Abhishek Somwanshi Profile picture
मराठी. संगणक अभियंता. पुणेरी! #महाराष्ट्रधर्म
Jul 25, 2023 20 tweets 3 min read
मनसेवाल्यांच्या खळ्खट्याक टोलधाडीमुळे झालेल्या महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या आर्थिक नुकसानाची आकडेवारी! एक थ्रेड(पूर्ण वाचा, मोठा आहे, फोडलेच तितके टोल तर आता काय...)
#Thread
1/20 टोल मध्ये झोल आहे असं म्हणत मनसेने २०१२-१४ मध्ये टोलविरुद्ध आंदोलन छेडलं आणि त्यात अनेक ठिकाणचे टोल फोडले गेले. कालही समृद्धीवरचा एक टोल फोडला गेला. त्या ठिकाणच्या पोलीस तक्रारीत मॅनेजरने २ लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. 2/20
Mar 6, 2022 8 tweets 6 min read
पुणे मेट्रोच्या एका टप्प्याचं आज उद्घाटन झालं. मेट्रो होतेय हे भारीच आहे. आनंदच आहे.. ❤️ पण ज्याचं उद्घाटन झालंय तो टप्पाही पूर्ण झालेला नाही हे आज प्रवास केला तेव्हा लक्षात आलं. कौतुकाचं अनेकांनी लिहिलं, मी उद्घाटन पुणेकरांऐवजी निवडणुकीसाठी झालंय यावर लिहितो.
#thread #PuneMetro पाच पैकी ज्या दोन स्थानकांचा वापर पंतप्रधानांनी केला तिथेच काम पूर्ण झालंय, इतर तीन स्थानकांवर अगदी जिन्यासारखी मूलभूत कामं सुद्धा अर्धवट आहेत.. फलाटावर सुरक्षेसाठी पिवळी पट्टी फक्त गरवारे स्थानकावर आखली होती, वनाझला पंतप्रधान गेले नव्हते त्यामुळे तिथे ती नव्हती (छायाचित्र ४).
Dec 23, 2021 8 tweets 6 min read
कृपया पुणे शहरातल्या मेट्रो स्टेशनला ब्रँडची नावे जोडू नका!

तुमच्या ब्रँडचे नाव पुण्यातल्या मेट्रो स्टेशनला पाच वर्षांसाठी जोडायचे असेल तर त्यासाठी पुणे मेट्रोने टेंडर काढले आहेत. म्हणजे उद्या ओप्पो कोथरूड, विवो छत्रपती शिवाजीनगर, अशी नावे दिली जातील.
#थ्रेड
1/n मेट्रोला जाहिरात करायची असेल आणि त्यातून उत्पन्न मिळवायचे असेल तर पूर्ण स्थानकभर करावी पण स्थानकांना नाव देण्याचा पराक्रम करू नये! एकदा स्थानकाला नाव दिले की ते नाव अंगवळणी पडते, पाच वर्षात त्या नावाचीच सवय होते, पुन्हा पाच वर्षांनी बदलायला गेलात तर लोकांचा गोंधळ उडतो.

2/n
Oct 15, 2020 9 tweets 5 min read
Where did it go wrong for Punekars?

Punekars used to tease mumbaikars on water clogging. Well, the same thing has happened to Pune for the 2nd year running. So what exactly went wrong?

One liner answer: Voted for PMC, with eyes still on Delhi.

Detailed Answer 👇🏻
1/8 In september 2019, Pune saw floods for the first time in years. Since then, everyone kept on asking the PMC to clean the drainage, get rid of the encroachments but the Mayor, his 100 corporators, Commissioner were unmoved.
2/8
Oct 15, 2020 11 tweets 6 min read
पुणेकरांचं काय चुकलं?

एक मोठा पाऊस आला की तुमची मुंबई लगेच तुंबते असं मुंबईकरांना हिणवता हिणवता सलग दुसऱ्या वर्षी पुण्याची तीच गत झाली. नक्की पुणेकरांचं काय चुकलं?

एका वाक्यात उत्तर: दिल्लीकडे पाहून गल्लीत मतदान केलं.

सविस्तर उत्तर खाली 👇🏻
१/७
#Pune #पुणे #पुणेकर #punerains गेल्या वर्षी मोठा पाऊस आला, पूर आला, तेव्हापासून सगळे सांगत होते नालेसफाई करा, अतिक्रमणे काढा. महापौर, त्यांचे १०० नगरसेवक आणि प्रशासन ढिम्म. काल भयानक पाऊस आला, पुन्हा तीच परिस्थिती. गेल्या वर्षीच्या पावसानंतर केलेले पूल, रस्ते काल वाहून गेले. एका वर्षात?
२/७