर्दीने भरलेली असून व्यवस्थित वेगात इकडून तिकडे घेऊन गेली.. प्रवास अलगद होता, झटके किंवा कर्कश आवाज वगैरे आले नाहीत.
मात्र अर्ध्या तासाने एक मेट्रो हे रोजचं असेल तर ती फ्रिक्वेन्सी/क्षमता खूपच कमी वाटली.

एकंदरीत.. पुण्याला मेट्रो हवीच आहे, खूप आधीपासून हवी आहे.. पण तुम्ही (सगळेच) अतिशय संथ गतीने काम करताय.. वेग पकडा. 🙏🏻
केवळ निवडणूक येत आहे म्हणून अर्धवट मार्गाचे अर्धवट काम झाले असताना उद्घाटन केलं, ते काही पटलं नाही.
#PuneMetro #आपलीमेट्रो

असो. इथे मांडलेल्या मुद्द्याकडे लक्ष देऊन @metrorailpune योग्य त्या वेगाने योग्य ती पावले उचलेल आणि लवकरच पूर्ण मार्गावर - पूर्ण क्षमतेने चालू झालेल्या आपल्या मेट्रोचा प्रवास रोज करायला मिळेल अशी अपेक्षा.. तोपर्यंत वाट पाहू. 🙂
@metrorailpune ला शुभेच्छा!💐
#PuneMetro #आपलीमेट्रो

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling